नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
२००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला.

अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ?

आमच्या या आजीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून शं ना नवरेंचं बैठ घर दिसे … कधी कधी त्यांच्या घरातली मंडळी ही दिसत … मग स्वयंपाक करता करता कुणीही दिसलं की त्यांच्या आणि आजीच्या गप्पा चालत .. त्यात आज कुठला खास पदार्थ बनलाय तिथपासून त्या पदार्थाची रेसिपी आणि त्याच्या साठी लागणाऱ्या साहित्यासाठी केलेली धावपळ इतक्या गोष्टींचा उहापोह होई .. त्याचबरोबर त्यांच्याकडे काय बनलंय .. महागाई कशी वाढतेय , पाऊसपाण्यIच्या गप्पा , तब्येतीच्या चौकश्या .. स्वयंपाक करता करता सगळ पॅरॅलली चालत असे .
माणसं जोडणारी , आमच्या घरदाराला एकत्र बांधणारी , हौसेने वेगवेगळे पदार्थ करून सर्वांना खाऊ घालणारी .. आमची आजी ! तिला तिचा भाऊ अभिमानाने गौरी म्हणे . कारण तिचं सुंदर रुप …उंच शेलाटा बांधा , गौरवर्ण , हसरा चेहरा , मोठया केसांची वेणी .. त्यावर माळलेले अनंताचे फुल .. अगदी रोज हं … रोज पहाटे आन्हिकं आवरून घरामागच्या बागेत जाउन फुलं गोळा करायची आणि देवपूजा झाली की आपणही एक फुल हौशीने माळायचं ..आणि मुलींना सुनेला ही घालायला लावायचं .. फुलांची दांडगी हौस , ही तिच्याकडून आईकडे आणि नंतर माझ्या कडे अशी झिरपत आलीये … गाण्याचा कान …गाणं म्हणायची हौस , वाचनाची आवड ….

तशी ती सॉलिड आहे , सगळ्यांना माहित आहे हे , तसे तिलाही माहीत आहे. पण मला ती फार उशीरा खरी कळली .

ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले…..

आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते !

विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच…

१० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला.

माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti