नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

किस्ना पेंटर मंजे एक दिलदार अन तितकचं अवली व्यक्तीमत्व व्हतं.कुंचल्यानं जसे चित्रात रंग भरायचा तसेच जिवनात बी रंग वतायचा.त्यामुळं त्याचा गोतावळा लय मोठा व्हता.कुंचल्याच अन त्याच्या हाताचं एवढं घट्ट नातं व्हतं की त्यानं काढलेली चित्र अक्षरशः जिती व्हयाची.असा हा अवलीया जिथ जायचा तिथं रंग भरायचा..

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले म्हणाली, “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी. माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.”

हे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.

तिचं “घड्याळ” सुद्धा “त्यांच्याच वेळेप्रमाणे” चालायचं …. दिवसामागून दिवस जात होते ….सुरवातीला सोसायटीत , शेजारी पाजारी, देवाधर्माचं करण्यात किंवा TV बघण्यात थोडा वेळ जायचा पण जसं वय वाढू लागलं तसा त्या सगळ्याचाही उबग येऊ लागला , “एकटेपणा” जाणवू लागला …. आपली हक्काची आणि जवळची माणसं दूर असल्याची खंत वाटू लागली

मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते.

प्राथमिक शिक्षणाची परवड
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले.
एकाच छताखाली सर्वांना एकोप्याने बांधून ठेवणारं, टीव्ही बंद करुन खेळीमेळीने जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडताना देवघरातील अंगारा कपाळावर लावायला सांगणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं व संकटाच्या वेळी देवांना पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं कुणीतरी मोठं माणूस घरात असायलाच हवं..

दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले. ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही खाली उतरले. त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले.

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं.
Copyright © 2025 | Marathisrushti