(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मी गांधारी

    आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड!

    या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर पसरून ठेवतो अन मध्यभागी फतकल मारून बसतो! एक एक चित्र त्याची जन्म कथा ऐकवते. हे समोरच निष्पर्ण वृक्षाचे चित्र पाहून, जे. डी. म्हणाला होता, ‘तू हे अशी बोडखी झाड का काढतोस ?’ हल्ली जे. डीचा संपर्क कमी झालाय. फोन केला पहिजे. समोरचे खडकाचे चित्र, माझे सध्याचे फेवरेट, जमता जमेना, खूप कागद,वेळ ,रंग, मेहनत वाया गेली. हवा तो दगडाचा पोत साधत नव्हता. रागा, रागा कागदाचा वेडा -वाकडा बोळा केला, बशीतल्या काळ्या शाईत बुचकळला,अन drawing पेपरवर करकचून दाबला, सुकल्यावर फाईन tuning केल, शेजारी एक वाळक झाड काढल. मस्त इफेक्ट साधला.!

     

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२

    दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले.  ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही  खाली  उतरले.  त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले.

  • एका शेवटाची सुरुवात

    वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी

  • अलाकान

    आजपर्यंत १८० चित्रपट करणाऱ्या या रेखा नावाच्या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीने काही अविस्मरणीय चित्रपटही दिले, ज्या चित्रपटांची निर्मिती जणू काही तिच्यासाठीच केलेली होती.. ‘खुबसूरत’ चित्रपटात तिने अल्लड तरुणीची, हलकीफुलकी भूमिका केली. ‘उत्सव’ मधील तिची वसंतसेना कुणीतरी विसरु शकेल का? ‘उमराव जान’ चित्रपटात तर तिने ‘जान’च ओतली आहे.. ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील जोहराबाईला, खुद्द लंबूही विसरला नाही, मग आपली काय पत्रास?

  • एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)

    मला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही. “मुलगी शिकली, प्रगती झाली.” हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले. तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या. त्यांनी नोकऱ्या केल्या. सगळे मुलगे नाही शिकले. मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या. आणखी काय हवं ? दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला. आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले.

  • पोलिस खात्यातील पहिला अविस्मरणीय दिवस

    सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.

  • पेशन्स इज द की.. (‘मी आणि ती ‘)

    पेशन्स इज द की….

    तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते ,
  • भेट तुझी माझी

    आज मी तिला, साधारण तीस एक वर्षांनी भेटणार आहे . आज मात्र मी माझी बाजू मांडणार आहे . त्या काळी प्रेम करणं महापातक . घरच्यांच्या नाराजीवर आम्हाला आमचा ‘सुखी ‘ संसार थाटायचा नव्हता . तिनें तिच्या घरच्याना राजी केले . मीच कमी पडलो ! आम्ही शेवटचं भेटलो तेव्हा ‘जमेलसे वाटत नाही ‘ असे सांगितले तेव्हा जाम अपसेट होऊन डोळे पुसत निघून गेली . माझी बाजू ऐकून न घेताच ती गेली होती . मी काय करायचे ठरवले हे तिला सांगणार होतो ! त्यांनतर दिसली नाही ! ती आज भेटतेय ! तीस वर्षांनी !

  • सुंदरी की वाघ? (संक्षिप्त आणि रूपांतरीत कथा ११)

    फ्रँक स्टॉकटन हा खास करून मुलांचे वाडमय लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. त्याची ही गोष्ट इंग्रजी वाडमयात अतिशय लोकप्रिय आहे. कारण ती एक सुंदर रूपक कथा आहे. त्यात दैव आणि स्वेच्छा (Determinism versus Free Will) यांचा सनातन झगडा दाखवला आहे. राजा त्याला आरोपी करून त्याची व राजकन्येची स्वेच्छा हिरावून घेतो. परंतु राजकन्या गुपित जाणून घेऊन पुन्हा आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तसाच जंगलीपणा आणि सुधारणावाद यांतील द्वंद्वही दाखवले आहे.

  • अष्टपैलू आचार्य

    एकोणीसावं शतक संपताना पुण्याजवळील सासवड येथील कोडित खुर्द गावात १३ ऑगस्ट १८९८ साली, एक ‘सरस्वती पुत्र’ जन्माला आला.. ज्यानं अवघ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.. त्यांचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे!