जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वर्ध्याचे अविनाश जोशी डॉक्टर झाले. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सेवा देत असताना त्यांना पालक आणि मुलांच्या समस्या जाणवल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गतिमंदांसाठी 'मे फ्लॉवर' शाळेचे नंदनवन फुलविले. विशेष शाळा सुरु केली. शेकडो आयुष्ये सावरली. समाजात 'बुद्धी' विषयी जनजागृती व्हावी म्हणून 'म्युझियम ऑफ ब्रेन अॅण्ड माइंड' हा उपक्रम सुरु केला. मानसिक रुग्णांच्या वैवाहिक आयुष्याचा डाव अर्ध्यावरती मोडू नये, म्हणून त्यांनी आता ऑनलाइन मॅरेज ब्युरो सुरु केला आहे...
'मे फ्लॉवर्स' चे नंदनवन
July 14, 2017
राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत.
April 8, 2022
भीमसेन जोशी म्हणजे 'गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
February 4, 2017
ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी!
June 27, 2022
फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी इटली येथे झाला. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती सदैव तेवत राहाव्या म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो.
फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी सेवाभाव, समर्पण आणि प्रेम यांचे प्रतीक असलेल्या आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला होता. हा दिवस जगभर जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिका होण्यास कुटुंबाचा तीव्र विरोध असतानाही फ्लोरेन्स नाईटिंगेलने सारे आयुष्य रुग्णांची सुश्रुषा-सेवा आणि सवरेत्कृष्ट आरोग्यसेवांची उपलब्धी आणि स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी समर्पित केले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जखमी सैनिकांची अहोरात्र सेवा केली आणि संपूर्ण जगाला त्यांनी सेवेचा पायंडा घालून दिला. त्यांच्या सेवेला प्रणाम म्हणून ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी त्यांना प्रदान करण्यात आली. त्यांच्या खडतर तपश्चर्येमुळे परिचर्या क्षेत्राचा उगम झाला.
‘हाती दिवा घेतलेली स्त्री’ अशी त्यांची दंतकथा झाली होती. महायुद्धाच्या काळात तिने हजारो परिचारिकांच्या साह्य़ाने युद्धात जखमी झालेल्या हजारो सैनिकांची काळजी घेण्याचे काम केले. मानवता आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या नाईटिंगलच्या संपूर्ण आयुष्याने जगाला रुग्णांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.
फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचे १३ ऑगस्ट १९१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 15, 2017
देवधर, देबू
मराठी चित्रपटांनी अलीकडे तांत्रिकदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा कात टाकली असली तरी गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांची प्रतिमा, तंत्राच्या दृष्टीने दरिद्री, अशीच होती. ‘कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून चित्रीत करण्यात आलेल्या नाटकांचे स्वरूप,’ बहुतांश मराठी चित्रपटांचे असे, हे नाकारता येत नाही.या आरोपातून मराठी चित्रपटांना ‘मुक्ती’ देण्यासाठी धडपडणारी जी मूठभर माणसे मराठी, चित्रपटसृष्टीत होती त्यात छायाचित्रकार देबू देवधर यांचे नाव महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या चौकटी देखण्या असाव्यात,
त्यांची मांडणी, प्रकाशयोजना यामागे काहीतरी विचार असावा, केवळ प्रसंग चित्रीत करण्याऐवजी, त्या प्रसंगांला, अर्थाला त्या दृश्यांतून उठाव मिळावा आणि एकूण चित्रपटाच्या परिणामात त्याने भर घालावी, यासाठी या सगळ्यांची जाण असलेले छायाचित्रकार आणि दिग्दर्शक असावे लागतात. त्यामुळेच देबू देवधरांना ‘छायालेखक’ हा शब्द फार आवडत असे. ‘छाया-प्रकाशा’च्या मदतीने पडद्यावर चित्र काढणारा अथवा चित्रचौकटींच्या भाषेत आपले लिखाण करणारा तो छायाचित्रकार, अशी व्याख्या देबूदा करीत. त्यांच्या या वैचारिक स्पष्टपणामुळे आणि कलात्मक भूमिकेमुळेच, ‘पाटय़ा टाकू इच्छिणारे’ निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याकडे येण्याचे टाळत असत आणि मोजक्या परंतु मनाजोगत्या कामावर स्वत: देबूदाही खूश होते, त्यामुळेच तीन दशकांच्या वाटचाली त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकी राहिली. देबूदांचे वडील फोटोग्राफर होते व त्यांच्या स्टुडिओतच देबूदांनी ‘स्थिरचित्रणाचे’ पहिले धडे घेतले. त्यातूनच त्यांना ‘हलत्या चित्रणा’चे अर्थात मुव्ही कॅमेऱ्याचे आकर्षण निर्माण झाले व पुढे त्यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये छायाचित्रणाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या संस्थेतून तांत्रिक पदवी मिळविणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांचा व्यावसायिक चित्रपटांमधील तंत्रज्ञांकडे, प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या शिदोरीवर या क्षेत्रात येणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असतो, देबूदा हे त्याला अपवाद होते. प्रशिक्षण हा केवळ पाया असतो, अनुभवातून येणारे शहाणपण कलेच्या क्षेत्रात फार महत्त्वाचे असते, याची जाण त्यांच्या वागण्या-बोलण्यात सतत असे. चित्रपटांसोबत दूरचित्रवाणी क्षेत्रातही ‘कॅमेरामन’ म्हणून काम करताना त्यांनी त्या क्षेत्राची गरज ओळखून आपल्या तंत्रात सहज बदल केला. अर्थात तिथेही त्या माध्यमाकडे गंभीरपणे पाहणाऱ्या जाणत्या लोकांसोबतच काम करण्याचे व्रत त्यांनी कसोशीने पाळले आणि त्या माध्यमाला कमी लेखण्याची वृत्तीही कधी दाखवली नाही. १९७८ च्या सुमारास ते छायालेखक ए. के. बीर यांच्याकडे साहाय्यक म्हणून रुजू झाले, चित्रपट होता ‘दूरियाँ’ (दिग्दर्शक भीमसेन यांचा हा सुंदर चित्रपट, संगीतकार जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे’ अशा गाण्यांमुळे अविस्मरणीय ठरला.) त्यानंतर स्वतंत्रपणे छायाचित्रकार म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘नागीण’ (मराठी) परंतु देबूदांच्या वेगळेपणाची पहिली मुद्रा उमटली ती अमोल पालेकर दिग्दर्शित, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘आक्रित’ या चित्रपटामुळे. त्या काळी गाजलेल्या मानवत खून खटल्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या एकूण ‘डार्क मूड’ला अधिक उठाव देणारे, त्यातील व्यक्तिरेखांच्या मनोव्यापारांना, कृतींना अधिक गहिरे करणारे छायाचित्रण देबूदांनी केले होते. ‘आक्रित’ने एक चित्रपट म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण कलात्मकतेचा, नव्या सिनेमाचा स्पर्श दिला आणि छायाचित्रणाचा नवा विचारही दिला. देबू देवधर त्याच्या केंद्रस्थानी होते. जानेमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार गिरीश कर्वे यांनी देबूदांच्या चित्रणाचे मर्म त्यांच्या ‘डाक्युमेण्ट्री स्टाइल’मध्ये आहे, असे म्हटले आहे. म्हणजे वास्तवाचा वेध घेणारे छायाचित्रण ही त्यांची खासियत होती, असे त्यांना म्हणावयाचे आहे. त्यांची पत्नी श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरकारनामा’ या चित्रपटाची, त्याच्या बजेटची खूप चर्चा झाली. देबूदांनी या चित्रपटाद्वारे ‘डिजिटली शूट’ केलेल्या दृश्यांचा, अर्थात आधुनिकतेच्या आणखी एका अंगाचा मराठीला परिचय करून दिला. त्यांनी मुख्य धारेतील हिंदी चित्रपटही केले, उदाहरणार्थ सचिन यांनी सुभाष घईंसाठी दिग्दर्शित केलेला ‘प्रेम दिवाने,’ श्रावणी देवधरांचा ‘सिलसिला है प्यार का’ परंतु जिथं नृत्यदिग्दर्शक, फाइट मास्टर पन्नास टक्के चित्रपट करतात तिथं छायाचित्रणाला कितीसा ‘स्कोप’ असेल, असे ते म्हणत. त्या त्या प्रसंगांची प्रकाशयोजना अर्थात ‘लाइटिंग’ करण्यात छायाचित्रकाराचे कसब असते. अनेकदा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एखादा ‘स्पॉट’ कॅमेऱ्यातून पडद्यावर येतो तेव्हा खूपच वेगळा, अपरिचित वाटतो. ती किमया छायाचित्रकाराची असते. ‘लाइटिंग’ हे देबूदांचे एक खास वैशिष्टय़ होते. चित्रपट जेव्हा एका दृश्याकडून दुसऱ्या दृष्याकडे सरकतो तेव्हा ‘जर्क’ जाणवू नये, ‘जोडकाम’ दिसू नये यालाच चित्रपटाच्या भाषेत ‘स्मूथ मुव्हमेण्ट’ म्हणतात, त्यात देबूदा ‘दादा’ होते. प्रेक्षकांनी कॅमेऱ्याने चित्रपट पाहू नये तर त्यांचे डोळेच ‘कॅमेरा’ व्हायला हवेत. त्यांना कॅमेऱ्याचे अस्तित्वच जाणवू नये हे छायाचित्रकाराचे खरे कसब असते याचा वस्तुपाठ देबू देवधरांच्या चित्रपटांमधून अनेकदा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक चित्रपट हे, तो चित्रपट आवडो न आवडो देबूदांच्या कामगिरीमुळे डोळ्यांना ते मेजवानी देत. अर्थात पटकथा, दिग्दर्शक, विषय, निर्मिती संस्था, माणसे हे सगळे पारखूनच देबूदांनी बहुतेक चित्रपट केले. त्यांनी अखेरचे चित्रीकरण केले ते ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ची वाटचाल सांगणाऱ्या माहितीपटाचे. सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या व रघुवीर कूल यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाचे चित्रीकरण संपले त्याच दिवशी देबूदांना प्रथम पाठीचे दुखणे जाणवले. त्यानंतरच्या १० महिन्यांत दुखणे विकोपाला गेले आणि देबूदांची ‘छाया’ ‘प्रकाशात’ विलीन झाली!
August 5, 2017
ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात वावरत असताना, मनोज लासे यांनी ठाणे शहर अत्याधुनिक, अतिक्रमणरहित व हरित कसे राहील या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे शहरात रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, नियमित वीज पुरवठा यासारख्या मुलभूत सुविधा त्यांनी गतिमानरित्या पुरविलेल्या आहेत. ठाणे शहराला हरित बनवण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व स्वतःही कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण ठाणे शहराची काळजी घेताना त्यांनी गटारे, पदपथांचे काँक्रिटिकरण, पाणीगळती, व प्रत्येक चौकातील सुशोभिकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.
विद्यार्थ्यांपासून वयोवृध्दांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील लोकांच्या समस्यांना प्रत्यक्षात मदत करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. खारीगाव कळव्यातील राजपार्क सोसायटीजवळ वृध्दांसाठी अद्ययावत नाना नानी पार्क उभारले. शहरातील दळणवळण सुधारण्यासाठी सुसज्ज रस्त्यांना प्राधान्य देण्यासोबतच, खारेगांव येथील स्मशानभूमीचच्या दुरावस्थेमुळे उद्भवणार्या अनेक अडचणींची लक्षात घेत या स्मशानभूमीसाठी ५५ लाखांचा निधी उपललब्ध करून नुतनीकरणास सुरूवात केली.
त्याचप्रमाणे घोलाई भागातील पाणी, रस्ते, शौचालये आदी मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून, त्यांनी काही महिन्यांमध्येच या विभागाचा चेहरामोहरा पालटून दाखविला. सध्या या विभागामध्ये सुसज्ज रस्ते, पदपथावर दिवे, व घाणीचा निचरा करणार्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली आहे. या ठिकाणी विजेची समस्या असल्याने लासे यांच्या हस्तक्षेपामूळे येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळा क्रमांक ६८ चे नुतनीकरणही त्यांनी केले. वास्तू आनंद सोसायटी येथे सधीकरणासाठी धबधबा उभारल्याने हा भाग अधिक रमणीय झाला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
गजानन सरपोतदार हे राजकारणीही होते. गं.नी. जोगळेकर यांच्याविरुद्ध ते निवडणुकीला उभे होते, पण थोड्या मतांनी हरले.
June 25, 2022
सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्घ होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले. ‘न्यू थिएटर्स’ च्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या (नोटेशन्स) बनविणे हाही त्यांचा एक छंद होता. चित्रपटात काम करण्याचीही त्यांना ओढ होती. नागानंद ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; परंतु तो चित्रपट यशस्वी झाला नाही. प्रसिद्घ चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तेथे हूगन आणि मीरसाहेब ह्या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज त्यांना आला. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या करताना स्वतःला सुचलेले नवीन काही ते त्यांत घुसडून देत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्घतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. चाली कशा बांधतात ह्याचे प्रात्यक्षिकच ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ मध्ये सी. रामचंद्रांना मिळाले. थोर संगीतकार अनिल विश्वास ह्यांनी हिंदी संगीतात पाश्चात्त्य संगीताचे स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते. त्यांच्या चालींचे संस्कारही सी. रामचंद्रांवर झाले. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय मुख्यत्वे सी. रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळी भारतीय संगीतातील गोडवा व सुरावटही त्यांनी आपल्या संगीतातून जपली. हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते मा. भगवान ह्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक्कोडी हा तमिळ चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचे संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या सुखी जीवन ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. ‘जयंत देसाई प्रॉडक्शन्स’ चे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपटही त्यांनी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीपजी ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ ह्या चित्रपटसंस्थेत सी. रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे-अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटामुळे त्यांचे नाव भारतभर झाले. अनेक चित्रपट त्यांच्याकडे आले. मा. भगवान ह्यांच्या अलबेला ह्या अफाट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील ‘भोली सूरत दिलके खोटे’, ‘शोला जो भडके’ , ‘शाम ढले खिडकी तले’, ‘मेरे दिल की घडी करे टिक टिक’, ‘ओ बेटाजी ओ बाबूजी’ ही गाणी अतिशय गाजली. त्यांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. विशेषतः ‘धीरे से आजा रे अखियनमे निंदिया’ ही लोरी (अंगाई गीत) हिंदी चित्रपटांतल्या गाजलेल्या अविस्मरणीय लोरींपैकी एक मानली जाते. त्यानंतर फिल्मिस्तानच्या अनारकली ने यशाचा उच्चांक गाठला. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा सर्वाधिक होता. ‘ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत अवीट गोडीमुळे अजरामर ठरले. आझाद, इन्सानियत, तिरंदाज, यास्मिन, शहनाई, नवरंग, नास्तिक, झांझर, शिनशिनाकी बबला बू, दुनिया गोल है हे त्यांच्या संगीत दिग्दर्शना-खालील काही उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांपैकी झांझर व दुनिया गोल है यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केली होती. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीतात त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला होता.
सी. रामचंद्र यांनी संगीतबद्घ केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली. उदा. ‘जाग दर्दे इष्क जाग’ , ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’, ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘देख तेरे संसार की हालत’, ‘ कैसे आऊँ जमुना के तीर’, ‘कितना हसीन है मौसम’ , ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ , ‘इना मिना डिका’, ‘कटते है दुख मे ये दिन’ व ‘तुम क्या जानो, तुम्हारी याद मे’ , ‘आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना’, ‘जलनेवाले जला करे’ इत्यादी. मा.सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले. सुरूवातीच्या काळात आर्. एन्. चितळकर या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी धनंजय व घरकुल हे मराठी चित्रपट निर्माण केले, त्यांना संगीत दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुल मधील गाणी, विशेषतः ‘पप्पा सांगा कुणाचे’ हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत-चीन युद्घाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या भावोत्कट गीतात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केलेले आहे. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मराठी विश्वकोश
January 5, 2017
टॉम ऑल्टर यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
August 7, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti