(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • हिऱ्यात ‘दडलेलं’ खनिज

    पांढरट पदार्थ कसले आहेत हे कळल्यानंतर, या हिऱ्यातले काळे पदार्थ काय असावेत, याची उत्सुकता आता निर्माण झाली होती. काळे पदार्थही अर्थातच क्ष-किरणांद्वारे अभ्यासले जात होते. आश्चर्य म्हणजे, काळ्या पदार्थांच्या या विश्लेषणात, हे पदार्थ आतापर्यंत निसर्गात न सापडलेलं एक खनिज असल्याचं आढळलं. परॉवस्काइट या गटात मोडणारं हे खनिज, कॅल्शियम आणि सिलिकॉन या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे.

  • ओरिसातील चीलिका लेक

    ओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात.

  • आजी आजोबांचे आरोग्य – भाग ५

    मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते.

  • अनाकलनीय अर्थशास्त्र

    परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.

  • एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

    संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

  • काही खास एक्स-रे

    काही खास एक्स-रे ची माहिती

  • हिलिअमची गळती

    पृथ्वी जेव्हा जन्माला येत होती तेव्हा पृथ्वीभोवती असणाऱ्या हायड्रोजन आणि हिलिअमयुक्त वातावरणाचा दाब हा, पृथ्वीच्या वातावरणाच्या आजच्या दाबाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे पट इतका प्रचंड होता! या प्रचंड दाबामुळे याच वातावरणातला हिलिअम वायू हा द्रवरूपातल्या तप्त शिलारसात मोठ्या प्रमाणात विरघळला. त्यानंतर या शिलारसाच्या अभिसरणाद्वारे या हिलिअमचा काही भाग शिलारसाखालील गाभ्यात मिसळला.

  • आजी आजोबांचे आरोग्य – भाग ६

    जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते.

  • बिथोवेनचा मृत्यू

    लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती.

  • एक भारतीय नागरिक

    मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.

    सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.