नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!!

तो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत,.

नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या तासाला कोणी दांडी मारत नसे.
रस्त्यावरून जाणाऱ्या गाडयांना हातातील गजरे हलवून दाखवणाऱ्या त्या लहान मुलीला, बाय गजरे कसे दिले विचारले आणि तिने दहाला एक सांगताच वीस रुपयात दोन गजरे विकत घेतले. न उमललेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेल्या डझनभर गजऱ्यातून फक्त दोन गजरे घेतल्याने देखील त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर लहानसे हसू उमलले.
मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था बेचैन करणारी असतें.
राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा शेवटचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला.

आत्तापर्यंतच्या एकंदरीत संवादानंतर नार्वेकरसर यांच्याही लक्षात आले की मुक्ताच्या कलेबद्दल घरात कोणालाच काही माहित नाही, यामागे काहीतरी ठोस कारण असेल. श्रीधरपंत खूप कडक स्वभावाचे आहेत… याची थोडीफार कल्पना त्यांना होतीच. इतक्या मोठ्या कलाकारावर स्वतच्या घरातच किती अन्याय झाला आहे, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.

थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा)
घराशी गाडी पोहचल्यावर पोलीस पार्वतीला घेऊन उतरले आणि पाहतात तो काय? सुधीरच्या घराला कुलूप होते! पोलीस चक्रावून गेले. त्यांनी फोन लावला. सुधीरने उत्तर दिले, ‘मी पत्नीसह बाहेरगावी आलोय. मी काही आता माझ्या आईला घरात घेणार नाही. तुम्ही तिला कुठेही ठेवा. मला कोरोना झालेली आई घरात नको आहे.’ पोलीस हतबल झाले.
व्हिजिटींग कार्डाची कामं त्यावेळी सारखी येत असत. त्याचं डिझाईन केलं की, निगेटिव्ह पाॅझिटिव्ह तात्यांकडे, ग्राफिनात करुन प्रिंटींगला देत असू. यामध्ये सुरुवातीला भावे हायस्कूल समोरील यंदे स्क्रिन प्रिंटरकडे, काम देऊ लागलो. यंदेची ओळख वेलणकरांमुळे झाली होती. यंदेच्या वडिलांचं मोटार गॅरेज होतं. त्या जागेच्या एका कोपऱ्यात यंदे व सावंत दोघेही स्क्रिन प्रिंटींगचं काम करायचे. तिथं पटवर्धन नावाचा मित्र भेटत असे. त्याला आम्ही ‘नुक्कड’ मधील ‘खोपडी’ हे नाव ठेवले होते. तो हाॅटेलची मेनू कार्ड यंदेकडून प्रिंटींग करुन घेत असे.
Copyright © 2025 | Marathisrushti