(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • परभणी जिल्ह्याचा इतिहास

    अगस्ती ऋषी विंध्य पर्वत ओलांडून आल्यानंतर त्यांनी आपला आश्रम गोदावरीकाठी बांधला. त्यानंतर अनेक ऋषी-मुनी या भागात आले. मुद्गल ऋषींच्या तपश्र्चर्येने पावन झालेले मुद्गल हे गाव, गोदावरी नदीचा किनारा, वाल्मिकी ऋषींमुळे पावन झालेले वालूर (सेलू) व पांडवांपैकी पार्थाने (अर्जुनाने) वसविलेले पाथरी(पार्थपूर)-अशा परभणी जिल्ह्यातील भागांचे उल्लेख पुराणात आहेत.

  • स्वीडन

    स्वीडन (स्वीडिश: Konungariket Sverige) इंग्रजीत Sweden) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, इशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.

  • वर्धा जिल्ह्याचा इतिहास

    वर्धा या नदीच्या नावावरूनच ‘पालकवाडी’ या छोट्या गावापासून विकसित झालेल्या भागाला ‘वर्धा’ हे नाव देण्यात आले. या जिल्ह्याच्या परिसरावर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकारम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व गोंड या राजवटींची सत्ता असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजातंत सापडतात.

  • बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नांदुरा

    नांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मुंबई-हावडा रेल्वेलाईनवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे. नांदुरा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजे १९३१ साली झालेली आहे.

  • भंडारा जिल्ह्याचा इतिहास

    पितळी भांड्यांचे शहर म्हणून भंडारा शहराची व जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. ‘भाणारा’ शब्दापासून ‘भंडारा’ हे नाव पडले असेही म्हटले जाते. या भागात १२ व्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा भाणारा असा उल्लेख आढळतो. ‘भाण’ हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात असावा, असे अनुमान निघते.

  • महाराष्ट्रातील ‘देवळांचे गाव’ – आळसंद

    सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद गावामध्ये एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १३० देऊळे आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवतांची! आणि प्राचीन मंदिरे.. यामुळेच या गावाला “देवळांचे गाव” आणि “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते.

  • पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आळंदी

    आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, संत ज्ञानेश्वर यांचे समाधिस्थान आहे. या गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात.

  • मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर कार्ला

    कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.

  • लातूर जिल्ह्यातील उदगीरचा भुईकोट किल्ला

    सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे.

  • नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास

    नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.