(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संस्कार क्षम

  • संस्थेच्या समितीची निवडणूक

    २०१९ च्या सुधारणेपुर्वी सर्व गृहनिर्माण संस्थाना मतदान घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करणे बंधनकारक होते. निवडणूक बिनविरोध करायची असली तरीही निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा लागत असे. हा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येत असे. निवडणूक प्रक्रियेत येणारा खर्च संबंधित गृहनिर्माण संस्थांनाच करावा लागत असे. अशावेळी लहान संस्थाना निवडणुकीचा खर्च करणे शक्य होत नसे. त्यात भर म्हणून आरक्षण नमूद केल्याने अनेक ठिकाणी जातीपातीचे राजकारण येऊ घातले होते. बऱ्याच संस्थांच्या आरक्षण असलेल्या जागा रिक्त राहत होत्या. त्यात इच्छुक सदस्य फार कमी असल्याने संस्थेचे कामकाज सुरळीत चालवण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे सहकार कायद्यात उपाय सुचवत (२५० पेक्षा कमी सभासद) लहान संस्थांचे निवडणूक “निवडणूक आयोगामार्फत” न करता संस्थेच्या सर्वसाधारण सभेतच घेण्याचे अधिकार देण्यात आल्याने अनेक संस्थाना त्याचा लाभ मिळणार आहे. परंतु या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.

  • माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

    इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.

  • कुपोषणावर प्रभावी ‘अमरावती मिक्स’

    बालकांमध्ये असलेले कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातही कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना पोषण आहार पुरविण्याचा प्रभावी कार्यक्रम सुरू आहे. कुपोषित बालकांना ‘अमरावती मिक्स’ या नावाने तयार करण्यात आलेल्या आहारात शेंगदाणे, चणे, गूळ, कडधान्य यांचे मिश्रण तयार करण्यात येते. यात १४०पेक्षा जास्त कॅलरी आहेत आणि हा संपूर्ण आहार आरोग्य केद्राच्या कर्मचार्‍यामार्फत तयार करण्यात येतो. ‘अमरावती मिक्स’ नावाने ओळखल्या जाणारा हा पोषण आहार मेळघाटातील बालकांनाही उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागानेही अमरावती मिक्स हा प्रयोग अत्यंत प्रभावी असून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

  • बहुजनांचे श्रद्धास्थान – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

    Bahujananche Shradhasthan- Dr. Babasaheb Ambedkar

  • हे सुर्वे नारायणा…..(श्रद्धांजली)

    तु वारसदार सूर्यकुलाचा

    ज्यांना थांबणे माहित नाही……………

  • राशी व त्यांचे स्वभाव – वृषभ

    राशी :- वृषभ
    स्वामी :- शुक्र
    देवता :- वासुदेव विश्वरूप
    जप मंत्र :- ॐ ह्रीं विश्वरूपायनमः
    उपास्यदेव :- दुर्गा देवी
    रत्न :- हीरा

    जन्माक्षर :- ओ औ इ उ ए ऐ वा व वीवि वु वू वे वं ई ऊ वृषभ राशीवर शुक्र (ज्योतिष)ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते असे
    मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे. वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.

  • भाग्यवान दारुडा – औषधे वाटप (बेवड्याची डायरी – भाग १६)

    हॉल मध्ये सर्वाना एकत्रित बसवले गेले होते ..आता अल्कोहोलिक्स अँनाँनिमसची मिटिंग होणार आहे हे समजले ..मी कुतूहलाने अगदी पुढच्या रांगेत जाऊन बसलो ..माँनीटर ने प्रार्थना घेतली ..बोलायला सुरवात केली ..नमस्कार मित्रानो माझे नाव संदीप ..”मी एक भाग्यवान दारुडा आहे ..केवळ ईश्वराची असीम कृपा ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दर्शवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..आणि आपणा सर्वांचे मला लाभलेले प्रेम ..केवळ याच बळावर मी आज दारूच्या त्या पहिल्या विषारी घोटापासून दूर आहे ..तसेच सुखी ..समाधानी ..संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय “

  • अवखळ आनंदी खमाज

    सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.

    "जमानेभर का गम या इक तेरा गम,
    ये गम होगा तो कितने गम ना होंगे"
    असे लिहून त्याने प्रणयी तडफड व्यक्त केली आहे. वास्तविक, एक कविता किंवा गझल म्हणून या रचनेत तसे फारसे नाविन्य नाही, वेगळा विचार नाही तसेच असामान्य असा आशय व्यक्त होत नाही पण, याच शब्दांना संगीताची जोड मिळाली की लगेच हेच शब्द आपल्या मनात रुतून बसतात.
    उस्ताद मेहदी हसन साहेबांनी हीच कमाल, खमाज रागाच्या सहाय्याने अप्रतिमरीत्या सादर केली आहे. मी इथे मुद्दामून गझलेच्या पहिल्या ओळी दिल्या नाहीत पण, आता देतो.
    "मुहब्बत करनेवाले कम ना होंगे,
    तेरी महफ़िल मे लेकिन हम ना होंगे"
    मेहदी हसन यांची ही अतिशय प्रसिद्ध रचना खमाज रागावर आधारित आहे.
    शब्दांचे अचूक उच्चारण, खमाज रागावर आधारित असले तरी गझल गायकीचा स्वत:चा असा खास "खुशबू" असतो, त्याची यथार्थ जाणीव करून देणारी गायकी आणि आपण, राग सादर करत नसून, त्या रागाच्या सावलीत राहून, शायरीमधील आशय अधिक अंतर्मुख करीत आहोत, हा विचार, हे सगळे गुण या रचनेत अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतात. रागाच्या सुरांची मदत तर घ्यायची पण, शायरीला प्राधान्य द्यायचे, अशी दुहेरी कसरत मेहदी हसन खरोखरच अप्रतिमरीत्या सादर करतात. कुठेही शब्दांना म्हणून दुखवायचे नाही, ही आग्रह तर प्रत्येक ओळीच्या गायकीतून दिसून येतो.
    "अगर तू इत्तफाकन मिल भी जाये,
    तेरी फुरकत से सदमे कम ना होंगे"
    या ओळी, माझे वरील म्हणणे तुम्हाला पटवतील. वास्तविक, पहिली ओळ खमाज रागापासून थोडी दूर गेली आहे पण, लगेच दुसऱ्या ओळीत, गायकाने चालीचे वळण, योग्य प्रकारे आणून, आपल्या बुद्धिमत्तेचा अफलातून प्रत्यय दिला आहे.
    इथे मी थोडी गंमत केली आहे. लेखाचे शीर्षक "अवखळ आनंदी खमाज" असे दिले आहे पण, वरील रचना तर या भावनेपासून फार दूर आहे. हेच तर भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या रागाचे नेहमी एकाच भावनेत वर्णन करणे, सर्वथैव अशक्य!! रिषभ वर्जित आरोही सप्तकात दोन्ही निषाद बाकीचे सगळे स्वर शुध्द लागतात तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात पण, निषाद फक्त कोमल वापरला जातो. वादी स्वर गंधार तर संवादी स्वर निषाद असलेल्या या रागाची खरी ओळख तुम्ही (कोमल) निषाद कसा लावता आणि तो लावताना पुढच्या षडजाला किंचित स्पर्श करून अवरोही सप्तकाकडे कसे वळता, या कौशल्यावर आहे. खरे तर या रागात संपूर्ण "ख्याल" फारसे आढळत नाहीत.
    वेगळ्या भाषेत, ख्याल गायक, या रागाकडे तसे फार बघत नाहीत असे दिसते. परंतु वादकांचे मात्र अलोट प्रेम या रागाला लाभले आहे तसेच सुगम संगीतात, या रागावर आधारित भरपूर रचना आढळतात. हे थोडेसे पिलू रागासारखे झाले.
    उस्ताद विलायत खानसाहेबांनी खमाज वाजवताना हीच असामान्य करामत करून दाखवली आहे. उस्ताद विलायत खान म्हणजे सतार वादनात स्वत:चे "घराणे" निर्माण करणारे कलाकार. वास्तविक सतार म्हणजे तंतुवाद्य, म्हणजेच वाद्यावर "मिंड" काढणे तसे अवघड काम पण तरीही, सतारीच्या तारेवरील "खेंच" आणि मोकळी सोडलेली तार, यातून ते असा काही असमान्य सांगीतिक वाक्यांश "पेश" करतात की ऐकताना रसिक अवाक होतो. विशेषत: द्रुत लयीत, गत संपूर्ण सप्तकाचा आवाका घेत असताना,मध्येच "अर्धतान" घेऊन, सम, ते ज्याप्रकारे गाठतात, तो प्रकार तर अविस्मरणीय असाच म्हणायला हवा.
    या वादनात उस्तादांच्या कौशल्याची पुरेपूर प्रचीती येते. जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात येईल, वादन "जोड" आणि "झाला" यांच्या मध्ये किंचित गुंतलेले असताना, एके ठिकाणी ठुमरी अंगाची तान घेतली आहे पण तिचे अस्तित्व किती अल्प आहे. आणखी विशेष म्हणजे "जोड" वाजवताना, एके ठिकाणी, तारेवर किंचित दाब देऊन, स्वर रेंगाळत ठेवला आहे, म्हणजे बघा, लय मध्य लयीत चाललेली आहे पण, इथे तान सगळी न घेता मध्येच किंचित खंडित करून त्या रेंगाळलेल्या स्वरावर संपवलेली आहे. फार, फार अवघड कामगत आहे.
    कवी अनिलांच्या बऱ्याच कविता, गीत म्हणून रसिकांच्या समोर आल्या आहेत. त्यातलीच ही एक रचना, खमाज रागाशी मिळती जुळती आहे. अर्थात, हे गाणे, गीत म्हणून लिहिले नसल्याने, कविता म्हणून देखील फार सुरेख रचना आहे. संगीतकार यशवंत देवांनी चाल देखील फार सुरेख लावली आहे. मुळात यशवंत देव हे कवी प्रकृतीचे संगीतकार असल्याने, ते कवीच्या भावना फार नेमक्या दृष्टीने अभ्यासतात आणि शब्दांना सुरांचा साज चढवतात. देवांच्या चालीत, कवितेचे मोल, त्यांनी जाणलेले सहज दिसून येते आणि चाल लावताना, ओळीतील कुठल्या शब्दाने, कवितेचा आशय अधिक गहिरा होईल, याकडे लक्ष दिलेले आपल्या देखील लक्षात आणून देतात. त्यांची बहुतेक गाणी तपासली तर असे दिसून येईल, गाण्याच्या पहिल्याच ओळीत, कवितेतील नेमका शब्द पकडून, त्यावर नेमका "जोर" देऊन, कवितेतील आशय व्यक्त करतात. इथे देखील, त्याचा हाच आग्रह दिसून येतो.
    "वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर जळते उन,
    नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला"
    प्रणयी ढंगाची कविता आहे. या ओळीतील, "माध्यान्ह" हा शब्द आणि पुढे "जळते उन" हे शब्द ऐका. दुपारचा रखरखाट आहे, डोके उन्हाने तापले आहे आणि असे असून देखील, माझ्या प्रिये, तू कोमेजून जाऊ नकोस. या संदर्भात वरील शब्द ऐकावेत म्हणजे, "शब्दप्रधान गायकी" म्हणजे क्काय याचे आपल्याला उत्तर मिळेल.
    हिंदी चित्रपट गीतांत देखील खमाज राग भरपूर पसरलेला आहे. दिलीप कुमारच्या "देवदास" चित्रपटात अशीच अत्यंत मनोरम अशी रचना ऐकायला मिळते. मुबारक बेगमच्या खणखणीत आवाजात ही चीज ऐकायला फारच बहारीचे वाटते.
    "वो ना आयेंगे पलट कर, उन्हे लाख हम बुलायेंगे;
    मेरी हसरतो से केह दो की ये ख्वाब भूल जाये".
    "वो ना आयेंगे पलट कर,उन्हें लाख हम बुलाये" हीच ती साहीरची अफलातून रचना. खरतर गाणे फार थोडा वेळ, चित्रपटात ऐकायला मिळते पण तरीही सुरांची, स्वत:ची अशी खासियत असते, ज्यायोगे एखादा सूर देखील आपल्या मनावर परिणाम करून जातो. इथे तसेच घडते. मुबारक बेगमचा स्पष्ट, खणखणीत आवाजाने, खमाज रागाची झलक देखील मनाला मोहवून जाते.
    मराठी भावगीतात असेच एक मानाचे पान राखून असलेली रचना ऐकायला मिळते. माणिक वर्मांच्या आवाजात "त्या चित्तचोरट्याला का आपुले मी" ही रचना, खमाज रागाशी फार जवळचे नाते सांगून जाते. कविता म्हणून, गझल सदृश रचना आहे. मधुकर गोलवळकरांनी अतिशय सुंदर चाल लावून, या कवितेला अप्रतिमरीत्या सादर केले आहे.
    "त्या चित्त - चोरट्याला का आपुले म्हणू मी?
    स्मृतीजाल आंसवांचे दिनरात का विणू मी?'
    माणिकबाईंचा किंचित "नक्की" स्वरांतला आवाज परंतु शास्त्रीय संगीताच्या रियाजाने, आवाजाला घोटीवपणा प्राप्त झालेला. सहजता आणि संयमितपणा हे त्यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागते. तसेच त्यांनी मराठी भावगीत गायनात उत्तरेचा रंग आणि ढंग व्यवस्थितपणे रुजवला आणि हे वैशिष्ट्य, ही रचना ऐकताना आपल्याला सहज दिसून येईल. गायकी ढंगाची चाल आहे, त्यामुळे गाण्यात, "ताना","हरकती" भरपूर आहेत तसेच तालाच्या गमती जमती देखील आहेत. शास्त्रीय संगीताचा रियाज असल्याने, गायनात नेहमी विस्ताराच्या जागा, त्या निर्माण करतात. याचा परिणाम, गाणे ऐकायला अतिशय वेधक झाले आहे.
    देव आनंदच्या "काला पानी" या चित्रपटात "नजर लागी राजा" हे गाणे खमाज रागाची व्यवस्थित ओळख करून देते. वास्तविक, "नजर लागी राजा" नावाची बंदिश देखील प्रसिद्ध आहे आणि याच बंदिशीचा आधार घेऊन, चित्रपटात हे गाणे तयार केले आहे.
    "नजर लागी राजा तोरे बंगले पर,
    जो मै होती राजा बनके कोयलिया,
    कुहुकू रहेती राजा तोरे बंगले पर".
    संगीतकार एस.डी.बर्मन यांनी गाणे बनवताना, बंदिशीतील भावनेचा भाग तेव्हडा उचलला आहे आणि त्यावरून गाण्याची चाल बनवली आहे. अर्थात, अशा गायकी ढंगाची चाल गाताना, आशा भोसले यांची गायकी खुलली तर काय नवल!!
    "गंगा जमना" चित्रपटात अशाच धर्तीचे एक गाणे आशा भोसले यांनी खुलवले आहे - तोरा मन बडा पापी सांवरिया रे". खमाज रागाची अचूक ओळख करून घेत येते.
    "हां मतलब का है तू मीत बेदर्दी, गरज की रखे प्रीत;
    दुखिया मन को घायल करना, समझे तू अपनी जीत;
    तोरा मन बडा पापी सांवरिया रे,
    मिलाये छलबल से नजरिया रे".
    या गाण्यात "तोरा मन बडा पापी रे" या ओळीत आपल्याला खमाज राग भेटतो. संगीतकार नौशाद यांनी. गाण्याची प्रकृती ओळखून, उत्तर भारतीय लोकसंगीताची कास धरून, चाल बांधली आहे. अर्थात त्याचबरोबर गाणे कोठीवरील आहे, हे ध्यानात घेऊन, त्यात, "लखनवी" नखरा मिसळला आहे. खमाज "अवखळ" प्रवृत्तीचा आहे, हे नेमकेपणाने दाखवून देणारी ही रचना!!
    - अनिल गोविलकर

  • तो….

    आपल्याला अनाथ हा शब्द्ध केवळ उच्चारायया देखिल जड जातो..पण ते त्या शब्दासह त्या जणिवेसह जगतात…परिस्थितीने मांडलेल्या खेळात.. आपलं असं अस्थित्व निर्माण करण्याच्या धडपडीत…खरचं का ते जगतात?