(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • व्यवस्थेचे गुलाम

    कर्नल सावंत निवृत्त होणार होते. आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता.
    सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो. सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते. अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, मान ताठ ठेवायची व देशरक्षणासाठी सज्ज रहायचे एवढेच त्यांना ठाऊक होते. त्यांच्या बदल्या झाल्या व ते कुटुंबासह एका शहरांतून दुसऱ्या शहरांत चार वेळा गेले पण त्यांना नवीन ठीकाणी रहाण्यांत विशेष अडचणी आल्या नाहीत कारण आर्मी पाठीशी असे. रहायला चांगले घर व इतर सर्व सोयीही बघितल्या जात.

  • जैसे ज्याचे कर्म तैसे

    गब्बरच्या नकळत शेवटी दुसरी गोळी मात्र कालियाला लागलीच.. बाटली पुढे आणणारा पांडुरंग समोरच बसलाय हे त्या रखमाबाईना कसं सांगणार? सहन होत नाही आणि सांगताही येत नाही..

  • आरती निद्रादेवीची

    जयदेवी जयदेवी जय निद्रादेवी
    तुजविना करमेना मज होई लाही
    जयदेवी जयदेवी ......... !!

    तुझ्या प्राप्तीसाठी मी खाई अॅस्प्रो
    किंवा जाऊनी बैसे रॉक्सीत वा मेट्रो
    डोळ्यावर बांधुनी पाण्याच्या पट्ट्या
    तरीही झोपेचा झाला बोलबट्ट्या

    जयदेवी जयदेवी..... ।।१।।

    अर्धांगी गायी ते अंगाई गीत
    होईल त्यामाजी बिल्डिंग जागृत

    अखेरी वाचीत बसतो कविता
    तुझ्यासाठी खाव्या मी किती खस्ता
    जयदेव जयदेवी.... ।।२।।

    व्हिस्कीचे रिचवुनी पोटात पेले
    बेरके कवडे काहीही बोले
    परंतु तुजला दयेचा लेश
    तुजला लाजला शिव महेश
    जयदेवी जयदेवी .......।।३।।

    आता मात्र बाबा कमाल झाली
    निद्रेवाचून होई जीवाची लाही
    घेऊन हातात कवितेचे बाड
    माझेच बसलो करीत लाड
    जयदेवी जयदेवी ..... ।।४।।

    लागली लागली तुझी चाहूल
    तुझ्याविना माझा जीव व्याकूळ
    वाचीत वाचीत झोपून गेलो
    दिव्याची आठवण विसरून गेलो
    जयदेवी जयदेवी ..... ।।५।।

    -- द्वारकानाथ शं. वैद्य (जयंता)

  • शेरदिल ‘शेरू’

    शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले.

  • मृगजळ

    एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती,  त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा .

  • ती’ तिच्या सोबतच !

    मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती .

  • भटकंतीतील भुतनी

    अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच!

  • भाऊबीजेचा डब्बा

    आगरीकोळी समाजात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत ही परंपरा आहे. आताच्या जमान्यात भाऊ बहिणीला हिस्सा द्यायला मागत नाहीत आणि बहिणी पण सोडायला मागत नाहीत.
    पण काही बहिणींची माया अशी आहे की त्या अजूनही काय दिलं किंवा काय मिळणार असं मनात येऊ न देता लाडक्या भावाची माहेरी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात.

  • ऑटो भास्कर!

    हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.

  • किस्सा रघ्याचा !

    दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.