(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय भाग

    सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.

  • केप व्हर्दे

    काबो व्हर्देचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República de Cabo Verde; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. आफ्रिकेतील गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. सध्या केप व्हर्दे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.

  • अहमदनगरचा विशाल गणपती

    महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे.

  • सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकजीवन

    “दशावतार” हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असा सांस्कृतिक कलाविष्कार आहे. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतो.

  • सेलम

    सेलम हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कोईम्बतूरपासून अवघ्या १६० किलोमीटरवर ते वसलेले असून, तमिळनाडू राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.

  • ॲँगोला

    अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन इ.स. १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.

  • पलक्कड

    तामिळनाडूच्या बाजूने पश्चिम घाटातून केरळ राज्यात प्रवेश करताना सर्वप्रथम हे शहर लागत असल्याने पलक्कड शहराला ‘गेट वे ऑफ केरला’ असे म्हटले जाते.

  • पुणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार.

  • जुन्नर येथील महाजनांचा गणपती

    जुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.

  • लातूर जिल्ह्याचा इतिहास

    प्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा लातूर हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले.