महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या गणेशाला अनोखे महत्त्व आहे.
कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. हे शहर नॅरोगेज रेल्वेच्या वर्कशॉपसाठी प्रसिध्द होते.
उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर आणि मिरज या शहरांशी कुर्डुवाडी जोडलेले आहे. येथील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक आता ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यात आलेला असला तरी जुन्या पंढरपूर गाडीच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत.
ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे.
फार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उफराटे केले म्हणून यास उफराटा गणपती म्हणतात.
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर एक प्रसिद्ध गाव आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.
स्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत.
जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.
मुंबईतील ग्लोबल पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. एकाच वेळी १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून, भूकंपरोधक आहे.
म्यानमारमधील श्र्वे डेगोंन पॅगोडाची प्रतिकृती हा पगोडा आहे. सर्व धर्मसमभावाचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते.
चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
ऑस्ट्रेलियातील उलुरु हा अखंड दगडाचा खांब असून याचा घेर सुमारे ९.४ कि.मी. इतका आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti