महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
करुर हे तामिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. अमरावती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर चेरा, विजयनगर, मदुराई नायक, हैदर अली, आदी राजांची राजवट होती.
चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.
येमेन हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. श्रीकृष्ण हे जेव्हा मथुरेला होते, त्यावेळी येमेनचा अजिंक्य समजला जाणारा राजा कालयवन याने मथुरेवर स्वारी केली होती.
पनामाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांना जोडणाऱ्या एका चिंचोळ्या संयोगभूमीवर वसलेल्या पनामाच्या पश्चिमेला कोस्टा रिका, आग्नेयेला कोलंबिया, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. पनामा सिटी ही पनामाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. हे शहर नॅरोगेज रेल्वेच्या वर्कशॉपसाठी प्रसिध्द होते.
उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर आणि मिरज या शहरांशी कुर्डुवाडी जोडलेले आहे. येथील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक आता ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यात आलेला असला तरी जुन्या पंढरपूर गाडीच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत.
स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.
मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत.
इराण हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. इराण चे पूर्वीचे नाव पर्शिया असे होते. पर्शियन संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. खनिज तेल साठयात संपूर्ण जगात क्रमांक तिसरा तर वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. इराकविरुद्ध ९ वर्षे चाललेले युद्ध यादेशाने केले.
भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti