वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे.


प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास 'धरावे' असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी 'ध' चा 'मा' केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.

अक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.
सध्या सोनी चॅनलवर हिंदी इंडियन आयडाॅल सुरु आहे.याचा उच्चार उच्चभ्रू (स्वत:ला समजणारे !) लोक आयडल ( म्हणजे निष्क्रिय! ) असा का करतात हे एक न सुटणारे कोडे ! असो…..

आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढ धोकादायक वेगाने वाढत आहे. या तापमान वाढीची कारणे, त्याचा धोका यांची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत देणारे अप्रतिम पुस्तक
व्यवहारात चलन व नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी आपल्या देशात व जगातही अनेक ठिकाणी ‘बार्टर सिस्टिम’ किंवा ‘वस्तु-विनिमय प्रणाली’ वापरली जात असे. नंतर दगड तसेच लोखंड, जस्त, कथिल, सोने, चांदी, तांबा, पितळ इत्यादि धातूंची नाणी वापरली जाऊ लागली. पण जसा कागदाचा शोध लागला तश्या कागदाच्या चलनी नोटा व्यवहारात अधिक वापरल्या जाऊ लागल्या.
कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.
उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.
भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा ‘मानसोल्लास’ अर्थात ‘अभिलषितार्थचिन्तामणि’ हा ग्रंथ. (शतक १२ वे). हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. राजा सोमेश्वर हा चालुक्य कुलातील राजा असून त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. राजाचा आहार असा या मांडणीचा विषय असला तरी तत्कालीन पाककृतींचा परिचय त्याद्वारे करून देणे असा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक काळात पाकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थाना उपलब्ध आहे. परंतु १२ व्या शतकात सोमेश्वर राजाने सांगितलेले अन्नाविषयीचे तपशील आजच्या काळातही उपयुक्त आहेत.

मराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti