(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • तुर्कस्तान, तुर्की किंवा टर्की

    तुर्कस्तानचे नाव, तुर्की भाषेमध्ये Türkiye (तुर्किए) यावचे दोन अर्थ होऊ शकतात: १. ‘तुर्क’ याचा अर्थ जुन्या तुर्की भाषेमधे शक्तिशाली असा होतो. २. तुर्कस्तानच्या नावाची फोड तुर्कि-एन आहे. त्याचा अर्थ : तुर्की म्हणजे तुर्की लोक, एन म्हणजे त्यांच्या मालकीचे आहे असा होतो. यावरून तुर्कस्तानला हे नाव पडले असावे.

  • अष्टदशभुज गणेश, रामटेक

    भगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.

  • काँगोचे प्रजासत्ताक (काँगो)

    इ.स. १९६० सालापर्यंत काँगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा काँगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर भिंगार

    भिंगार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भृगू ऋषींनी या भूमीत तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथांत आढळतो. त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिराची उभारणी केलेली आहे.

  • बहारीन

    बहरैन (मराठीत बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.

  • आयर्लंड

    आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे.

  • बुरुंडी

    बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा देश आहे.  बुरुंडी हा जगातील १० सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.

  • टोगो

    टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. लोम ही टोगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • कोल्हापूरचा साक्षीविनायक

    साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे.

  • इस्रायल

    इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).