महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकुण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.
दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.
उस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.
एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.
साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.
पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.
पोलंडमधील मालबोर्कच्या किल्ल्याची निर्मिती १३ व्या शतकात झाली.
समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले.
धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे.
आल्बेनिया हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस माँटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो (सर्बिया) तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या पश्चिमेस ओत्रांतोच्या सामुद्रधुनीपलीकडे सुमारे ७२ किमी अंतरावर इटलीचा दक्षिण भाग स्थित आहे.
आल्बेनियामध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. याची राजधानी तिराना येथे असून, देशाच्या ३६,००,००० लोकसंख्येपैकी ६,००,००० लोक तिराना शहरात राहतात. साम्यवादी कालखंडानंतर आल्बेनियाने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून दूरसंचार, वाहतूक, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांसह एकंदरीत अर्थव्यवस्था लक्षणीय प्रगती करीत आहे. सध्या आल्बेनिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपामधील संरक्षण व सहकार संस्था इत्यादी प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २००९ साली आल्बेनियाने युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : तिराना
अधिकृत भाषा : आल्बेनियन
स्वातंत्र्य दिवस : नोव्हेंबर २८, इ.स. १९१२ (ऑटोमन साम्राज्यापासून)
राष्ट्रीय चलन : लेक
देश : अल्बानिया
राजधानी : तिराणा
चलन : अल्बानिया लेक
Country : Albania
Capital city : Tirana
Currency : Albanian lek
Calling code : 355
Country Domain : .al
( Source : Wikipedia )
Copyright © 2025 | Marathisrushti