नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?

लाडाचं कोडाचं आमचं evergreen 'दादर'
आमच्यासाठी तर ते जणू Godfather |
दादर म्हणजे मुंबईच्या 'पाठीचा कणा' ,
टिकून आहे तिथे अजून 'मराठीबाणा' |
उच्च वर्गिय, उच्च शिक्षितांचा डौल इथला देखणा,
मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीने जपल्यात पाऊलखुणा |
'शिवाजीपार्क' म्हणजे आमच्या दादरची 'जान'
शिवाजीमंदिर, प्लाझा, आमच्या दादरची 'शान' |
मध्य पश्र्चिम रेल्वेचा 'केंद्रबिंदू' दादर
दादर T.T., रानडेरोड, चौपाटीचा आम्हां आदर |
माहिम आणि माटूंगा दादरचाच गाभा,
दादरला रक्षाया "सिध्दीविनायक" उभा |
अशा खास वैशिष्ठांनी, ताठ आमची मान,
"सावरकरांच्या" भूमीचा आम्हा दादरकरांना अभिमान |
-- सौ. अलका वढावकर
कामिनीच्या रखवालदाराने दरवाजा उघडला. मी घाबरत घाबरत त्याच्याकडे बघितले. बायको एकदम रुबाबात शिरली, रखवालदार जणू तिच्या दृष्टीने एखादे झुरळच! मी गुपचूप त्या भव्य आणि पॉश दुकानात, केविलवाणे पणाने इकडे तिकडे पांढरे कापड शोधीत होतो. सौ. ने आपला मोर्चा भरजरी साड्यांच्या काऊंटरकडे वळवला! मी घाबरत घाबरत म्हणालो, “अग, आपल्याला पांढरं कापड घ्यायचंय ना?”
“गप्प बसा हो! तुम्ही मुकाट्याने या माझ्या मागून ! मी बघते काय करायचे ते!”

घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात.
मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोर्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,‘आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.’

१० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला.

एका बागेमध्ये एक साठीचा पुरुष ( प्रणय ) जॉगिंग करत असतो, जॉगींग करता करता घामाघुम झालेला तो घाम पुसण्यासाठी बागेतील एका बाकावर बसतो बाकावर बसल्यावर समोरून जॉगिंग करत जाणार्या सुंदर तरूणीकडे तो एक टक पाहात असतो इतक्यात त्याच्याच वयाचे दोन पुरुष त्याच्या दिशेने त्याच्याकडे पाहात जॉगिंग करत येत असतात ते त्याच्या जवळ येताच आपला वेग कमी करतात आणि त्याच्या मागे हळूच येऊन उभे राहतात आणि त्यातील…
भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे.

मी नमस्कार करून गाडीकडे वळलो. गाडी सुरू करताना सहज म्हणून पाठी पाहिलं. दोघेही हसत होते आणि हात हलवून निरोप देत होते.
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे.
१९८४ सालातील गोष्ट आहे. अजय सरपोतदार या माझ्या काॅलेजमधील मित्रामुळे त्याच्या वडिलांशी, बाळासाहेब सरपोतदाराशी माझा संपर्क आला. त्यांनी ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटाची निर्मिती करुन तो ‘प्रभात’ टाॅकीजला प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या पेपरमधील जाहिराती व प्रिमियर शो चे निमंत्रण कार्ड आम्ही केलेले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti