महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे.
मलकापूर हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत.
जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो.
रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.
इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).
इ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हियेत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.
गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर आहे.
श्रीनगरचे एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते.
१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.
इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti