बागेतील तारका –
काल २६ जानेवारी होती… दर कारगील दिन ,१५ आँगस्ट , २६ जानेवारी अशा दिवशी हमखास मला आठवण होते.. आर. के. पठाणिया यांची.. मी १०वीत असतानाची गोष्ट आहे… करगील युध्द सुरु होत…
तत्कालीन पारसी समाजाचे प्रमुख शेट करसेटजी माणेकजी यांचे स्मारक भायखळा पश्चिम येथील वाय ब्रिजजवळ अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर १८७५ मध्ये उभारण्यात आले. प्रथम श्रेणी दर्जाचे हे …..
काल रात्री झोपेमध्ये व्यत्यय माझ्या आला
मज उठ्वूनी गेला
कुठुनसा एक उंदीर घरामध्ये शिरला
मज छ्ळून गेला
खुड्बुड खुडबुड करूनी त्याने
उच्छाद मांडला
मज चिड्वुनी गेला
कपातात शिरूनी त्याने
कुरतडला भरजरी शेला
मज रड्वुनी गेला
शेवटी त्याला मारण्याचा
निश्चय माझा झाला
औषध खाऊनी उंदीर अखेर
निघुनिया गेला
मज हसवूनी गेला
-- प्रभा मुळ्ये
कशी बघतेय ती माझ्याकडे!
खरं तर मला कबुतरं अज्जिबात आवडत नाहीत. मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या building मध्ये जिथे तिथे colonies नी राहून सगळं घाण करुन ठेवलेनीत! पण आत्ता ना, एका कबुतरीने अंडं घातलंय माझ्या balconyतल्या एका कुंडीत! मला घाबरून सकाळी एकदा दूर जाऊन बसलेली, पण सतत डोळा माझ्याकडे! तेव्हा दिसलं, छोटुस्सं अंडं! आता तिला समजलंय कि तिला ती pregnant असल्याचा benefit मिळणारे. आम्ही तिला काही नाही करणार, आणि काही दिवस तिला इथेच मुक्काम ठेऊ देणार!
खरं तर मला हे बिलकूल पसंत नाहीये, पण नापसंत होऊन करतेय काय मी! असो.
आत्ता थोडासा पाय हलवला मी, तर लगेच माझ्या पुढच्या हालचालीकडे लक्ष हिचं! “उठतेय कि काय आता? येतेय कि काय इकडे? इजा तर नाही ना करणार ही माझ्या पिल्लाला?”
आई आई गं! मला आत्ता ही अग्गदी माझ्यासारखी वाटतेय! माझी पिल्लं वर्ष-सव्वा वर्षाची होईपर्यंत प्रत्येक दिसणारा माणूस, येणारा आवाज, कोणताही अन्न पदार्थ, वारा, पाऊस, खेळणं, काहीही, माझ्या बाळाला इजा तर करणार नाही ना? मग ही इजा अगदी physicalच होऊ शकेल असं नाही ना, त्यात मानसिक, बौद्धिक, भावनीक, आणी त्याही पलीकडे कित्तीतरी गोष्टी असतात! बघणारा माणूस, किंवा आसपासची वस्तू बऱ्यापैकी शुभ ईच्छेनेच तिथे प्रकट असते, पण आईची वक्र-संरक्षक (भोचक) दृष्टी काही हे मान्य किंवा सहन करू शकत नाही. तिचा protective mode कायमच On राहातो.
हाहाहा! आत्ताच पलीकडच्या एका मैदानावरून पोरांचा ओरडण्याचा आवाज आलेला, लगेच बाईसाहेब मान वर करून बघू लागल्या!
त्या वरून आठवलं, माझी पिल्लं ६ महिन्यांची असताना एका रात्री मी शेजारच्यांना, “गप्पांचा आवाज कमी करा” असं रात्री २ वाजता phone call करून सांगीतलं होतं! आज अजूनही भेटलं कि ते आम्हाला “आमचा आवाज आता येत नाही ना?” असं विचारतात, ही एक वेगळीच मजा! असो, त्यांना ही हे माहिती असेल, नाही तर कधी तरी कळेल, कि आई हि फक्त एक आईच असते.
त्यावेळेला ती तिच्या आयुष्यातले इतर roles सुद्धा पार पाडत असेल, पण तिचा पूर्ण प्राण हा तिच्या पिल्लांपाशीच घुटमळत असतो.. with protective mode always On!
गोव्यात वर्षभर उत्सवी वातावरण असतं. त्यात दरवर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे सिनेरसिकांना पर्वणीच. विश्वभरातील हजारो प्रतिनिधी, फिल्ममेकर्स या महोत्सवात सहभागी होतात. त्यानंतर आयोजनाच्या बाबतीत म्हणायचा तर त्याहुनही सरस महोत्सव म्हणजे गोवा मराठी चित्रपट महोत्सव. यंदा हा बारावा महोत्सव असून 28, 29 आणि 30 जून रोजी याचे आयोजन केले असल्याची घोषणा आयोजक संजय शेट्ये यांनी केली आहे.
मी , ‘स्वर-काफिया’ या विषयावर , उर्दूमधील कांहीं सुप्रसिद्ध ग़ज़लगोंच्या ‘स्वर-काफियावाल्या ग़ज़लां’च्या मत्ल्यांची कांहीं उदाहरणें खाली देत आहे. यांतील अनेक ग़ज़ला रसिकांनी वाचल्या असतील, किंवा त्यांचें गायन ऐकलें असेल.
२७ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील एका लेखात श्री अशोक शहाणे यांनी लिहिले आहे की “सी-डॅक वाल्यांनी मराठीची वाट लावली… सगळ्याच भारतीय भाषांची वाट लावली”. यात तथ्थ्य किती हे त्यांचे त्यांनाच माहित पण वस्तुस्थिती अशी आहे की आज संगणकाशिवाय पर्याय नाही.
भारतीय संसदेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तरीही या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्या-बोलण्यासारखे बरेच काही असते. कदाचित म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांचे ‘द पार्लमेन्टरी सिस्टिम’ हे नवे पुस्तक बरेच काही सांगून जाणारे ठरते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. सामान्य माणसाला त्यातून प्रचलित राजकारणाचा नव्याने परिचय होतो.
मी माझा मराठा – चारोळी संग्रह ( अप्रकाशित )माझ्या वाचक मित्रांसाठी उपलब्ध करुन देत आहे या चारोळ्यातून व्यक्त होणारे विचार माझे व्यक्तिगत आहेत ते कोणावर लाद्ण्याचा माझा प्रयास अजिबातच नाही याची वाचकांनी क्रुपया नोंद घ्यावी !
Copyright © 2025 | Marathisrushti