No Picture
साहित्य - ललित

न्हैचिआड

Category:

 

वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्‍यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली.

No Picture
साहित्य - ललित

गोवा

Category:

 

गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. गंमत अशी की दरवर्षी आणखी एका कामानिमित्त गोव्याला जावंच लागतं. थोडक्यात गोव्याच्या दरवर्षी दोन फेर्‍या ठरलेल्या. एखाद्या वर्षी तीनवेळा सुद्धा जाणं होतं. फेरी कितवीही असो, गोव्याला जायचं म्हणजे अंगात उत्साह संचारतो. हिशेब केला तर आतापर्यंत गोव्याला पंचवीसएक फेर्‍या सहज झाल्या असतील. पण म्हणून गोव्याला जाण्याचा कंटाळा कधीच घडत नाही. गोवा साद घालतो आणि मी गोव्याला जातो. आतुरतेने, ओढीने. ही ओढ नेमकी गोव्याबाबत का भासते याचं उत्तर देणं कठीण आहे.

No Picture
साहित्य - ललित

९/९ विश्वास निवास

Category:

 

९/९, विश्वास निवास, परळ, मुंबई – १२ हा आमचा परळच्या घराचा पत्ता. आयुष्यातील पंचवीस वर्षे मी परळला काढली. जन्मल्यापासून म्हणजेच १९४९ सालापासून ते १९७४ पर्यंत. थोडक्यात माझं सर्व बालपण परळला गेलं. बालपण आणि तरुणपणातील काही सुरुवातीची वर्ष. आज साठीच्या दाराशी घुटमळत असतानाही मनात बालपणीच्या आठवणी टवटवीत आहेत. परळ ओलांडून पुढे जाताना या सर्व आठवणी जागृत होतात. परळचा रस्तान् रस्ता, तिथल्या इमारती, तिथली गजबज सारं काही पुन्हा आठवतं. क्षणार्धात काळ तीसएक वर्ष मागे झेपावतो. मी पुन्हा परळचा होऊन जातो आणि परळ माझं.

No Picture
साहित्य - ललित

छोटीसी बात……. मित्र पालक

Category:

 

रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच. प्रत्येक मुलाला वाटत असतं आईने आपल्याच जवळ झोपावं आणि झोपताना फक्त आपल्याशीच बोलावं. समजा, घरात दोन मुलं असली आणि आई जर दोन मुलांच्या मधे झोपली, तरी प्रत्येक मुलाला वाटतं आईने माझ्याचकडे पाहून बोललं पाहिजे. अशावेळी आईची चिडचिड होते.

No Picture
साहित्य - ललित

छोटीसी बात……. मूल मित्र..

Category:

 

घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात.

मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोर्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,‘आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.’

No Picture
साहित्य - ललित

छोटीसी बात……. उपदेश सिंचन

Category:

 

“ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.”“अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.”“साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.”“पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?” वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील?

No Picture
साहित्य - ललित

छोटीसी बात…… नाही ला नाही.

Category:

 

लहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.

मुलांच्या जिज्ञासेला,कुतुहलाला खतपाणी घालणं हे तर पालकांचं प्रथम काम आहे. किंबहुना मुलांची जिज्ञासा चेतवणं हे सुजाण पालकत्वाचं व आदर्श शिक्षकाचं पहिलं लक्षण आहे. अनेक पालकांना मुलांच्या जिज्ञासेचा मनोमन धसकाच असतो. प्रश्न विचारणार्‍या, काहीतरी प्रयोग करु पाहणार्‍या मुलांपेक्षा एका जागी गप्प बसणारं मूल अधिक समजदार असतं, असं ही काही पालकांना वाटतं. पण हे काही योग्य नाही. मुलाची जिज्ञासा खच्ची व्हावी यासाठी पालक किंवा शिक्षक प्रयत्नशील असतात,असं नव्हे. तर एका दोन अक्षरी शब्दामुळे हा सगळा घोटाळा होतो. आपण बोलताना जर तो दोन अक्षरी शब्द जाणीवपूर्वक टाळला तर सगळे प्रश्न सोपे होतील. तो महान दोन अक्षरी शब्द आहे ‘नको किंवा नाही.’ किंबहुना या शब्दामुळेच अनेक लहान मोठे अपघात होण्याचा पण संभव असतो. अशावेळी पालकांच्या ‘अशा बोलण्यामुळेच’ नंतर मुलांना पालकांची बोलणी खावी लागतात.
No Picture
साहित्य - ललित

छोटीसी बात…. अगम्य ‘शिक्षित’ पालक..!

Category:

 

हिंदीत ‘शिक्षा’ चा अर्थ शिक्षण. आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी ‘शिक्षा’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत,चाखल्या आहेत,गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत. आणि मग उगाच परंपरा खंडित होऊ नये म्हणून याच कल्पक पालकांनी शिक्षेत काळानुरुप बदल करुन त्या आपल्याच मुलांपर्यंत ताकदिने पोहोचविल्या आहेत. मुलांशी गप्पा मारताना शिक्षेचे विविध प्रकार कळले तेव्हा अचंबितच झालो. शास्त्रीय संगीतात ज्याप्रमाणे घराणी आहेत त्याप्रमाणेच या शिक्षा प्रकारात तीन मुख्य घराणी आहेत. त्या त्या घराण्याप्रमाणे शिक्षेचे राग, ठुमरी, टप्पा, ख्याल किंवा फ्युजन असे स्पेशलाइज्ड प्रकार आहेत. ‘घर,शाळा आणि क्लास’ ही शिक्षेची मुख्य उगमस्थाने किंवा घराणी!! संजानाची निबंधाची वही वाचत असताना,जाणवलं की, तिने नवीन निबंध अत्यंत खराब अक्षरात लिहिला आहे.