(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • भंडारा जिल्ह्याचा इतिहास

    पितळी भांड्यांचे शहर म्हणून भंडारा शहराची व जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. ‘भाणारा’ शब्दापासून ‘भंडारा’ हे नाव पडले असेही म्हटले जाते. या भागात १२ व्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा भाणारा असा उल्लेख आढळतो. ‘भाण’ हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात असावा, असे अनुमान निघते.

  • रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    तानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.

  • कोचीन

    केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे.

  • हैती

    हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • जालना जिल्ह्याचा इतिहास

    छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला.

  • यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    पुसद पूस नदीवरील पुसद हे ऐतिहासिक महत्वाचे गाव आहे. वाकाटक कालीन शिवमंदिराचे अवशेष येथे सापडले आहेत.

  • तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर मालेगाव (जिल्हा वाशिम)

    मालेगाव हे वाशिम जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील मालनेश्वर नावाचे महादेव मंदिर प्रसिद्ध असून, इ.स. ९१२ मध्ये बांधलेले हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्रेक्षणीय आहे.

  • अंगमली

    अंगमली हे केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. एर्नाकुलमपासून ३३ किलोमीटर उत्तरेस हे शहर वसलेले असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ते वसलेले आहे. १

  • अकोला जिल्हा

    डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं.

  • पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर देहू

    देहू हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, संत तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे. येथेच आपल्या विठ्ठलभक्तीतून तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले.