(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • कोळशातील ‘हिरा’

    एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली… काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली…

  • अजब न्याय नियतीचा – भाग ८

    ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले.

  • स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी

    अपवाद सोडले तर जगात सगळ्यांना ईझीमनी हवा असतो . कष्ट न करता , किंवा अगदी कमीतकमी कष्टात जास्त पैसे मिळवणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं . त्यासाठी जगन्मान्य असा मार्ग म्हणजे शेअर बाजार.

  • इम्युनिटी अनलिमिटेड

    ” हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव .

  • झुंज !

    जर तुम्हाला त्यांच्या स्वप्नात जाण्याची परवानगी असती तर, भास्करराव चिकाटीने त्या वाघाशी झुंज देताना दिसले असते! कोणी तरी मदतीला येई पर्यंत त्यांना त्या जनावराला थोपवणे भागच आहे!!

  • जोशीबुवा मासिकवाले

    २००० सालापासून डिजीटल तंत्रज्ञान आले. इंटरनेटमुळे पाहिजे तो संदर्भ सेकंदात मिळू लागला. जगातील कोणत्याही चित्रकाराची माहिती, चित्रं सहज उपलब्ध होऊ लागली, डाऊनलोड करता येऊ लागली. परिणामी जोशी बुवांचा व्यवसाय कालबाह्य झाला.

  • दिवाळी अंक

    त्यांच्याकडे गेलं की, कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यावर ते स्वतःच्या हाताने काॅफी करुन द्यायचे. कथाचित्र कसे हवे आहे ते स्वतः पोझेस घेऊन दाखवायचे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. वेळ सांगून यायला जमणार नसेल तर फोन करुन तसे सांगण्याची, त्यांनी मला ताकीद दिली होती.

  • गोमुचा डीसकाउंटेड स्मार्टफोन (गोमुच्या गोष्टी – भाग ३)

    मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती.

  • महानगराचे पिकलेपण (कथा)

    कुणीतरी विचारलं, कहां जाना है? वाचता येत असतं तर तुला कशाला विचारलं असतं? असा म्हातारीचा रोखठोक प्रश्न ऐकून प्रश्नकर्ता मागच्या मागे सटकलेला होता

  • फ्युज उडालेले बल्ब

    शहरातील पाॅश एरियातील हाउसिंग सोसायटीमध्ये, रहायला येऊन मला पाच वर्षे झाली होती. मी भारतीय नौदलात पस्तीस वर्षे सेवा करुन निवृत्त झालो होतो. रोज सायंकाळी आम्ही आठ दहाजणं ज्येष्ठ नागरिक, सोसायटीच्या बागेत गप्पा मारत बसायचो. त्यामुळे वेळ मजेत जात असे.

    गेल्या महिन्यापासून आमच्याच वयाची एक नवीन व्यक्ती आम्हाला बागेत दिसू लागली होती. ते गृहस्थ उंचेपुरे व धिप्पाड शरीरयष्टीचे होते. ते आमच्या समोरुन जाताना, आमच्याकडे तुच्छतेने पहात असत. बागेत दोन चकरा मारुन झाल्यावर कोपऱ्यातील बाकड्यावर, ते एकटेच बसत. कधी कुणाशी बोलणे नाही, कुणाला पाहून हसणं नाही.. आम्हा सर्वांना त्यांचं वागणं हे चमत्कारिकच वाटायचं..