(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • रत्नागिरी जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    मुंबई-पणजी-कोची हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या जिल्ह्यामधून जातो. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्ग या नावाने परिचित आहे. सातारा जिल्ह्याला जोडणारा कुंभार्ली घाट, रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाट व कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट हे महत्त्वाचे घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

  • सीरिया

    सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • जमैका

    क्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्‍याचदा ऐकतो. वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग.

  • लॉगमन गुहा

    चीनमधील येई नदीच्या काठावर असलेल्या डोंगरात लॉगमॅन गुहा आहेत.

  • मोनॅको

    मोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

  • सोमालिया

    सोमालिया (सोमाली: Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे.

  • हिंगोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.

  • हंगेरी

    हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

  • अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर वारुड

    वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.