(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • विस्मय (अलक)

    दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले.

  • अमेरिकन गाठुडं – ९

    ऑस्टिन! सकाळी साडेआठची वेळ! पारा पाच अशांवर! आभाळ म्हणजे, राखेडी रंगाचं विशाल घुमट. सूर्याचे अस्तित्व म्हणजे, त्या घुमटातून पाझरलेला, वस्त्रगाळ प्रकाश. पडून गेलेल्या पावसाचे अवशेष परिसरात आणि आसमंतात बिलगून राहिलेले. वातावरणात एक गूढ आणि गोड अशी (‘ती’च्या आठवणींची) कातरता! अधून मधून, गार रेशमी झुळका आसपास लहरून जात होत्या.

  • हां बाबू, ये ‘सर्कस’ है

    भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले.

  • साकव

    १९९० च्या सुमारास एक पंधरा सोळा वर्षांचा खेडवळ तरुण मुलगा आमच्या ऑफिसमध्ये आला. त्याला ‘मनोरंजन’च्या मोहन कुलकर्णीने डिझाईसाठी, आमचा पत्ता दिला होता. अत्यंत साध्या कपड्यामधील त्याला पाहून, हा कोणत्या कामासाठी आपल्याकडे आला असेल? याचा विचार मी करु लागलो.

  • व्यवहार

    आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्या म्हाद्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात राघवने खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता .

  • हा ‘छंद’ जीवाला लावी पिसे..

    मराठीमध्ये एम.ए. केलेल्या मीराताई अतिशय हुशार, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. वर्षातून एकदा येणाऱ्या हरतालिकेच्या मूर्तीसारखाच प्रसन्न चेहरा, गोरा रंग, कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली, काठपदराच्या साडीमध्ये त्या सदैव हसतमुख दिसायच्या.

  • “सख्खे शेजारी”

    खूप वर्षांपूर्वी कुठंतरी वाचलं होतं, ‘शेजारी’च आपला खरा ‘पहारेकरी!’ जुन्या काळी चाळींमध्ये राहणारी माणसं एकोप्याने नांदायची. प्रत्येक कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्याचं आपुलकीने लक्ष असायचं. जमाना बदलला. आता चाळी पाहायलाही मिळत नाहीत.

  • सेलर्स डॉटर

    जहाजावरुन परतल्यावर पुढील नऊ महिने उलटून गेले तरी मला पुन्हा जहाजावर जॉइन करायची इच्छाच होत नव्हती. मुलगी चालायला लागली होती, इवल्याशा नाजूक बोटांनी मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रोल करून फोटो बघणे, हसणे आणि खिदळणे आणि घरात पहिलीच मुलगी आणि एकटी सगळ्यात लहान असल्याने सगळ्यांकडून नुसतं लाड आणि कौतुक चालू असायचे , तिच्या जन्मापासून तेव्हाही आणि आजही घर आनंदाने अक्षरशः ओसंडून वाहत आहे.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२

    दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले.  ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही  खाली  उतरले.  त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले.

  • स्वामी विवेकानंद- भाग ३

    स्वामी विवेकानंदानी सर्वधर्मपरिषदेला हजर रहावं आणि त्या परिषदेत धर्माबद्दल एक नवाच विचार मांडावा, ही नियतीचीच इच्छा असावी. स्वामीजींचे समर्थक, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणारे राजे, त्यांचे शिष्य कोणालाही परिषदेच्या तारखा जाणून घ्याव्या हे सुचलं नव्हतं.