वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल


मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.
दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच.

भारतातील विविध ठिकाणच्या नैसर्गिक परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारतात एका बाजूला थरच्या वाळवंटासारखे रुक्ष प्रदेश आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेघालयासारखी आत्यंतिक पावसाची राज्यं आहेत.
संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

सुमारे ४१,००० वर्षांपूर्वी घडून आलेल्या या पृथ्वीवरील चुंबकीय बदलांत, चुंबकीय ध्रुवांची जागा मोठ्या प्रमाणात सरकली होती. तसंच त्यांच्या तीव्रतेतही मोठा बदल झाला होता. चुंबकत्वातील बदलाच्या घटना अधूनमधून घडून येत असल्या तरी, पृथ्वीच्या चुंबकत्वातला या वेळचा बदल खूपच मोठा असल्यानं लक्षवेधी ठरला आहे. या लक्षवेधी घटनेची झलक त्या काळी विषुववृत्तावरील ‘ध्रुवीय’ प्रकाशाद्वारे दिसून आली असल्याचं, आताचं हे संशोधन दर्शवतं.
येथे आपण अश्या काही प्रथितयश भारतीय क्रिकेटपटूंना “कर” आदरपूर्वक जोडणार आहोत, ज्यांच्या आडनावाच्या अखेरीस ‘कर’ हा प्रत्यय आहे. हे ते ‘कर’धारी मराठी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे किंवा अपवादात्मक स्थितित इतर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात काही जण तर केवळ प्रतिनिधित्व करून थांबले नाहीत तर क्रिकेट मैदानावरील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने महाराष्ट्राची, मराठी जनांची आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती.

मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे.

प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींच्याही एकमेकांशी संपर्क साधण्याच्या भाषा असतात. मात्र या भाषा रासायनिक स्वरूपाच्या असतात. काही वेळा ही रसायनं या वनस्पतींच्या मुळांद्वारे जमिनीतून, तर काही वेळा पानांद्वारे हवेतून, एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीकडे पोचवली जातात. एखाद्या वनस्पतीला जेव्हा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होतो, तेव्हा ती वनस्पती आजूबाजूच्या तिच्या भाऊबंदांना धोक्याची सूचना देऊन सावध करते.
Copyright © 2025 | Marathisrushti