नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते.

मी मधेच तुला सांगितल्या प्रमाणे मी आता कायमची लंडनला जात आहे .आईला बरोबर घेऊन .
कायमचे घर सोडायचे म्हणून सगळी आवराआवर करत असताना जुन्या फोटोत तू , शिरीष आणि तुमचे भाटे सर ( माझे आजोबा ती .आप्पा ) अशा फोटोच्या २ कॉपी मिळाल्या . त्या तुझ्या घरी वहीनी कडे दिल्या आहेत….एक शिरीष साठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी . तुम्ही दोघे आप्पांचे अत्यंत लाडके विद्यार्थी ना ! ….नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र .
…हे फोटो वहिनीला दिले तेंव्हा तिला इतके भरून आले होते ना …आणि मलाही …एक तर आमच्या दोघींचे माहेरचे आडनाव एक …आणि दुसरे म्हणजे तू आणि शिरीष चे आप्पांशी असलेले भावबंध ! ! !

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच.


शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत, नाहीतर केंव्हाही मृत्यूच्या जाळ्यात अडकायचे, नक्षल प्रमुखाच्या गोळीने नाहीतर पोलिसांच्या गोळीबारात.
संध्याकाळची वेळ असते.. तुम्ही दिवसभर काम करून कंटाळलेले असता.. आहेच वेळ तर जरा पाय मोकळे करु म्हणून फिरायला बाहेर पडता.
वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली.
गावी जवळपासच्या घरात शेळ्या असायच्याच. त्यांची काळी कुळकुळीत दोन चार करडं (लहान पिल्लं) आपल्या आईच्या आसपास एकाच वेळी चारही पाय वरती घेऊन उड्या मारताना दिसायची. त्यांना पकडून त्यांच्या लोंबणाऱ्या, रेशमी मुलायम कानांना स्पर्श करताना आनंद मिळत असे. त्या करडांना पकडले की, शेळी डोळे मोठे करुन माझ्या ‘जगावेगळ्या’ कृतीकडे पहात रहायची.
साक्षात कृष्ण भगवान देखील लहानपणी ‘माखनचोर’ होते, मग सर्वसामान्य माणूस जर ‘चोर’ असेल तर त्यात नवल ते काय? फक्त चोरीचे प्रकार वेगवेगळे, उद्देश मात्र चोरीचाच. प्रत्येक चोरीला शासन होतंच असं नाही, काही चोऱ्यांकडे कानाडोळा केला जातो.
जेव्हा पासून समजायला लागले तेव्हापासून अलिबाग मधील मांडव्याला मामाकडे जाताना, भाऊच्या धक्क्यावरून रेवस धक्क्याला जायला लाँच मध्ये बसल्यावर त्या लाकडाच्या लाँच मधील डिझेल व इंजिनच्या धुराच्या वासाने आणि इंजिन च्या घरघरने त्रास किंवा इरिटेट होण्याऐवजी गंम्मत वाटायची आणि मजा यायची.
Copyright © 2025 | Marathisrushti