महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते.
इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.
थेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग.
चिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील चोर गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे.
लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.
होन्डुरासचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. लोम ही टोगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
कासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत.
स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी – म्हणजे राज्यांनी – बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti