महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
पोलंड हा मध्य युरोपातील एक देश आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया, नैऋत्येला चेक प्रजासत्ताक तर पश्चिमेला जर्मनी हे देश आहेत. ३,१२,६८५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला पोलंड हा आकाराने युरोपातील ९वा व जगातील ६९वा मोठा देश आहे. वर्झावा तथा वॉर्सो ही पोलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.
यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे.
तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.
किर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड जिल्हा ; पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा; दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे.
सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे.
परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे.
इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे. ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti