महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
आंध्रप्रदेशातील हैदराबाद हे मोत्यांचे शहर म्हणून प्रसिध्द आहे.
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.
व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.
लेबेनॉनचे प्रजासत्ताक हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
कापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
अर्जेंटिनामधील तलांप्या नैसर्गिक उद्यान येथील खडकांत असणाऱ्या मानव व प्राणी यांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात.
क्युबातील व्हिनालेस व्हॅली ही तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti