(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल भाग ६३ – चवदार आहार -भाग २५

    औषध म्हणजे कडू. हे लहान मुलांनापण माहिती आहे. औषध लागू पडते, ते त्याच्या अंगभूत गुणांमुळे.

    त्याची चव, त्याचे गुण, त्याची मात्रा, त्याची कार्यकारी शक्ती, त्याचा पोटात गेल्यावर होणारा परिणाम, त्याचे विभिन्न अवयवांवर होणारे वैयक्तिक किंवा एकत्रित परिणाम, त्याचा प्रभाव, त्यामुळे आतमधे होणारे भौतिक अथवा रासायनिक किंवा भावनिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय औषध देत असताना वैद्याने रूग्णांशी काही वेळा गोड आंबट कडू बोलत, आपली शक्ती औषधांमधे मिसळायची असते. औषधाबद्दल विश्वास वाढवायचा असतो. तरच ते औषध विशिष्ट ठिकाणी जाऊन विशिष्ट काम करते. असे आयुर्वेद मानतो. त्यामुळे एखादे औषध प्रत्येकावर तोच, तसाच परिणाम दाखवेल असे नाही.

    जसे पॅरासिटामोल हे औषध समजा आयुर्वेदीय मानले तर त्याची गोळी कडू चवीची असते. आणि सिरप गोड चवीचे असते. आयुर्वेदानुसार गोड चव कफ वाढवते. त्यात लहान मुलांचे वय हे कफाला वाढवणारे असते. म्हणजे लहान मुलांना हे औषध वापरायचे झाले तर सिरपपेक्षा गोळी वापरावी, जी चवीला कडू आहे. कडू चव वात पित्ताला वाढवते. पण लहान मुलांचे कफाचे वय हे पित्ताला विरोध करणारे असल्यामुळे त्यांना फायदाच होईल. असे मत माझे मित्र संगमेश्वर स्थित वैद्य अजित जोग म्हणायचे.

    आयुर्वेदाचे हेच वैशिष्ट्य आहे फक्त जीभेला गोड लागावे एवढाच त्या गोड किंवा कडू चवीचा उद्देश नसून वय आणि प्रकृतीचाही संबंध चवीशी येतो. फार खोलात जाऊन विचार करू नका. सहज आठवलं ते लिहिलं.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    25.11.2016

      November 25, 2016


  • आहाररहस्य-आहारातील बदल भाग ७०

    बदललं, सारंच बदललं.
    ते गोरे इंग्रज काय येऊन गेले,
    तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले
    पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले.

      December 1, 2016


  • किचन क्लिनीक – कोबी

    किचन क्लिनीक – कोबी

    ह्या भाजीच्या बाबतीत तशा आपल्या प्रत्येकाच्याच भावना तशा मिश्र कारण हि तसेच आहे म्हणा हि भाजी आपल्या राष्ट्रात तयार होणारी भाजी नसून इंग्रजांनी आपल्या सोबत हिला येताना आणली होती.तशी हि भाजी काही वाईट नाही हं त्याच्या गो-या सायबा सारखी.हो अगदी तुम्ही हिला गच्चीत एखाद्या मोठ्या कुंडीत लावले तरी चांगली किचन गार्डनींगची हौस पुरी करता येईल तुम्हाला.

    ह्या कोबीची फुले दिसतात भारी देखणी व चवीला देखील सुरेख लागतात.अगदी सुकी भाजी,भजी,कोशिंबीर,लोणचे सगळेच छान लागते ह्या भाजी पासून बनविलेले.मी तर अगदी झुणका व पराठे सुद्धा बनवून खाते ह्याचे मस्त लागतात.अगदी कांदा नसताना कांदे पोहे खाणे जरा जड जाते ना मग काय कोबी घाला कांद्याच्या बदली व पहा कसे झकास लागतात पोहे ते.

    जसा ह्या भाजीचा वापर स्वयंपाकात होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हि भाजी वापरू शकतो.पण प्रथम तिचे गुण पाहूयात.कोबी हा चोवीस गोड थंड व शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करणारा असून वात दोष वाढवितो.

    आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)थकवा जाणवणे,दम लागणे,तोंडास कोरड पडणे,छातीत जळजळ ह्या ५० ग्राम कोबी पाणी न घालता कुकर मध्ये वांफवा व त्याचा रस काढा नंतर त्यात १ चमचा मध व १/२ चमचा जिरेपूड घालून सुर्योदयाच्या वेळी तो रस प्यावा व तासभर काही खाऊ नये.ह्या प्रयोगाने ह्रदयात बळ मिळते.

    २)पोट बिघडणे,शौचास भसर होणे,छातीत आग होणे,तोंडास पाणी सुटणे,वजन कमी होणे ह्या तक्रारीकडे १/२ कप कोबी रस+ १ चमचा मध+ १ चमचा गाजर रस हे मिश्रण जेवणा सह थोडे थोडे प्यावे.

    ३)थंडीत त्वचा रूक्ष होणे,फुटणे,खाजते ह्यात कोबीचा रस व कोथिंबीर रस एकत्र करून त्वचेवर लावावा.

    ४)लघ्वीची आग होणे,लघ्वी थोडी थोडी होणे,कंबर दुखणे ह्यात १ ग्लास कोबीरस +धणे पूड १ चमचा + २ चमचे खडीसाखर २-३ वेळा विभागून घ्यावे.

    ५)हिरड्यांतून पू रक्त येत असल्यास कोबीचा रस तोंडात धरून गुळण्या कराव्या व नंतर गाल व हिरड्यांना तीळ तेल लावावे.

    कोबी खायचा अतिरेक केल्यास पोटात वात धरू शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 14, 2016


  • आजचा आरोग्य विचार – भाग सव्वीस

    सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.

      February 26, 2018


  • प्रमुख आहार सूत्र – भाग ३

    मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र चरकाचार्यांनी वर्णन केले आहे.

    आस्यासुखं स्वप्नसुखम्
    दधिनी ग्राम्यौदकः पयांसि
    नवान्नपानं गुडवैकृतंच
    प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम !

    हे सूत्र मधुमेह होऊ नये म्हणून काय काय करू नये याविषयी माहिती सांगणारे आहे.

    काय आश्चर्य किंवा एकरूपता आहे पहा. हे सर्व ऋषी एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी 'काय करू नये' ते पहिल्यांदा सांगताना दिसतात.

    मनाचे श्लोक सांगताना समर्थ देखील असेच सांगतात,
    "नको रे मना........"
    हे करू नको, ते करू नको. बाकी सगळं करं, पण हे हे एवढं अजिबात करू नकोस, पुढे धोका आहे."

    नकारार्थी गोष्टी आपल्या मनाला पटकन कळतात. हे वेडं मन सारखं तिथेच धाव घेतं. म्हणून अशा बेसावध क्षणांची आठवण सतत व्हायला हवी. कारण आयुष्यात एक क्षण भाळण्याचा आणि उरलेले सर्व सांभाळण्याचे! सावध तो सुखी म्हणून काय नको, ते प्रथम सांगितले जाते.

    एकदा का मधुमेहाचे लेबल चिकटले की, आयुष्यभर गोड क्षण नुसते आठवणीतच ठेवायचे, अशी आजची धारणा. आपल्याला ही धारणा बदलवायची आहे. मनाची ताकद प्रचंड आहे. जर मनापासून ठरवले तर मधुमेह हद्दपार होऊ शकतो. अत्यंत कडू असणारा हा गोड विषय जरा वादग्रस्त आहे. पण उर्वरीत आयुष्य जर निरोगी आणि गोड जायला हवे असेल तर थोडे कडू निर्णय घेणे हितकर असते. हे निर्णय घ्यावेत.

    मधुमेह होऊ नये याकरीता काय करू नये, या अवतरणातील इथली दुसरी ओळ प्रथम पाहू. कारण विषय दुधाचा सुरू आहे.
    पय म्हणजे दूध आणि पय म्हणजे पाणी देखील. इथे शब्द वापरलाय "पयांसी"
    हा 'पाणी' या अर्थी नक्कीच नाही. कारण त्याआधीच्याच शब्दामधे "उदक" असा वेगळा शब्द ग्रंथकारांनी वापरला आहे. म्हणजे मधुमेहामधे पाणी आणि दूध या दोन्ही गोष्टीपासून सावध रहायला हवे, असे शास्त्रकारांना अपेक्षित आहे.
    एखाद्या गोष्टीचा अभिमान जरूर असावा. पण गर्व असू नये.

    आमची देशी गाय सर्वगुणसंपन्न जरूर आहे. हा अभिमान जरूर बाळगावा, पण तिचे दूध सर्व रोगात चालते, हा वृथा अहंकार मात्र नको. राजयक्ष्म्यासारख्या रोगात गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दूध, शेळीचा सहवास श्रेष्ठ सांगितला आहे.

    आमच्या देशी गाईबद्दल मला पूर्ण आदर आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आमच्या गाईचे दूधच औषधी ठरेल असे नाही.
    काही ठिकाणी गोदुग्ध, काही वेळा गोदधी म्हणजे दही, काही ठिकाणी गोतक्र म्हणजे ताक, काही ठिकाणी गो नवनीत म्हणजे लोणी, काही ठिकाणी गोघृत म्हणजे तूप, तर काही ठिकाणी गोमूत्र, तर काही ठिकाणी गोमय म्हणजे शेण देखील औषध म्हणून काम करते.

    मधुमेह होऊ नये, म्हणून दुध घे -ऊ- च नये असा टोकाचा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. दूध आता लगेच बंदच करायला हवे असेही नक्कीच नाही.

    "पिण्याचेही" काही नियम असतात ना.
    गैरसमज नको, दुधाबद्दलच बोलतोय मी .......

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021
    19.01.2017

      January 19, 2017


  • किचन क्लिनीक – नारळ

    नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.

    माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.

    आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
    तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.

    नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.

    नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.

    तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!

    चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:

    शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.

    नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 23, 2016


  • हार्ट अटॅक रिस्क डिटेक्टर

    आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।

      January 28, 2021


  • किचन क्लिनीक – काही दह्यांचे गुणधर्म व दह्याचे घरगुती उपचार

    १)गाईच्या दुधाचे दही:

    चवीलागोड,आंबट,उष्ण,स्निग्ध,बलकारक, पुष्टिकर,भुक वाढविणारे व अजीर्णात उपयुक्त आहे.

    २)म्हशीच्या दुधाचे दही:

    चवीला गोड,आंबट,पचायला जड,स्त्राव उत्पन्न करणारे,स्निग्ध,वातनाशक,कफकर,रक्तदुषित करणारे,शुक्र व वजन वाढविणारे आहे.

    ३)शेळीच्या दुधाचे दही:

    मल अर्थात संडासलाघट्टकरणारे,हलके त्रिदोषनाशक,भुक वाढविणारे,वजन वाढविणारे आहे.

    आता आपण दह्याचे काही घरगुती उपचार पाहूयात:

    १)कुळीथाचे अजीर्ण झाले असता ताजे दही कपड्यात बांधून टांगून ठेवावे व त्याचे निथळणारे पाणी प्यावे.

    २)भुक लागते पण तोंडावर चव नाही असे असल्यास भोजन करताना मध्ये मध्ये दही+सैंधव+ खडी साखर हे मिश्रण घ्यावे.

    ३)पातळ जुलाब होत असल्यास दही+तूप+सैंधव हे मिश्रण भातात मिसळून खावे.

    ४)दह्यावरची साय २ चमचे+१ चमचा त्रिफळा चुर्ण+१ चमचा मध हे मिश्रण रोज रात्री घेतल्यास डोळ्यांना हितकर आहे.

    ५)कृश शरीराच्या व्यक्तींनी वैद्यांचा सल्ला घेऊन आठवड्यातून दोन वेळेस दुपारच्या जेवणात दही व खडी साखर हे मिश्रण घ्यावे.

    दही अतिप्रमाणात खाल्ल्यास कफ व पित्ताचे विकार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 12, 2017


  • आहारसार भाग ४

    या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.

      August 22, 2016


  • आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

    जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे.

      December 5, 2016