नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

आपण खूप मोठी शाब्दिक कोटी केल्याचा आनंद सिंगच्या डोळ्यातून वहात होता. अंजुला सगळं सगळं आठवलं. घर सोडल्यापासून इथं पर्यंत केलेला प्रवास, त्यात ते रुतलेले काटे, त्या वेदना, त्या खोट्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग. एकावर एक पचवलेले दुःखाचे कढ…… आणि या सर्वात निस्सीम प्रेम करणारा संजू!
यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली.

परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं?

कंदाहार हा दक्षिण अफगाणिस्तानातला पहाडी प्रांत. या प्रांतातले पुरुष लढवय्ये आहेत आणि स्त्रिया सौंदर्यसंपन्न. कंदाहारी ‘पाश्तुन’ जमातीच्या अलिकडे झालेल्या डी. एन. ए. चाचण्यांवरून ते आर्यांचे वंशज असल्याचे आढळले आहे. आर्यांनी सुमारे 2300 वर्षापूर्वी या प्रदेशावर आक्रमण केले होते. तिथल्या पठाण कुटुंबात जन्मलेली एक मुलगी दिसायला खूप सुंदर होती. अकरा भावंडात पाचव्या नंबरची.

अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही!

एका “नितळ” मनानी दुसऱ्या अशाच एका “नितळ” मनाशी संवाद साधला .. त्याला अनुसरून केलेली ती तितकीच “नितळ” प्रतिक्षिप्त क्रिया .. समोरून दिलेला तितकाच “नितळ” प्रतिसाद .. इतकं साधं आणि सोपं आयुष्याचं गणित होतं ते !..

मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या साईटवर आलो.


झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता.
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे!
Copyright © 2025 | Marathisrushti