खाद्यप्रेमींसाठी मेजवानी

खाद्यप्रेमींसाठी मेजवानी

महाराष्ट्रातल्या तमाम खाद्य प्रेमींसाठी एक नवीन मेजवानी घेऊन लवकरच येत आहोत.



महाराष्ट्रातल्या तमाम खाद्य प्रेमींसाठी एक नवीन मेजवानी घेऊन लवकरच येत आहोत.

ही आहे एक स्पर्धा. आगळीवेगळी. तुमच्यातल्या प्रत्येकातला बल्लवाचार्य जागा करण्यासाठी.

बायको माहेरी गेली की पुरुषांची नाही म्हटलं तरी थोडीशी गोची होतेच. त्यातून ते चार-आठ दिवसांसाठी गेली ती जास्तच गोची होते. नाश्त्याला काय करायचं, जेवायला काय करायचं, कोणी पाहुणा आला तर त्याला काय द्यायचं.. असे अनेक प्रश्न आ…. वासून उभे राहतात.

आता यापुढे ही काळजी करायची गरज नाही. आपल्या घरात सहजपणे उपलब्ध नसलेल्या गोष्टी वापरून निरनिराळ्या पाककृती करण्याचं तंत्र आपल्यापुढे सादर करणार आहेत आमचे सेलिब्रिटी बल्लवाचार्य अर्थात सेलेब्रिटी शेफ !!

आपणही बल्लवाचार्य आहातच याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या पाककृती इतर बल्लवाचार्यांबरोबर नक्कीच शेअर करा. आम्ही त्या मराठीसृष्टीवर प्रकाशित करू.

या आठवड्यासाठी आपण एका theme ने सुरुवात करणार आहोत. ही थीम आहे सकाळचा झटपट नाश्ता. तयारीपासून खाण्याच्या टेबलवर येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा एक पदार्थ आपण पाठवायचा आहे.

साहित्य कोण तरी चालेल.. शाकाहारी, मांसाहारी, तिखट, गोड, आंबट असा कोणताही पदार्थ चालेल. भारतीय पदार्थ चालेल तसाच परदेशीसुद्धा चालेल. चला तर मग झटपट भाग घ्या या स्पर्धेमध्ये.

त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये इतर वेगवेगळ्या थीम आपण घेणार आहोत. पुढच्या आठवड्याची थीम आहे डाएट पदार्थ.

Author