(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १९

    संगीता रात्री ९ नंतर कामावरून परतत असे. अखंड बॅंकेचा कामात वाहून घेणे हेच तिचे जीवन होते. त्यांच्या घरातील फोनची घंटा वाजू लागली, तिच्या आवाजा वरून ती ट्रंक कॉलची आहे हे आजींच्या लक्षात आले.

  • भुयारी

    पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला.

  • लावशील क्लास तर होशील पास

    काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.

  • रेशीमगाठी – भाग २

    “अग, ही मुंबई आहे. नगर नाही. इथली गर्दी आणि त्यातही ती ऑफिस टाइमच्या लोकलची. अग, नुसती गर्दी पाहूनच रोज जाणाराही हबकतो तर हिची काय कथा? इंटरव्हूला जाईपर्यंतच चिपाड होईल तिचं!”

  • एक परीस स्पर्श ( भाग – १६ )

    विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते.  त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते.

  • राजमुकुटाची चोरी

    खारच्या सोळाव्या रोडवरील “निवांत” ह्या बंगल्यात नेहमीप्रमाणेच शांतता होती. तो बंगला खाजगी डिटेक्टीव्ह यशवंत धुरंधर ह्यांचा होता. बंगल्यात ते, त्यांचा भाचा व मदतनीस चंद्रकांत नवलकर, त्यांच्या घराची व्यवस्था पहाणाऱ्या आत्या नसलेल्या पण आत्याबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वयस्क बाई, सदू नांवाचा एक अर्धवेळ काम करणारा पण तिथेच रहाणारा व शिकणारा गडी, रहात.
    निवांत जरी निवांत असला तरी निवांतकडे एक एसयुव्ही वेगाने येत होती आणि त्यांत बसलेले दिवाण अस्वस्थ होते. ती गाडी निवांतसमोर येऊन उभी राहिली. तेव्हा यशवंत भाच्याला म्हणाले, “चंदू, बाहेर जाऊन दिवाणजींचे स्वागत कर आणि त्यांना आंत घेऊन ये.” चंदू गोंधळला. त्याने विचारले, “हे कोण दिवाणजी ?” यशवंत हंसले आणि म्हणाले, “अरे, मध्यप्रदेशमधील XXपूर संस्थानचे दिवाण आहेत ते.

  • जादू की झप्पी

    टीव्हीवर एकामागून एक चॅनलची सुरू असलेली ढकलगाडी एकदम मुन्नाभाई एम बी बी एस वर येऊन थांबली .. त्यात “जादू की झप्पी” चा प्रसंग सूरु होता . यानी त्या शाळेच्या पुस्तकातून नजर वर करत टीव्हीकडे बघितलं आणि गालातल्या गालात थोडा हसला . बायकोनी हेरलं ते .

  • पारवा

    पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा

  • गहाण मिशी

    खंडु पाटील मंजे गावातली नामी आसामी व्हती.आजुबाजुच्या दहा पंधरा खेड्यायतं गड्याचा रूतबा व्हता.गावातुन गडी निस्ता चालला तरी गावातल्या बायाबापड्या तटतट उठुन घरात पळायच्या.आलुतेदार बलुतेदार त्याच्या दाराम्होरून जातांनी पायतान हातात घेउन पुढ जातं.आसा गड्याचा रूबाब व्हता.लहानपणापसुन आखाड्यात कुस्त्या खेळुन पाटलानं शरीर कमावलं व्हतं.भल्याभल्या पैलवानांना त्यानं आखड्यातं पाणी पाजलं व्हतं.पंचक्रोशीत लय दिलदार माणुस मनुन प्रसिद्ध व्हता.त्याच्या दारालं आलेला दिन दुबळा कव्हाच रिता गेला नाही.पाटील जसा आडदांड व्हता तसाचं मानी, शब्दाचा पक्का,अभिमानी आन ईज्जतीलं जपणारा व्हता.

  • चांदी – लघुकथा

    आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे . पक्कीच काय कच्चा रास्ता पण नाही . कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच . सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा . वाटेत दिवसा अंधार वाटावा अशे निबिड जंगल ! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाट तीन ला एक एक गाडी शिट्टी मारून जाते . बाकी शुकशुकाटच असतो .