(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • धुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    लळिंग किल्ला – धुळे जिल्ह्यातील हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. लळिंग किल्ला हा धुळे – मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे.

  • पुणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील अनेक दळणवळण अधिक सोयीचे बनले आहे.

  • ज्वालामुखी

    पृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.

  • द लेडी ऑफ माली

    गिनीमधील माऊंट लैमा येथे १५०० मीटर उंच असा पर्वताचा सुळका असून, त्यावर वाऱ्याच्या आघातामुळे एका सुंदर स्त्रीची प्रतिमा कोरली गेली आहे.

  • कुंभकोणम

    कुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते.

  • व्हियेतनाम

    व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हियेतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. सुमारे ८.८ कोटी लोकसंख्या असलेला व्हियेतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे.

  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना

    बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.

  • ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

  • रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते.

  • कोन्नी

    कोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.