(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • युनायटेड किंग्डम

    ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

  • मोनॅको

    मोनॅको हा युरोपातील एक नगर-देश आहे. मोनॅको आकाराने जगातील दुसरा सर्वात लहान सार्वभौम देश आहे (सर्वात लहान देश: व्हॅटिकन सिटी). मोनॅकोच्या पूर्वेला भूमध्य समुद्र तर इतर तीन दिशांना फ्रान्स हा देश आहे तर मोनॅकोपासून इटली देशाची सीमा केवळ १६ किमी अंतरावर आहे. मोनॅकोमध्ये राजेशाही सरकार आहे. आल्बर्ट दुसरा हा मोनॅकोचा राजकुमार व सत्ताप्रमुख आहे.

  • टेकडी गणेश मंदिर, नागपूर

    राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात २५० वर्ष जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर सन १९७० साली भारतीय सेनेने ताब्यात घेतले.

  • कराईकल

    कराईकल हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो.

  • सायप्रस

    सायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक: Κυπριακή Δημοκρατία; तुर्की: Kıbrıs Cumhuriyeti) दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरिया व लेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोप व आशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासून युरोपियन संघाचा सदस्य आहे. निकोसिया ही सायप्रसची राजधानी आहे.

  • भूतान

    भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • जमैका

    जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  • बेनिन

    बेनिनचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Bénin; जुने नाव: दहोमी) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र आहे. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बव्हंशी लोकवस्ती एकवटलेल्या बेनिनची राजधानी पोर्तो-नोव्हो असून कोतोनू हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

  • अर्जेंटिना

    आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे. या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. फक्त दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास हा देश आकाराने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश बोलिव्हिया व केप हाॅर्नच्या मध्ये ३७०० किमी. लांब पसरलेला आहे. याची जास्तीत जास्त रूंदी १५०० किमी. आहे. अमेरिकेतील एका भव्य पर्वताचे '''अकंकागुआ''' नावाचे सर्वात उंच शिखर मात्र या देशात आहे. १८१६ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नाववंत फुटबॉलपटू याच देशातील आहे. आर्जेन्टिनात कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करने, हा आर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे.

    आर्जेन्टिना हे नाव लॅटीन भाषेतील argentum (चांदी) ह्या शब्दापासून तय्यार झाले आहे. आर्जेन्टिना ह्या शब्दाचा पहिला लिखित स्वरुपात असलेला उल्लेख La Argentina (१६०२) नामक Martín del Barco Centenera च्या कवितेत सापडतो. आर्जेन्टिना हे नाव १८व्या शतकापर्यंत चलनात आले. इ.स. १८२६ च्या संविधाना मध्ये प्रथम Argentine Republic ह्या नावाचा उल्लेच सरकारी दस्तऐवजामध्ये दिसतो.

    Amerigo Vespucci अमेरिगो वेस्पुची च्या इ.स. १५०२ मधील जालप्रवासासोबत युरोपीय लोक पहिल्यांदी अमेरिकी खंडाच्या ह्या भागात आले. Juan Díaz de Solís आणि Sebastian Cabot सारखे दर्यावर्दी या भागात इ.स. १५१६ आणि इ.स. १५२६ साली अनुक्रमे आले. १५३६ मध्ये पेद्रो दे मेंडोसा (Pedro de Mendoza) ने बुएनोस आइरेस नामक एक छोटी वसाहत स्थापित केली. पण ही वसाहत इ.स. १५४१ मध्ये नष्ट केली गेली.

    आर्जेन्टिनाच्या उत्तरेस पेराग्वे व बोलिव्हिया, ईशान्येस ब्राझिल व उरुग्वे, पश्चिमेस चिली हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. आर्जेन्टिनाचे क्षेत्रफळ २७,८०,४०० चौरस किलोमीटर एवढे आहे. पाराना आणि उरुगुआइ ह्या आर्जेन्टिना मधील दोन महत्वाच्या नद्या आहेत.

    बुएनोस आइरेस : बुएनोस आइरेस, आर्जेन्टिनाची राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे. त्यासोबतच बुएनोस आइरेस हे दक्षिण अमेरिकेतील दुसरे सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. बृहन बुएनोस आइरेस हे शहर बुएनोस आइरेस प्रांताचे भाग किंवा राजधानी नाही आहे. हे शहर आर्जेन्टिनातील एकमेव स्वायत्त शहर आहे. १८८० बुएनोस आइरेस शहराला बुएनोस आइरेस प्रांतातून विभागले गेले.

    मेक्सिको शहर आणि साओ पाओलो सोबत बुएनोस आइरेस, हे लॅटीन अमेरिकेतील ३ मोठ्या शहरांपैकी एक आहे. बुएनोस आइरेसच्या रहिवाश्यांना अनेकदा पोर्तेन्योस (Porteños) हि म्हणतात. Porto म्हणजे बंदर आणि बुएनोस आइरेस हे बंदराचे शहर आहे.

    कोर्दोबा : कोर्दोबा हे शहर आर्जेन्टिनाचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि कोर्दोबा प्रांताची राजधानी आहे. कोर्दोबा आर्जेन्टिनाच्या भौगोलिक मध्यात स्थित आहे. बुएनोस आइरेस पासून ७००किमी वायव्य दिशेला कोर्दोबा शहर स्थित आहे. २००१ च्या जनगणने नुसार कोर्दोबाची लोकसंख्या १३ लाख एवढी आहे. कोर्दोबाची स्थापना ६ जुलै १५७३ साली खेरोनिमो लुइस दे कॅब्रेराने केली.

    राजधानी व सर्वात मोठे शहर : बुएनोस आइरेस
    अधिकृत भाषा : स्पॅनिश
    स्वातंत्र्य दिवस : (स्पेनपासून) जुलै ९, १८१६ (घोषित) १९२१ (मान्यता)
    राष्ट्रीय चलन : पेसो (ARS)

    देश : अर्जेंटिना
    राजधानी : ब्युनोस एअर्स
    चलन : अर्जेंटाईन पेसो


    Country : Argentina
    Capital city : Buenos Aires
    Currency : Argentine peso
    Calling code : 54
    Country Domain : .ar

    ( Source : Wikipedia )

  • सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती

    डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर- यांचा जन्म मालवण येथे झाला. ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवणारे संस्कृतचे पहिले भारतीय प्राध्यापक होते.१८९५ ते १८९७ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते कार्यरत होते.१९११ साली दिल्ली येथे भरलेल्या दरबारात त्यांना ‘सर’हा किताब देण्यात आला. पुण्यात यांच्या नावाने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सुरू करण्यात आली.