नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता.
“”ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत्-रासायनिक यंत्र आहे. शब्द वा ध्वनीसंकेत यातून आपण घरातल्या अजाण बालकाच्या प्राथमिक स्मृती तयार करत असतो. त्याच स्मृतीच्या आधारे बालक आसपासच्या जगाचे अनुभव घेऊ लागते. त्यातुन आपल्या स्वत:च्या स्मृती तयार करून मेंदूला कार्यान्वित करू लागते.
चित्रपटाचे संगीतकार नौशाद हे ट्रायल पाहून, तणतणत मंगेश देसाईकडे आले व ‘साले, साऊंड मिक्सींग करनेवाले, मेरे गाने का सत्यानास किया तुने xxxx’ असे आवाज चढवून भांडू लागले. मंगेशने देखील त्यांना वरच्या पट्टीतच उत्तर दिले, ‘थिएटर में देखना और बुरा लगे तो इधर वापस मत आना xxxx’ ‘पाकिझा’ चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ पाहून नौशाद, मंगेश देसाईला भेटायला आले व अक्षरशः त्याला लोटांगण घातले.

ती त्या दिवशी माझा नंबर घेऊन गेली ती गेलीच. मी पण विसरून गेलो, म्हणा अशा अनेक भेटतात ..
मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला.
सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक.
व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे.
जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
तुजविना करमेना मज होई लाही
जयदेवी जयदेवी ......... !!
तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या
जयदेवी जयदेवी..... ।।१।।
अर्धांगी गायी ते अंगाई गीत
होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत
अखेरी वाचीत बसतो कविता
तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
जयदेव जयदेवी.... ।।२।।
व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
बेरके कवडे काहीही बोले
परंतु तुजला दयेचा लेश
तुजला लाजला शिव महेश
जयदेवी जयदेवी .......।।३।।
आता मात्र बाबा कमाल झाली
निद्रेवाचून होई जीवाची लाही
घेऊन हातात कवितेचे बाड
माझेच बसलो करीत लाड
जयदेवी जयदेवी ..... ।।४।।
लागली लागली तुझी चाहूल
तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
वाचीत वाचीत झोपून गेलो
दिव्याची आठवण विसरून गेलो
जयदेवी जयदेवी ..... ।।५।।
-- द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही.
त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती.
सगळी पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती.
सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं.
तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं.
झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल.
त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल.
झाडाखालचं गवत सुध्दा लहान लहान गोल.
तर मैदानातलं गवत मात्र मोठे मोठे गोल.
पण,
काही झाडं डुलणारी.
काही झाडं सळसळणारी.
काही झाडं लठ्ठं होती.
काही झाडं रोड होती.
काही झाडं जरा ऊंच होती.
काही झाडं जरा बुटकी होती.
काही झाडं फारच लहान होती.
काही झाडं ऊंचंच ऊंच होती.
काही झाडं एकदम सरळसोट.
काही झाडं विचित्र वेडीवाकडी.
झाडांना वाटे,
आपले आकार निरनिराळे.. ..
पण आपल्या पानांचा मात्र एकच एक आकार!
का बरं असं?
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे आकार हवेत.
आपल्याप्रमाणे पानांचे पण वेगवेगळे प्रकार हवेत.
प्रत्येक झाडावरची पानंसुद्दा वेगवेगळी हवीत.
प्रत्येक रंगीत पानाची रंगत वेगळी हवी.
प्रत्येक पानाची स्टाइल वेगळी हवी.
आणि खरंच,
दसऱ्या दिवशी. . . . . . .
गाई म्हशी आल्या.
ढकलाढकली करत.. गोल गवत चराचरा चरू लागल्या.
शेळ्या बकऱ्या आल्या..
झाडावरती दोन पाय ठेवून, जवळची पानं बचाबचा ओरबाडू लागल्या.
जिराफ आले..
ऊंचावरची कोवळी पानं खुडून खुडून चघळू लागले.
हत्तींचे कळप आले..
झाडावरची पानं, मैदानातलं गवत मन मानेल तसं रपारप उपटू लागले.
माकडांच्या टोळ्या आल्या..
झाडावरची पानं तोडत आरडाओरड करू लागल्या.
पक्ष्यांचे थवे आले..
घरटं बांधण्यासाठी चोचीने पानं,गवत टुकूटुकू खुडू लागले.
छटेमोठे रंगीबेरंगी किडे आले..
मचामचा पानं खाऊ लागले. कुटूर कुटूर कुरतडू लागले.
कुणी पानं अर्धवट खाई..
तर कुणी मधलं मधलं गवतच तोडी.
कुणी चोचीनं पानं कातरी..
तर कुणी भराभरा पानं ओरबाडी.
कुणी नखानं पानं चिरी..
तर कुणी पंजाने पानं खुडी.
कुणी अर्धवटच पानं खाई..
तर कुणी उगाचंच पानं फाडी.
पण काही पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.
आणि त्यामुळे. . .
काही पानं सरळ,
तर काही पानं लांबुडकी झाली.
काही पानं टोकेरी,
तर काही पानं पसरट झाली.
काही पानं कातरलेली,
तर काही पानं नक्षीदार झाली.
काही पानं विचित्र झाली,
तर काही पानं चित्रविचित्रच झाली.
काही पानं उभी झाली,
तर काही पानं लोंबकळू लागली.
काही पानं अगदी एकसंध राहिली,
तर काही पानं पार फाटून गेली.
पण,
ज्या पानांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही,
ती पानं मात्र गोलम गोलच राहीली.
तेव्हापासूनच...
सगळ्या पानांचे आकार वेगवेगळे झाले.
प्रत्येक झाडाची पानंसुध्दा वेगवेगळी झाली.
झाडं आनंदाने फुलली
तर
पानं मजेत सळसळली.
-- राजीव तांबे.
लहानपणी आपल्यासाठी आईने स्वतःच्या हाताने केलेले अंगडे टोपडे किंवा कानटोपी, उतारवयात जर हातात आली तर आपलं मन त्या भूतकाळात जातं.
Copyright © 2025 | Marathisrushti