नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

मोरूचा बाप मोरूला म्हणाला , ‘ ऊठ लेका , जागा हो , तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा . आता कोणत्याही क्षणी मतांची भीक मागायला आणि आपली सेवा करावयाला विविध पक्षांचे विनम्र पाईक कर जोडून येतील , त्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे , त्यांना म्हणावे , हे आमचे अपेक्षापत्र आहे.

नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?”

रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू तिचा नाद सोडत का नाहीस ? ती कोठे ? तू कोठे ?? नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकीही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं ! तू किती हुशार ! उद्या जग तुझी दखल घेईल ! हे तिच्या गावातही नसेल.

काँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते.
खरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो.

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं.

विजयच्या आयुष्यात काय ? कोणाच्याच आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही ! यावर विजयचा ठाम विश्वास होता. विजयचा पाय दुखणे ! तो ही सलग चार महिने ! कोणत्याच उपचारालाही प्रतिसाद न मिळणे . ही विजयला एक सामान्य घटना नक्कीच वाटत नव्हती… या चार महिन्यात विजयासह अनेकांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्या चार महिन्यांमुळे अनेक घटना घडणार होत्या. विजयला सध्या तो जी नोकरी करत होता ती नोकरी त्याला सोडायचीच होती पण ती सोडायला काही ठोस कारण मिळत नव्हते.
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.

पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा

गाडीच्या अचानक थांबण्याने दोघांना झोराचा धक्का बसला. डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न मानसी किंचाळली जोरात. अमितच्या मानेला झोरात हिसका बसला. गाडी जागच्या जागी थांबली. काय होतंय पाहायला दोघेही गाडीतून खाली उतरले. गाडीच्या बॉनेट मधून धूर येत होता. गाडीचं इंजिन खूप तापलं होतं बहुदा. पाणी संपलं होतं गाडीतलं.
अमित दुखरी मान वळवू शकत नव्हता. थोडी तिरकी मान करूनच त्याने गाडीचं बॉनेट उघडलं आणि मानसीला डिक्कीतून पाण्याचा कॅन आणायला सांगितला. मानसी धावतच कॅन आणायला निघाली आणि दोन पावलं गेल्यावर बिचकली. काहीतरी विसरल्यासाखी जीभ चावून ओशाळलेल्या नजरेनं अमितकडे पाहू लागली.
Copyright © 2025 | Marathisrushti