नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते .
असंख्य डायऱ्यांचा ढीग तिथे होता. नेहमीप्रमाणे विस्कटलेली पाने पडली होती. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पेनं, पेन्सिली, बोरू, टाक, असंख्य रिफिल्स आणि शाईच्या दौती पण पडलेल्या होत्या. बाजूला तराजू मोडून पडला होता आणि हे सगळं एका कचरा कुंडीजवळ पडलं होतं. चमत्कारिक दृश्य दिसत होतं ते. मी सगळ्या डायऱ्या एकत्र केल्या, पानं एकत्र केली आणि वाचू लागलो.

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस वसरीतुन उठत त्यानं नेमकच पाणी शेंदुन आलेल्या बायकोल,ईमलीलं चहा कर आसं मनलं.तस वस्काळतच ईमली त्यालं मनली,“घरात गुळ ,साकर्या,पत्ती कशाचाच पत्त्या नाय….सगळे डब्बे तुमच्यासारखेच ठणठण गोपाळ झालेतं.आज वडपौर्णिमेचा सन हे.जरा दुकानावर जाऊन किराणा माल आणा.काय बाई किती वढाव एकटीन संसार. या माणसाचं बिलकुल जरासं सुद्धा घरात लक्ष नाही.मी आहे म्हणून टिकली या घरात….दुसरी कोणी टिकली नसती. काय पाहून बापानं मलं या घरी दिलं काय माहीत.कोण्या जन्माचा सुड काढला बापाणं काय ठाऊक माय…. ये पोर्हयवो काय हुडदंग माजवलाय रे….ईकडं या .ईथ बसा मह्यापुढं अभ्यासालं.”

रोजचे वर्तमानपत्र उघडले रे उघडले, की बलात्कार, दरोडे, खून, लफडी, घोटाळे, अब्जावधी-कोट्यवधी बेनामी मालमत्तेचा पोलिसांनी लावलेला शोध, खोट्या चलनी नोटांचे कारखाने या अशा बातम्या वस्सकन अंगावर येतात. संघटित गुन्हेगारी, पोलीस खात्याची बदनामी हे विषय तर वर्तमानपत्रात रतीब घालणारे विषय झाले आहेत. रोज सकाळी वृत्तपत्र वाचून मन विषण्ण होते, सुन्न होते. काही इंग्रजी वृत्तपत्रांत, विशेषत या दैनिकांच्या रविवार पुरवण्यात स्वैर सेक्स, पोर्नोग्राफी यांना प्रतिष्ठा देणारे लेख वाचायला मिळतात.

अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.
आनंद टी सेंटर’ सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक ‘कडक मिठ्ठी’ चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या खोड्या अश्या लहान सहान ‘हाटेली’त जपल्या जातात. जसवंत येऊन बसल्या बरोबर त्याने ‘कडक मिठ्ठी’ची ऑर्डर दिली. आज तो बेचैन झाला होता. आता संतुकराव मेले होते. कीतीही नाही म्हणले तरी मनोहरचा या खुनात हात नक्की होता! त्याला चिंता होती ती फुकट मिळणार गांजा बंद होणार याची. मनोहर खुनाच्या रात्री संतुकराव येण्या पूर्वी त्या आऊट हाऊस मध्ये काही काळ होता! जसवंतने याचेच भांडवल करण्याचे नक्की केले. इतके दिवस मनोहर आपल्या जवळच्या माहिती साठी ‘माल’ देत होता, आता हि तो देतच रहाणार होता! आत्तापर्यंत माहित सांगण्यासाठी द्यायचा आता, असलेली ‘माहिती’ न सांगण्याबद्दल ‘माल’ देणार होता! त्याने मनोहरला फोन लावला .

विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते.
उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला ‘वासंती’ची साथ आहे तो पर्यंत तरी मी या कावळ्यांना अजिबात भीक घालणार नाही, घालतही नाही.
खरं तर तो कुटुंबाचा वर्षांभराचा सारीपाटच असतो. प्रत्येकाला त्याच्या खेळीप्रमाणं दान पडत असतं. उद्या काय घडणार आहे हे माहीत नसताना, दिवस उजाडतो.. मावळतो.. प्रत्येक दिवस काही ना काही जीवनात भर तरी टाकतो किंवा एखादी गोष्ट हिरावून घेतो. सगळं कसं मृगजळासारखं असतं.

Copyright © 2025 | Marathisrushti