(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • त्यांच्या तत्त्वाच्या प्रकाशात

    प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो.

  • शेवटी जातीने घात केला ….

    सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .

  • मंचकमहात्म्य – बारक्या

    सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते.

  • एक परीस स्पर्श ( भाग – २५ )

    विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली.

  • मित्र असावा, तर असा

    सरांना पुण्यात कोथरुड येथे येऊन चार वर्षे झालेली आहेत. सरांच्या रोजच्या पोस्ट वाचणारे वाचक असंख्य आहेत, मात्र ती वाचून व्यक्त होणारे, बोटांवर मोजण्याइतकेच.. ही खंत कुलकर्णी सरांनी अनेकदा फेसबुकवर व्यक्त केली.. आता मी लेखन बंद करणार असेही जाहीर केले.. अशावेळी अनेकांनी पोस्ट लिहिणं बंद करु नका, अशी विनवणी केली.. सरांनी पोस्ट लिहिणं चालू ठेवलं…

  • ख’वट सावित्री

    वर्षातून एकदाच येणारा, माझा ‘वट पौर्णिमेचा सण’ या तमाम मराठी मालिकावाल्यांनी, त्यांच्या कथानकातील ‘कट कारस्थानां’नी उधळून लावलाय.. पूर्वी साधंसुधं ‘दूरदर्शन’ असताना वट सावित्रीच्या व्रत वैकल्याचे, या दिवशी गोडवे गायले जायचे. या दिवसाचं निमित्त साधून वट पौर्णिमेचं एखादं गाणं किंवा प्रसंग असलेला मराठी चित्रपट आवर्जून दाखवले जायचे. त्याकाळातील सुलोचना, आशा काळे, इंदुमती पैंगणकर, उमा भेंडे, अलका कुबल, इ. सोज्वळ नायिका, मला प्रसन्न करण्यासाठी वडाच्या झाडाला धागा गुंडाळत, भक्तीभावाने सुमधुर गाणी म्हणायच्या..मला अगदी कृतकृत्य वाटायचं..

  • जोडावी – भाग ४

    विजय लॅपटॉपवरील त्याचे काम पूर्ण झाल्यावर लॅपटॉप बंद करतो आणि…..

  • चिचा

    आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.

  • आपलं’ दुकान..

    आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. तसंच आपण जिथं राहतो, त्या परिसरात मराठी माणसाचं दुकान दिसलं तर आपण पहिल्यांदा त्याच दुकानात खरेदीला जातो. माझं बालपण तर सदाशिव पेठेतच गेलं. तेव्हा मराठी माणसांची दुकानं भरपूर होती. अगदी भाजीवाल्यापासून ते मिठाईवाल्यापर्यंत!

  • उगाच काहीतरी -२६

    12 जुलै 2022 ला नासाच्या JWST ( James Webb Space Telescope) ने पाठवलेल्या छायाचित्रांचा पहिला लॉट बेस स्टेशन ला प्राप्त झाला आणि सगळ्यांमध्ये उत्साह पसरला. आलेल्या छायाचित्रांची छाननी करताना एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि बेस स्टेशनवर एकच खळबळ माजली. त्या फोटोत करोड़ों प्रकाशवर्ष दुर आजवर कधीही नजरेत न आलेला एक अतिशय प्रखर चमकदार प्रकाश दिसत होता. सगळे आश्चर्यचकित झाले की आजवर हा प्रकाश कसा लक्षात नाही आला?