सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !
बाळ गर्भात एका बाजूला गेल्याने बाळाने मुव्हमेन्ट करून दुसऱ्या बाजूचे अवयव दिसावे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील यांनी प्रयत्न केले. पण बाळ फिरायला तयार होईना म्हणून ते मिस्कील पणे म्हणाले की बाळ झोपा काढतय हलायला तयार नाहीये आणि त्याचक्षणी बाळाने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरावे तशी गर्भात गिरकी मारली. बाळाची पूर्ण तपासणी संपत आली असताना बाळाचा एका हाताचा पंजा सोनोग्राफी स्क्रीन वर हलताना दिसला. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी लगेच बघा बाळ गर्भातुन आपले बोलणे ऐकून आता आपल्याला टाटा बाय बाय सुद्धा करत आहे असे हसून सांगितले.
मी खात्रीने सांगू शकतो की तो रिक्षावाला नक्कीच कोकणातील असणार कारण मुलगी जन्माला येण्याची वाट इतक्या आतुरतेने पाहणारा आणि त्यासाठी दिव्य करायला तयार असणारा माणूस फक्त आणि फक्त कोकणातीलच असू शकतो.
माझ्या दुसऱ्या जहाजावर मी फोर्थ इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो. जहाजासाठी लागणारे इंधन ज्याला शिपिंग इंडस्ट्री मध्ये बंकर फ्युएल असे सुद्धा म्हटले जाते, यामध्ये हेवी फ्युएल ऑइल म्हणजे क्रूड ऑइल पेक्षा थोड्या चांगल्या प्रतीचे ऑइल, जे रिफायनरी मधून फिल्टर होणारे काळे तेल असते ज्याला इंजिन मध्ये वापरण्याअगोदर जहाजावर प्यूरिफाय करून त्यातील पाणी आणि कचरा वेगळा करून सुमारे 125 °c पेक्षा जास्त गरम करावे लागते. तसेच डिझेल किंवा मरीन गॅस ऑइल अशा प्रकारच्या इंधनांचा समावेश असतो.
आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणी ला आज ९४ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. त्यामुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
‘नमस्कार! हे आकाशवाणीचे..... केंद्र. सकाळचे ६ वाजून ३५ मिनिटे झाली आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम...’ बोलणारी व्यक्ती अदृश्य; तरीही परिचयाची. आवाजातील सातत्य आणि न चुकता तो ऐकण्यातील नियमितता. अशावेळी कुठल्याही दृश्याकृतीची गरज भासत नाही. आपोआपच एक अनामिक बंध जुळला जातो. हा मर्मबंध आता नव्वदीत पदार्पण करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’चे स्वातंत्र्योत्तर काळात ‘आकाशवाणी’ (१९५७) असे नामकरण झाले.
‘आकाशवाणी’ हे संयुक्तिक नाव थोर साहित्यिक व नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी सुचविले होते. त्यानंतर सुरु झालेली आकाशवाणीची वाटचाल हा भारतीय संस्कृतीच्या आणि एकूणच भारतीयत्वाच्या सर्वंकषतेचा परिपाकच म्हणावयास हवा. देशभरात आकाशवाणीची ४१० केंद्रे असून २० अवघ्या महाराष्ट्रातच आहेत. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान ते विभिन्न कला-सांस्कृतिक मूल्यांची रुजवात, रोजच्या घडामोडी ते आदर्शवत जीवनपद्धतीचा अवलंब अशा अनेकविध गोष्टी अबालवृद्धांसहित प्रत्येक वयोगटासाठी हाताळण्यातील संवेदनशीलता, जवळपास २३ भाषांतील प्रसारणाचा प्रचंड आवाका आणि मागील इतकी वर्षे सातत्याने त्यातील भाषिकस्तर कायम राखण्याचे कसब, या सर्व गोष्टी खरोखरच वाखाणण्याजोग्या आहेत.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तत्व चालवत आकाशवाणीची अतिशय जोमाने वाटचाल चालू आहे. जागतिकीकरणानंतर आलेल्या खाजगीकरणाच्या लाटेत अनेक व्यावसायिक माध्यमांचा पसारा वाढला. सुरुवातीला मात्र आकाशवाणी हे मनोरंजन व जनप्रबोधनाचं, सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं सशक्त माध्यम होतं. ‘संगीत सरिता’ ही शास्त्रीय संगीताच्या जलशांची वाहिनी तर ‘विविध भारती’ या आकाशवाणीच्या व्यावसायिक वाहिनीवरुन विविध सिनेसंगीत प्रसारित होतात. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे राज्यांतर्गत येणाऱ्या आकाशवाणी केंद्रावरुन त्या-त्या राज्यभाषेतील सुगम-संगीतांचे कार्यक्रम होतात. नाट्य-संगीत हे सुरुवातीला सुगम-संगीत या प्रकारात समाविष्ट होते. परंतु त्यातील शब्द-स्वरांचा सुरेख समन्वय लक्षात घेऊन त्यास आकाशवाणीतर्फे उपशास्त्रीय संगीताचा दर्जा देण्यात आलामनोरंजनासोबतच बाल, युवा, महिला यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गंमत-जंमत, युवावाणी, वनिता मंडळ असे कार्यक्रम प्रसारित होतात. अशा कार्यक्रमातून त्या-त्या वयोगटाचे भावविश्व व्यक्त होत असते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही जडण-घडण होत असते.
त्याचप्रमाणे कामगार सभा, कृषीवाणी, ‘माझं आवार माझं शिवार’ अशा माहितीपर कार्यक्रमांचा कामगार आणि शेतकरी बांधवांनाही फायदा होतो. त्यामुळे आकाशवाणी ही कित्येकांच्या रोजच्या जगण्यातील आधारस्तंभ बनली आहे. येथे पुनर्प्रसारण, ज्याला आपण रिपीट ब्रॉडकास्ट म्हणतो, ते एक-दीड-दोन वर्षांतून कधीतरी होते. कारण येथे सृजनशीलतेला बराच वाव असून श्रोत्यांना उत्तम व सकस खाद्य- ‘कंटेट’- पुरविण्यावर प्रामुख्याने भर दिला जातो. त्यामुळे आकाशवाणीवरुन प्रसारित होणारी कुठलीही गोष्ट ही संयत असते. त्यात ना ‘ब्रेकींग न्यूज’चा धडाका असतो, ना भावनांचा उद्रेक! निर्मळ आनंद देताना वास्तवाची जाणीव आणि त्यातूनही चांगलं कसं शोधावं हा विचार आकाशवाणी आपल्या श्रोत्यांना देत असते. यात सतत बदलणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना आकाशवाणीने विकसित केलेले स्वतःचं ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे अॅप असेल, ‘न्यूज ऑन एअर’ अंतर्गत दर तासाला एखादा नंबर फिरवून चालू घडामोडीतील कुठल्याही तीन बातम्या मिळवणे असेल, आपल्या बलस्थानांवर भर देऊन, आपलं मूळ टिकवून नव्या जगाशी- नव्या काळाशी जोडले जाणे हे आकाशवाणीच्या नव्वदाव्या पदार्पणातलं तिच्यासमोरचे ध्येय आहे. कारण ज्यावेळी ‘तुमचा कार्यक्रम ऐकताना जगणं सुसह्य होतं’, अशी प्रतिक्रिया आकाशवाणीतील उमा दीक्षितांसारख्या अनेक कर्मचाऱ्यांना श्रोत्यांकडून मिळते. इतक्या वर्षांचे सहसंबंध दृढ होत असतातच; पण त्याचबरोबर ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही बहुआयामी उद्घोषणा सार्थ ठरत असते.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ: इंटरनेट / चारुश्री वझे, 'महान्यूज'
पुणे.
मराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टिमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम्
त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः
अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे
स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि ||
हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो.
प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली जाते. राष्ट्र सेविका समितीची ही प्रार्थना आजही देशातील काना-कोपऱ्यातून सामूहिक पद्धतीने गायली जाते आणि प्रत्येक सेविकेच्या मनात अनन्य समर्पण भाव जागृत करते.
कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व ह्याचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी अनुभवायला मिळाला त्या भारतमातेच्या वीरांगना वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात साऱ्या देशाच्या मावशी केळकर.
०६ जुलै १९०५ साली त्यांचा जन्म नागपूर येथे दाते कुटुंबात झाला. त्यांचे वडील भास्करराव दाते पुढारलेल्या विचारांचे होते, तसेच आई यशोदाबाई सुद्धा. दोघेही टिळकांचे भक्त होते. त्यांच्या घरात केसरी चे सामूहिक वाचन चाले. त्यांच्या आई दुपारच्या वेळी आजूबाजूच्या महिलांना एकत्रित करून केसरी चे वाचन,त्यावरील लेखांवर विचार मंथन करीत. कमलताईंवर संघटनात्मक रचनेचे संस्कार अगदी लहानपणीच झाले. इंग्रजी शाळेत रुजवला जाणारा विचार आणि घरात घडणाऱ्या गोष्टी हा विरोधाभास कमलताईंना सतत खटकत होता, त्यांनी शाळेला राम राम ठोकला.
१४ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री पुरुषोत्तम केळकर ह्यांच्याशी झाला आणि त्या लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर झाल्या. केळकरांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मुलं होती, त्यांची एक बहीण बाल विधवा होती, लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे एवढ्या लहान वयात त्यांनी सगळं घर आपलंसं केलं. सांसारिक बंधनात अडकल्या तरी मनातून सामाजिक विचार कधीच दूर झाले नाही. अवकाळी वैधव्य आलं आणि सगळ्यांची जवाबदारी लक्ष्मीबाईंवर आली. लक्ष्मीबाईंनी मुलांची, नणंदेची आणि शेतीची जवाबदारी घेतली आणि अतिशय उत्तमरीत्या पार पाडली. एकदा डॉ केशव हेडगेवार ह्यांचा प्रवास वर्ध्याला असतांना लक्ष्मीबाई त्यांना जाऊन भेटल्या आणि संघाबरोबर काम करण्याची आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हे शक्य नाही,पण महिला संघटन होऊ शकते, ते तुम्ही करावं.
"स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत. त्यामुळे स्त्रीची उन्नती व्हायलाच हवी.पंख असमान असतील तर गरुड झेप कशी घेणार?" हे स्वामी विवेकानंदांचे विचार लक्ष्मीबाईंचे प्रेरणा स्थान बनले. डॉ च्या प्रत्यक्ष सल्ल्याने आणि विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी २५ ऑक्टोबर १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. महिलांनी केलेले, महिलांचे संघटन, महिलांसाठी, ज्यातून समाज बांधणी, घरा-घरातून देशप्रेम, स्वातंत्र्य चळवळीची माहिती, असे सगळे साधणार होते. राष्ट्र निर्माण हे एक दिवसात शक्य नाही, त्यासाठी प्रत्येक घरात हा विचार पोहचणे आवश्यक आहे, आणि कुठलीही गोष्ट रुजविण्याचे काम एक स्त्री अतिशय उत्तम पद्धतीने करू शकते म्हणून महिलांचे संघटन.
"जवाबदारी आणि कर्तव्य ह्यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज, आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभवावे."
"व्यक्ती-व्यक्तीवर राजकीय व सामाजिक संस्कार करून तिला एक अनुशासित सूत्रबद्ध शक्तीचे अंग म्हणून सिद्ध करायचे आहे व अशा सर्व व्यक्तींमध्ये कर्तव्यभावना, परस्पर जिव्हाळा, व सहकार्य निर्माण करणे, तसेच स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे त्यामुळे तिच्या उन्नती आणि संघटनेतून हिंदुराष्ट्र उभे राहणार, म्हणून समिती." लक्ष्मीबाईंची समिती मागची ही भूमिका फक्त भाषणात बोलण्यापुरती नव्हती तर स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून आणि कार्यातून प्रत्यक्ष आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात त्यांनी सतत उत्तमरीत्या निभावली म्हणूनच त्या कदाचित सगळ्यांच्या 'मावशी' झाल्या.
१९४७ ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात त्या स्वतः कराचीत गेल्या, जेव्हा हिंदूंची भर दिवसा कत्तल सुरू होती. कराची विमानतळावर 'खून से लिया है पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान' अशा घोषणा सुरू होत्या, तेव्हा केवळ आपल्या सेविकांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सगळ्या सेविकांना स्वतः जातीने भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या, त्यांना धीर दिला कारण तिथल्या एका सेविकेने त्यांना पत्र पाठवून बोलवलं होते. काराचीतील हिंदू परिवारांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले.
भारत पाकिस्तान, भारत-चायना युद्ध काळातसुद्धा मावशींच्या सेविका सगळ्यांच्या मदतीला धावून येत होत्या.
स्त्री सुलभ गुणांचा वापर राष्ट्र निर्माणासाठी करणाऱ्या, स्त्रियांच्या संघटनेतून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला घरा-घरात पोहचवणाऱ्या, स्त्री म्हणजे केवळ एक कुटुंब नाही तर राष्ट्र निर्माण करायची ताकद तिच्या ठायी आहे हे स्वतःच्या कार्यतून आदर्श ठेवणाऱ्या या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे शत शत नमन.
|| वंदे मातरम् ||
-- सोनाली तेलंग.
०७/०७/२०२२.
संदर्भ :
१. कर्मयोगिनी वंदनीय मौसीजी
२. दिपज्योति नमोस्तुते : सुशीला महाजन
३. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना कुळकर्णी, स्मिता कुळकर्णी
४. http://xn--h4b.indusscrolls.com/
Copyright © 2025 | Marathisrushti