नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.

विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते. त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते.

हॉलमध्ये तुफान गर्दी . सगळीकडे झगमगाट .
फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलाय की टेलर ने वाकडी तिकडी कैची चालवून शिवलेल्या वस्त्राला फॅशन म्हणून स्वीकारलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन. परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट. काहींच्या तोंडी, त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा सुवास.
मेरा गाव मेरा देश’ चित्रपटाचे वेळी महेश भट्ट, राज खोसलांचे सहदिग्दर्शक होते. या शुटींगच्या दरम्यान विनोद खन्ना व महेश भट्ट यांची जिवलग मैत्री झाली. संजय दत्तच्या पदार्पणातील ‘राॅकी’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना सुनील दत्त यांना नर्गिसच्या उपचारासाठी वारंवार परदेशात जावं लागे. तेव्हा राज खोसला यांनी मैत्रीला जागून, उर्वरित चित्रपट पूर्ण केला.

यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली.
सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.

बाळाप्पा खोत बऱ्यापैकी श्रीमंत. दहा एकराचा काळ्याभोर मातीचा मळा, त्यात असणाऱ्या दोन तुडुंब भरलेल्या विहिरी. एक विहिरीला पंप तर दुसरीला मोट, शेताला पाणी पाजवून हिरवं गार करायची आणि बाळाप्पाचा खिसा नोटांनी भरत ठेवायची.

ही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची. खरं तर ही कोणाचीही असू शकेल. कारण ही गोष्ट माझीच तर नाही, असंही अनेक वेळा मलाच वाटून गेलेलं आहे. तर हा मित्र आणि आणखी एक सहकारी आम्ही मुंबईला गेलो होतो. कामकाज आटोपल्यावर लिंकिंग रोडला सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्यावरची दुकानं आणि तयार कपड्यांचे ढीग आम्हाला आकर्षित करीत होते. अखेर एका ठिकाणी थांबलो. काही शर्ट-टी शर्ट पाहिले. माझ्या मित्राला एक टी शर्ट आवडला. त्यानं तो घेतला. दोनशे रुपये किंमत होती, ती दिली. येताना अर्थातच चर्चेचा विषय होता, तो खरेदीचा, त्या टी शर्टचा. “शर्ट चांगलाय, पण त्याचा रंग आणि आडवे पट्टे हे काही तुला शोभणार नाही,” एकानं आपला अभिप्राय दिला. “कधी तरी वेगळं काही घालून पाहायला हवं,” मित्रानं त्याला प्रत्त्युत्तर दिलं.

मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .
१९६३ सालची गोष्ट आहे.. सी. विश्वनाथ या दिग्दर्शकाने एस. फत्तेलाल यांना सांगितलं की, आपण मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रीकरण करुयात. त्यासाठी दोघेही मुंबईला पोहोचले.
Copyright © 2025 | Marathisrushti