महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे.
कांचिपुरम हे तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. चेन्नईपासून ७२ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराने ११.६०५ वर्ग किलोमीटर क्षेत्र व्यापलेला आहे.
डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरिबियनमधील एक देश आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. ह्या बेटाचा पश्चिम भाग हैती देशाने व्यापला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जगातील दुसर्या क्रमांकाची हवामान निरीक्षणाची प्रयोगशाळा आहे. ही वेधशाळा इ.स. १९०४ पासून कार्यरत असून या वेधशाळेला आंतराराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत.
येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.
सोळाव्या शतकात माल्टामध्ये सरंजामदारांचे अस्तित्व होते. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टावर ताबा मिळविला. १८०५ मध्ये माल्टाची सत्ता पुन्हा सरदारांच्या हाती गेली.
तेनकाशी हे तामिळनाडू राज्यातील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातिल एक महत्वाचे शहर आहे. पश्चिम घाटातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी ते वसलेले असून, समुद्रसपाटीपासून १४३ मीटर उंचीवर आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti