(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गृहनिर्माण संस्थेचे हेल्थ चेकअप कसे कराल ?

    येणाऱ्या नवीन सहकार वर्षात, सदस्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांत परस्पर सौदाह्याचे, आनंदाचे व सहकार्याचे वातावरण तयार करण्यास तसेच होणाऱ्या चुका कमी करण्याबाबत काय करावे? असा प्रश्न एका सदस्याने विचारला. “Precaution is always better than cure”. याचे उत्तर ज्या प्रमाणे इन्कमटॅक्स साठी CA, आजारी पडलात की डॉक्टर, त्याप्रमाणे आपण स्वत: आपला मौल्यवान वेळ कायद्याची पुस्तके वाचून चुकीचे निर्णय घेण्याआधी योग्य कायदेतज्ञ यांचा सल्ला आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. बहुतेक लोकांना उपविधी म्हणजे कायदा किंवा एखादा सोशल मिडिया मेसेज हा आपल्या मनासारखा असेल तर बरोबर अशी चुकीची समजूत असते. आज या लेखात तुम्हाला सदस्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहे.

  • आजी

    आज दिवाळेक ईल्लले मुंबईकार परत तात्याकडे ईले. दिवाळेच्या विषयार चावदिवसाच्या आंघोळीचो विषय ईलो.... आणि तात्याक सांगल्यानी... तात्या तुकाआवस कशी न्हावक घाली ती सांग?

    तातो म्हणता अरे मी आवस बघुकच नाय... मेली 3 म्हयन्याचो आसताना... आजयेन सांभाळल्यान माका...

    आता आजी कशी होती?

    मेल्यानू आवस मी काय बघुक नाय ... बापाशीन दुसरा लगीन काय करूक नाय ... माका आनी हयत्या ईट्याच्या बापाशिक तिनाच सांभाळल्यान...... चावदिवसाक सकाळी पयल्या कोंब्याक ऊठय.... तेवा भयानक थंडी..... दातार दात आपटत.... बेसनच्या पिटाचा उटना लाय.... आऩी न्हावक घाली.... पयलो तांबयो आंगार वतल्यान काय अशी शिरशिरी येय ..... आठावला काय आजय आंगार काटो येता.... तेवा कोन पयलो कारीट फोडता तेचे पैजी लागत.... पण म्हातारेन मरापर्यंत माका कारिट पयला फोडुक गावाक व्हया तेची काळजी घेतल्यान... तेवा न्हानयेरला मडक्या रंगवची पद्धत होती रे.... तेका कारटाचो हारय घालित आदल्यादिवशी.... न्हानी सारवन सापसुप केली जाय.... आता सारखी परीस्थीती नाय रे तेवा... पण वालयच्या गोड्या फोवाची सर मेल्यानू तुमच्या जिलेबीक येवची नाय अशी चव होती तिच्या हाताक.... आणी एक गोस्ट सांगतय तुमका... अरे मयग्या तुझो आजो मरताना आजयेेक पाठवल्यान आमच्याकडे आनि सोलाची कडी करुन घेतल्यान... आणी ती पीऊन मगे प्राण सोडल्यान .. ईचार बापाशीक अशी चव होती तिच्या हाताक.... वायंगान पेरतानाचे पोऴयेची आठवण कोणय आजुनय सांगात.... तिच्या हातचा एकदा खल्ललो जल्मात ईसराचो नाय

    तीच्या हाताक गुन होतो.... मी जी औषधा देतय ती तीनाच दाखवलेली.. ती आणी धोंडग्याची आवस खास मैत्रीनी... आणी दोघाय औषधा देयत... धोंडग्याच्या बायलेन छळल्यान सासयेक. ... त्याऐवजी औषधा शिकली आसती तर भला झाला असता.... आता रडता सासू बरी होती.....

    म्हातारेन माका सगळा शिकवल्यान... बापाशीची माझ्या मरापर्यंत हिम्मत नाय होती ..आजी पुढ्यात आसताना माका हात लावची... काय सांगु पोरांनो तुमका... अगदी म्हारापोरापासुन भिकार्या पर्यंत तिच्या समोरसुन कोन ऊपाशी जावक नाय..... कदाचीत आजचे आमचे दिवस हे तीचीच पुण्याई...

    प्रत्तेक घराक घरपण व्हया तर एक म्हातारी व्हयी रे......

    तिच्या शिवाय घराक घरपण नाय रे येना... आसलेल्यानी झपले तर म्हातारे सांभाळा रे ... मगे नाय गावाची.......

    ..... बापुर्झा

    डॉ बापू भोगटे

  • मुंबईतला १४० वर्षे जुना कॅपिटॉल सिनेमा

    आजही अशा वास्तू आहेत ज्या शेकडो वर्षं जुन्या आहेत. त्या सध्या जरी बंद स्थितीत असल्या तरी त्या मुंबईकरांच्या मनात कायम राज्य करुन आहेत. थोडीथोडकी नाही पूर्ण १४० वर्षं जुनी असलेली वास्तू म्हणजेच “कॅपिटॉल सिनेमा” या वास्तूचं एक विशेष स्थान मुंबईकरांच्या मनात होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते कायमच राहिल.

  • अंदमान – ‘रॉस’ व ‘नॉर्थ बे’ आयलंडस

    एके काळी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जाणले जाणारे  ‘अंदमान’ आता एक टुरिस्ट प्लेस म्हणून पण वेगाने प्रकाशात आलंय. पोर्ट ब्लेअर सेल्युलर जेल या बरोबरच अंदमानचे सुंदर समुद्र किनारे व छोटी छोटी बेटे या बेटावरील अनोखा निसर्ग, प्राणी पक्षी जीवन तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या “स्कूबा डायविंग” “Sea walk” ‘कोरल सफारी’ इत्यादी आकर्षणे यामुळे आज पर्यटक  मोठ्या संख्येने अंदमानला भेट देतायत.

  • “आयदान”:अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम!

    उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.

  • कापा-बरका

  • न मिटणारे मातीपण

    शेतकर्‍यांना शेतीपासून बेदखल करणारे, त्यांच्या जगण्याचा साकल्याने विचार न करणारे धोरण देशाचे मुळ हादरवू शकते. ‘सेझ’सारख्या प्रकल्पांसाठी जमिनी सक्तीने संकलीत केली जाणे, नैसर्गिक संसाधन विधेयक कायद्याची पायमल्ली करणे आणि शेतीबाह्य व्यवसायांकडे वळण्याचा आग्रह यामुळे नवे संकट उभे राहत आहे.

  • एकदा तरी हो म्हणं !

    आई ह्या शब्दाची व्याख्याच करता येणार नाही. आई सारखे दुसरे दैवत जगात नाही. आईचे ऋण काश्यानेही भरून येणार नाहीत त्यासाठी आईच व्हावे लागेल. एक प्रयत्न..!

  • मुलाखत : राधा ही बावरी फेम सौरभ गोखले

    प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.

    सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.

  • सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुराणी

    सलीम अझीझ दुराणी म्हणजेच ‘ प्रिन्स ‘ याचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल येथे पठाण परिवारात झाला. त्यांचे लहानपण जामनगर येथे गेले. त्यांचे वडील देखील क्रिकेट खेळलेले होते. ते राजस्थानच्या टीममधून बराच काळ रणजी ट्रॉफी खेळले होते.