(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • राणी’ आय मिस यू !

    माझ्या लहानपणी घरापेक्षा अंगण मोठे असायचे . शिवाय घरा मागे पण मोकळी जागा असायची . तेथे गुरांचा गोठा आणि त्यात एखादी दुभती म्हैस किंवा गाय असायची . बैल बारदाना शेतात . अंगणात तुळशी वृंदावन त्याचा समोर एकाच दगडात कोरलेले नंदी आणि शिवलिंग असे . अंगणात सकाळी सडा हे नित्यकर्माचा भाग असे . संध्याकाळी कधीतरी नुसते पाणी शिंपडले जाई .तुळशी वृन्दावना समोर रोज तिन्हीसांजेला सांज वात , त्याचा समोर हात जोडून नऊवार साडीतली माझी आई , निरांजनाच्या तांबूस प्रकाशात तिचा उजळलेला चेहरा हे चित्र माझ्या मनावर कायमचे कोरलेले आहे . आम्हा लहानग्यांचा वावर घरा पेक्षा अंगणातच ज्यास्त . घर कश्याला ? तर जेवायला आणि झोपायला !

     

  • माझा वाढदिवस

    आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल (प्रकरण १)

    एकदोन वेळा बिपीन घरी आला होता, पण आई बरोबर संवाद नवता, आणि दोघांची मनाची तार जुळलीच नव्हती, संगीता मात्र त्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडलेली होती. संगीताच्या लग्नाच्या निर्णयाने आई पार ढासळून गेली, आपल्या परीने समजावण्याचे प्रयत्न केले. प्रचंड झंजावातात दोघी एकमेकीं पासून दूर फेकल्या गेल्या होत्या.

  • ये रेशमी जुल्फे

    मुमताजसाठी शहाजहानने ताजमहाल बांधला, हे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं. आमच्या पिढीनं हिंदी चित्रपटातील मुमताजसाठी, आपापल्या हृदयालाच ‘ताजमहाल’ केलेलं होतं…

  • मोहोरलेले अलिबाग

    हिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात.

  • तेरी मेरी ‘कहानी’ है…

    गेल्या रविवारी रात्री टीव्ही वर ‘इंडियन आयडाॅल’ कार्यक्रम पाहत होतो. प्यारेलाल सपत्नीक आलेले होते. त्यांची एकाहून एक सरस गाणी नवे गायक गात होते. काही वेळाने व्हिलचेअरवरुन एका व्यक्तीला स्टेजवर आणले गेले. ते होते ज्येष्ठ गीतकार संतोष आनंद. सहस्त्र चंद्रदर्शन करण्याच्या वयामध्ये आपल्या एकमेव चांदणीसह (नातीसह) त्यांनी संवाद साधला. परिस्थितीने गलितगात्र असताना देखील स्वाभिमानाने नेहा कक्करने देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारली. जेव्हा तिने एका ‘नाती कडून ही भेट’ समजा, असे विनवल्यावर मदत स्वीकारली. ‘एक प्यार का नगमा है…’ ह्या गाण्यामध्ये त्यांनी त्यांचाही आवाज मिसळला. ते जे काही बोलले, ते ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले…

  • दोन घडीचा डाव

    ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..

  • स्मृतीगंध

    इतिहासाच्या पानामध्ये दडल्या गूढ कथा
    त्यातुन काही उचलून आणि मानवतेच्या व्यथा

    अवगत तुजला असतील आता यातील काही गोष्टी
    फिरत फिरत ही अवनी आहे बदलत आहे सृष्टी ।।१।।

    उचलून घे तू मित्रा आता यातील काही दाणे
    बदलत आहे धरती सारखी हेच आमुचे गाणे

    नको पाहु तू मागे वळुनी पुन्हा - पुन्हा जेणे
    जुन्या स्मृतीच्या पायावरती हे तर सुंदर लेणे ।।२।।।

    -- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य

  • शिकारी क्वार्टरमेनची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १८)

    किंग सॉलोमन्स माईन्स हा चित्रपट अनेकांना ठाऊक असेल. ती कादंबरी आणि त्यावरील चित्रपट खूप गाजला.लेखक हॅगार्ड ह्यांनी स्वतः दीर्घकाळ आफ्रिकेत वास्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना वास्तवाचं रूप येत असे. प्रस्तुत कथा ही किंग सॉलोमन्स माईन्सची कथेची प्रस्तावनाच असल्यासारखी आहे. मूळ कथा ६५००हून अधिक शब्दांत आहे. मी ती २४६० शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे. ब्रिटीश कसे साहसी होते व त्यांना त्या त्या देशांतील लोकांनी कशी साथ दिली, ह्याचाही प्रत्यय येतो. मागच्या वेळची कथा ही खोट्या शिकारीची होती तर ही खरोखरीच साहस आणि भय असलेली शिकारकथा आहे.

  • अजब न्याय नियतीचा – भाग ७

    आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते.