वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल


प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.

सायमा मलिक-मोरालेडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. भाषा कोणतीही असो. तिचं आकलन होण्यासाठी मेंदूतले काही ठरावीक भागच सक्रिय होत असतात. हे सक्रिय भाग मेंदूतील पुढच्या, वरच्या तसंच खालच्या भागात वसले आहेत. किंबहुना सक्रिय होणाऱ्या भागांबद्दलचे हे निष्कर्ष अपेक्षितच होते.
मंडळी , माझं माहेर आमची मुंबई शहरातलं एक छानसं सुंदरसं टुमदार उपनगर : गोरेगांव ( पूर्व ).तिथल्या रेल्वे फाटकाजवळ गोगटे वाडीमधे आमची एक छान शाळा आहे , शिशूवर्ग ते इयत्ता चौथी — बैराम जीजीभाॅय शाळा आणि इयत्ता पाचवी ते दहावी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर ! इसवी सन १९८० ला आम्ही जवळपास १२० विद्यार्थी वर्गमित्र—मैत्रिणी ( दोन तुकड्या मिळून ) १० वी परिक्षेला म्हणजे शालान्त परिक्षेला बसलो आणि आता यावर्षी म्हणजे २०२५ सालामधे तेंव्हा ( कमीत कमी ) १५ वर्षांचे असलेले सगळे साठी चे झालो किंवा यावर्षी होऊ ! त्यामुळे यावर्षी एक संमेलन करूया अशी एक टूम वर्गातील मित्र—मैत्रिणींच्या मनात आली , आणि महाराजा , त्याच संकल्पनेचा पाठपुरावा करत काल ती संकल्पना आम्ही २८ जणांनी प्रत्यक्षात उतरवली ना ! अंधेरीच्या चकाला येथील हाॅटेल साई पॅलेसमधे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि रंगतदार संध्याकाळ सुरु झाली…..

ह्याचे मोठे प्रसरणशील काटेरी गुल्म असते.खोड व फांद्यावर काटे असतात.पाने ३ सेंमी लांब पक्षाकार असून फुले फिकट पिवळ्या रंगाची मंजिरी स्वरूप असतात.खालचे फूल फळात रूपांतरित होते.फळ ६ सेंमी लांब,चपटे,काटेरी व आत १-२ बिया ज्याला आपण सागर गोटा म्हणतो त्या असतात.बिया गोलाकार,निळसर करड्या व कठिण आवरण असलेल्या असतात.
ह्याचे उपयुक्तांग बीज असून ते चवीला तिखट,कडू,तुरट असून उष्ण गुणाचे व हल्के व रूक्ष असते.लताकरंज कफ व वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)आमवात व संधिवात ह्यात लताकरंज तेल चोळल्यास फायदा होतो.
२)सागरगोट्याच्या बियाची साल तुरट असल्याने जुलाब,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
३)सुजेवर सागर गोटा,रूई,एरंडाची पाने एकत्र वाटून गरम करून लेप करतात.
४)सागरगोटा चुर्ण ओव्या सोबत दिल्यास मासिक पाळी नियमीत येण्यास मदत होते.
५)जखमेवर सागरगोटा पाण्यात उगाळून त्याचा लेप लावावा.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत. पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे. कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे.
सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणा विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे.

असा कोणता माणूस नाही ज्याला प्रॉब्लेम नाही, आणि असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सुटत नाही….
नाही, नाही…हे कोणत्याही ज्योतिषाचं किंवा काउन्सेलरच वाक्य नाही. कारण प्रॉब्लेम सुटतो की नाही, माहित नाही. पण त्याच्याकडे तटस्थपणे पाहून थोडा वेळ हसू शकता.
एक माणूस सिनेमा थिएटरमध्ये मोठी पगडी घालून बसला होता. मागच्या माणसाला प्रॉब्लेम झाला. कारण सिनेमा दिसत नव्हता. त्याने प्रॉब्लेम कसा सोडवला पहा?
पुढे पगडी घालून बसलेल्या माणसाला सांगितलं. अधून मधून सिनेमात काय चाललं आहे मलाही सांगा!! पगडीवाल्याला त्या बोलण्याचा अर्थ काळला आणि त्याने पगडी काढली.
There may NOT be NEXT TIME…..कदाचित् परत भेट होणार नाही!
Copyright © 2025 | Marathisrushti