नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

सिंहावलोकन करताना आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे बघताना मनात कृतज्ञता दाटून येते . अर्ज करून , कागदपत्रे सादर करून आणि अनेकदा पैसे भरून पुरस्कार मिळवण्याचा आत्ताचा हा काळ . पण मला जेव्हा पुरस्कार लाभत होते तेव्हा यातील काहीही मी केले नव्हते , हा विचार माझ्या मनाला सुखावून जातो . कारण तेव्हा अनेक संस्था , व्यक्ती , वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यवस्थेतून माहिती मिळवून पुरस्कार देत असत .हा अनुभव अनेकांना त्याकाळात आला असेल .
मला वाटते की लेखन करणाऱ्याला , काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीला , सामाजिक कार्यात अखंड गुंतून पडलेल्या व्यक्तीला किंवा जगावेगळं काहीतरी करणाऱ्याला ऐन उमेदीत पुरस्कार लाभला तर उर्वरित आयुष्यात ती व्यक्ती किंवा संस्था अधिक कार्यप्रवण होऊ शकतात .
सतत लेखन करत राहण्याची उर्मी आणि प्रेरणा मला या पुरस्कारांनी दिली , असे म्हटले तर वावगे ठरू नये .
आपण काहीतरी चांगले काम करत असतो आणि कुणी ना कुणी त्याची दखल घेत असतो , हे मी अनुभवलं आहे .

जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे.

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले.
कालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते.
शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले.
हा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.
‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.
दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.

विजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता.
विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.
Copyright © 2025 | Marathisrushti