महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
सियेरा लिओन हा पश्चिम आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्यावरील एक छोटा देश आहे. सियेरा लिओनच्या उत्तरेला गिनी, पूर्व व दक्षिणेला लायबेरिया तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सियेरा लिओन ही एक ब्रिटीश वसाहत होती. १९९१ ते २००० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते.
कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला.
काबो व्हर्देचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República de Cabo Verde; लोकप्रिय नाव: केप व्हर्दे) हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ १० बेटांच्या द्वीपसमूहावर वसलेला एक देश आहे. हा द्वीपसमूह अटलांटिक महासागरामध्ये पश्चिम आफ्रिकेच्या ५७० किमी पश्चिमेस स्थित आहे. १५व्या शतकापर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य असलेला हा द्वीपसमूह १४६० साली पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. आफ्रिकेतील गुलामांना युरोपामध्ये नेणारी जहाजे येथे थांबा घेत असत. ह्यामुळे १७व्या व १८व्या शतकात केप व्हर्देची भरभराट झाली. १९व्या शतकात गुलागिरीवर बंदी घालण्यात आल्यानंतर केप व्हर्देची अर्थव्यवस्था खालावत गेली. १९७५ मध्ये पोर्तुगालने केप व्हर्देला स्वातंत्र्य मंजूर केले. सध्या केप व्हर्दे संयुक्त राष्ट्रे, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २०१५ साली ५.२५ लाख लोकसंख्या असलेल्या केप व्हर्देचे बहुसंख्य रहिवासी मिश्र युरोपीय व आफ्रिकन वंशाचे आहे.
चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.
पूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा.
वारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.
ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे.
शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना या किल्ल्याच्या संदर्भाने घडलेली नाही. तरीही हिरडस मावळाच्या वाटेवर देखरेखी साठी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला आहे.
गडावरुन सिंहगड, कात्रजचा डोंगर, तोरणा, राजगड, पुरंदर, वज्रगड, खंबाटकीचा घाट तसेच रायरेश्वराचे पठार आणि पाचगणीचे पठार व मांढरदेव दृष्टीपथात येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti