वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मंडळी सप्रे म नमस्कार !
शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी रात्री गडकरी रंगायतन —ठाणे येथे सुमन सुगंध हा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा कार्यक्रम बघण्याचा अभुतपूर्व योग जुळून आला !
मुळात सुमनजींची गाणी म्हणजे बासुंदी ! त्यात साखर म्हणजे मंगला खाडिलकर यांचं निवेदन ! आणि यावर केशराची अनुभूति म्हणजे स्वत: सुमनताईंची उपस्थिती !असंही आमच्या सद्गुरुमाउली परमपूज्य कलावती आईंच्या यांच्या नात्यातील असल्याने सुमनताईंबद्धल अधिकच आदर व आपुलकी होतीच , काल मंगलाताईंच्या आग्रहामुळे वर वर्णन केलेला केशरयुक्त बासुंदीचा योग जुळून आला आणि म्हणून लेखाचं शीर्षक आहे.
मंगलाय सुमनो हरि:
२७ नक्षत्रांप्रमाणे २७ मराठी—हिंदी गाणी सादर केली गेली.मंदार आपटे , विद्या करलगीकर आणि माधुरी करमरकर असे सुरेल गायक असणार होते परंतू माधुरीजींना प्रकृति अस्वास्थ्यामुळे येता आलं नाही म्हणून निवेदक राजेंद्र पाटणकर यांच्या Timely Impact Punch प्रमाणे Impact Player म्हणून संगीतकार बाळ बर्वे यांच्या कन्या सुचित्रा भागवत या मंदार व विद्यासह गायनसेवेला उपस्थित होत्या.....
मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दांना स्नेहल भाटकरजींच्या संगीताने सजलेल्या गणेशस्तुतीने विद्यांनी सुरुवात केली : तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशे फडकती आणि मन पार ४५—५० वर्ष मागे गेले.....माझं माहेर — मुंबईतील एक उपनगर गोरेगांव पूर्व येथील टिळक नगर आणि आसपास चा सार्वजनिक गणेशोत्सव .....नगरातील रहिवाशी दत्त निवासमधील रमेश डेकोरेटर्सचे कदम यांच्या रेकाॅर्डमधे हमखास गणेश चतुर्थीच्या पहाटेला सुरु होणारी ही गणेशस्तुती.....किती वर्षं झाली हा मधाळ स्वर ऐकून , मला तर कधी कधी वाटतं की खरोखरंच गणपतीबाप्पाही एखाद्या रविवारी पार्वतीकडे हटून बसत असावा की सुमन कल्याणपूरचं "तुझ्या कांतीसम रक्तपताका" ऐकव तरंच मी झोपेतून उठून मुखमार्जन करीन! १९६८ सालचं गाणं अब तक ५६ झाले तरी तितकंच सुश्राव्य आहे आणि येणार्या कित्येक पिढ्यांमधेही सुखेनैव नांदेल हे निश्चित् !
यानंतर १९६९ चा कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचा सल्ला विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केला व सुमनजींनी आपल्याला ऐकवला तो शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी — बकुळीच्या फुलांसारखाच नाजुक गोड मोहक आवाजात सुचित्रा मय झाला !
दोन महिलांच्या आवाजाने वातावरण भारलेलं असताना मधुकर जोशींचे शब्द जे दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केले ते आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे , घेऊन एकतारी गातो कबीर दोहे मंदारजींनी सादर केलं.
मग जिथ्थे तिथ्थे च्या मंगलाजींच्या गमतीशीर टिपणीनंतर १९६१ च्या पुत्र व्हावा ऐसा मधील जनकवी ठाण्याचे पी.सावळाराम यांचे शब्द वसंत प्रभूंनी अजरामर चालीत बांधले ती सलज्ज तारुण्यातील तरल भावना विद्याजींनी सादर केली जिथ्थे सागरा धरणी मिळते , तिथ्थे तुझी मी वाट पहाते , वाट पहाते! यातल्या Waltz चा ( दादरा ठेका ) मंगलाताईंनी आवर्जून उल्लेख केला.
यानंतर मजरूह सुलतानपुरींचे शब्द सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले बात एक रात की मधील गाणं देव आनंदच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधत सुचित्रा मय झाले — न तुम हमें जानों.....
१९६३ च्या सुभद्राहरण चित्रपटातील शांतारामजींचे शब्द आठवले जे प्रभाकर जोग यांनी संगीतमय केलेले आर्जव बघत राहूदे तुझ्याकडे सुचित्रा व मंदार यांनी सादर केले ! हल्ली नेहमी (लग्नाआधीपासूनंच) गुढगे टेकून अंगठीची लालूच दाखवत पुढे पुढे करणार्या ठोंब्या प्रियकराच्या त्या पाश्चात्य नाटकी मागणीपेक्षा प्रियेचं ( तेही जयश्री गडकरसारख्या सौंदर्यवती सुभद्रे चं ! )हे मराठमोळं गोड आर्जव हळुवार मोरपीस फिरवल्यासारखं मनाला स्पर्शून जातं.....
ज्या काळात काकाचं ( पक्षी : जतिन ऊर्फ राजेश खन्ना ) मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू? गाजत होतं ( १९६९ ) त्याच काळात मराठमोळा रमेश देव सीमा ला पडद्यावर मधुसूदन कालेलकरांच्या शब्दांना एन.दत्तांच्या सुरावटीत विचारता झाला सांग कधी कळणार तुला , भाव माझ्या मनातला? आणि आपलंही प्रेम असल्याची कबुली असलेला पलटवार करते सीमा :रंग कधी दिसणार तुला लाजणार्या फुलातला? आणि हे भांव जिवंत केले मंदार —विद्या यांनी !
प्रियेच्या आर्जवाने संमोहित प्रियकर मग मराठी सोडून हिंदीमधे प्रियेला हसरत जयपुरी यांचे शब्द शंकर जयकिशनच्या चालीमधे घोळवत राजकुमार धर्तीवर सांगू लागला तुमने पुकारा और हम चले आए , दिल हथेलीपर ले आए रे आणि हे प्रियकर प्रेयसीचे कबुलीजबाब सादर केले मंदार—सुचित्रा यांनी.
सूफ़ी संगीतातील एक प्रकार मुनाजात याबद्धल भाष्य करत ( अल्लाह करम करना मौला तू रहम करना — या सुमनमय मधुर गीताचा उल्लेख करत ) मंगलाजींनी जानवर मधील एक अशीच मुनाजात ( पक्षी : प्रार्थना , स्तुति ज्यात स्वत:साठीही काही प्रार्थना असते ) जी मूलत: हसरत जयपुरींची होती व शंकर जयकिशनने त्यात उत्कट रंग भरून सुमनजींकडून गाऊन घेतली होती मेरे संग गा , गुनगुना कोई गीत सुहाना ती सादर केली विद्यांनी ...
यानंतर मंत्रमुग्ध श्रोत्यांना परत मराठी भावविश्वात आणलं मंगलाताईंनी , अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना नादमय माधुर्यता देणार्या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर आणि हा गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर सुचित्रा यांनी व्यक्त केला... संचारी या बंगाली संगीत प्रकारावरून हे संगीत आल्याचं मंगलाताईंनी नमूद केलं.....
समुद्राच्या लाटांवर मनाला तरंगत ठेवणार्या अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना तितकीच प्रवाही माधुर्यता देणार्या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने श्रोत्यांना संगीताच्या लाटांवर आरूढ केलं नाविका रे वारा वाहे रे , डौलानं हाक जरा आज नांव रे म्हणत विद्या यांनी. भटियाली संगीत प्रकारापैकी एक संगीत असं मंगलाताईंनी आवर्जून नमूद केलं.....
यानंतर कलाकारांनी एक दृतगतीतील चौकार खेळला : सुचित्रा — अरे संसार संसार मोलकरीण , विद्या — असावे घरटे अपुले छान, मंदार विद्या — आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही , विद्या या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार विंगेमधे बसलेल्या सुमनताईंना उद्देशून मुंबईचा जावई मधील गदिमा—सुधीर फडके यांचे कशी करू स्वागता? सादर केलं विद्या यांनी.....
आणि या स्वागतगीतानंतर मंगलाताई रंगमंचावर घेऊन आल्या वात्सल्यमूर्ती , पद्मभूषण , यंदाच्या म.टा.गौरवप्राप्त सु रांचा म नमोहक न जराणा अर्थात् सुमन कल्याणपूर यांना ! वय वर्षे ८७ फक्त ! पण मंगलाताईंनी त्यांना बोलतं केलं आणि त्यांनीही तितक्याच मार्मिक आणि मिश्किलपणे श्रोत्यांशी सुसंवाद साधला ! आनंद मनी माईना , केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर , जिथ्थे सागरा धरणी मिळते..... अशी गाणी गायल्या..... यानंतर ॠतुरंग तर्फे त्यांना एक मानपत्र अर्पण करण्यात आलं ज्याचं वाचन अतिशय छान निवेदन करणार्या राजेंद्र पाटणकर यांनी आधी केलं , शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम एक लक्ष एक हजार एक यासह सुमनताईंचा सत्कार करण्यात आला ! ज्यांनी कित्येक दशकं आपले अष्टौप्रहर सुश्राव्य केले अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा सत्कार होताना आपण त्याचे साक्षीदार होणं ही एक परमभाग्याची गोष्ट आहे महाराजा !
यानंतर ( फक्त पाचच मिनिटं सांगून पंधरा मिनिटांचं ! )मध्यंतर झालं.
मध्यंतरानंतर.....
१९६३ च्या दिल एक मंदिर मधील जानेवाले कभी नहीं आते या मंदारजींच्या आर्त टाहोनंतर हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन यांचं दिल एक मंदिर है ~ असं विद्या यांनी विदित केलं.....
१९६८ चं रमेश आणावकर यांचं दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं मृदुल करांनी छेडित तारा ऐकवत विद्या यांनी भाव विभोर केलं.....
यानंतर मधुकर जोशी यांचं गीत जे मूलत: रिमझिम झरती श्रावणधारा असं होतं , ते सुमनजींनी पावसाच्या झिमझिम झरती श्रावणधारा असतात ना? असं म्हटल्यावर मधुकरजींनी पण "बरं , झिमझिम तर झिमझिम !" असं मान्य केल्याचा किस्सा मंगलाताईंनी सांगितला आणि श्रोत्यांमधे खसखस पिकली आणि त्या पार्श्वभूमीवर दशरथ पुजारींचे नादमय स्वर सुचित्रामय झाले.....
कुठल्याही स्त्रीच्या ह्रृदयाचा एक कोपरा ज्या माहेराने व्यापलेला असतो , त्या माहेरी जाऊन सुवासाची बरसात करणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे कृ.ब निकुंब यांचे शब्द कमलाकर भागवत यांच्या सुमधुर संगीताने नटलेले — घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात हे आर्त भाव सुचित्राजींनी गाऊन श्रोत्यांना हेलावून सोडलं.....
हे गाणं जसं सुमनजींनी गायलंय तसंच , ए.पी.नारायणगांवकर यांच्या संगीतात कालिंदी केसकर यांनी आणि वसंत देसाई यांच्या संगीतात फैय्याज यांनीही गायलं आहे ! एकाच गाण्याला ३ वेगवेगळ्या संगीतकारांच्या चाली आणि तीन वेगवेगळ्या सुश्राव्य गायिकांनी अजरामर केलेलं हे मराठीतील पहिलंवहिलं भावगीत असावं आणि तेही या जगातील सर्वश्रेष्ठ अशा स्त्री च्या भावनांना वाट करून देणारं ! आपण मराठी असल्याचा अभिमान वाटत ऊर भरून येतो महाराजा !
१९६५ साली मजरूह सुलतानपुरींचे जादुई आर्जव संगीतकार ख़य्याम यांनी स्वरबद्ध करत मुहब्बत इसको कहते हैं चित्रपटातील माझ्या माहेरच्या गोरेगांवातील छोटा काश्मिर ऊर्फ Observation Post ( O.P. ) येथे चित्रिकरण झालेलं ठहरिये होशमें आ लूँ तो चले जाइयेगा हे गाणं रफ़ी आणि सुमनजींच्या त्या लाडिक ऊँ हूँ सहित मंदार सुचित्रा यांनी सादर केलं.आणि पडद्यावर मास्टर विनायक कन्या नंदा आणि कपूर कुलोत्पन्न तेहेत्तीस दातांचा देखणा शशी कपूर ! एक दात डाव्या बाजूच्या वरच्या जबड्यात अधिक असताना फारच देखणा दिसणारा शशी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं ३३ दातांचं पहिलं स्वप्न ( आणि तसंच दुसरं स्वप्न म्हणजे मौशुमी चटर्जी ! )
यानंतर विद्या यांनी दिल एक मंदिर मधील शैलेंद्र यांचं जूहीकी कली मेरी लाडली हे शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं लडिवाळ नटखट गाणं सादर केलं.....
१९५१ साली मल्हार चित्रपटात इंदिवर यांच्या शब्दांना रोशन यांनी संगीतबद्ध करत एक गाणं राग गौड मल्हार मधे लताकडून गाऊन घेतलं होतं गरजत बरसत भीजत आईलो पुढे ९ वर्षांनी अब्दुल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांनी लिहिले गाणं रोशन यांनी याच चालीत बरसातकी रात चित्रपटात कमल बारोट आणि सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलं गरजत बरसत सावन आयो रे जे विद्या—सुचित्रा यांनी सादर केलं.....
१९६५ साली एक चित्रपट आला नूरमहल ज्यात एक गूढ वाटणारं गाणं होतं सबा अफ़गाणी यांचं , जे संगीतबद्ध केलं होतं जानी बाबू क़व्वाल यांनी सुमनजींच्या आवाजातील मेरे मेहेबूब न जा ( पडद्यावर चित्रा आणि जगदीप ) — विद्या यांनी सादर केलं.
१९६५ सालीच ३३ दातांच्या देखण्या शशी कपूरचा नंदासोबत एक सिनेमा आला होता जब जब फूल खिले आणि आनंद बक्षींच्या गीतांना कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध करून अजरामर केलं.यातलं कबूलीजबाब धाटणीचं गाणं सादर केलं मंदार विद्या यांनी : ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे यानंतर १९६८ च्या ब्रह्मचारी मधील हसरत जयपुरी—शंकर जयकिशन यांचं आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर सादर केलं मंदार—सुचित्रा यांनी ! ( अख्ख्या दृष्ट लागण्यासारख्या कार्यक्रमात या गाण्यातील सॅक्सोफोनची धून नीट न वाजण्याची दृष्ट लागलेलं हे एकमेव गाणं महाराजा ! )
१९६१ च्या माॅडर्न गर्ल मधे आपल्या अजागळ पेहेरावावरून हिंदी सिनेसृष्टीमधे उपाधी लाभलेल्या गुलशन बावरा च्या गीताला स्वरबद्ध केलं रवी यांनी आणि ते ये मौसम रंगीन समाँ सादर केलं मंदार—विद्या यांनी.
मराठी चित्रपटसृष्टीमधे चंद्राला निंबोणीच्या झाडामागे झोपवण्याची किमया करत अजरामर अंगाईगीत लिहिणार्या मधुसूदन कालेलकर यांच्या शब्दांना एन.दत्ता यांनी स्वरबद्ध केलं आणि निंबोणीच्या झाडामागे सादर केलं विद्या यांनी.....
गदिमा—बाबूजी यांच्या एकटी मधील मातृह्रृदयाने मुलाची काढलेली काल्पनीक दृष्ट सुचित्रा यांनी काढली : लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू १९६४ च्या साँज और सवेरा मधील नायक—नायिकेची खंत हसरत जयपुरींनी मांडली व शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केली अजहु न आए बालमा , सावन बीता जाय सादर केलं मंदार आणि विद्या यांनी !
मंडळी , काही काही कार्यक्रम संपूच नयेत असं वाटतं , पण कालमर्यादा असते त्यामुळे साँज और सवेरा ने सुमधुर केलेली बेला सावन बीता जाय या सुरेल तक्रारीवर संपली आणि कार्यक्रम संपला मंगलाय सुमनो हरि: आणि अस्मादिक् आणि सौभाग्यवती संगीताय रमत: घरी: आलो !
असा "हा सुमन सुगंध आमच्या जीवनात दरवळला तसा येणारी अनेक वर्षे हा लेख वाचणार्या रसिक वाचकांच्या जीवनातही दरवळो !" ~ हीच पाचां उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण ! जाणिजे ,
लेखनालंकार ,
मर्यादेयं विराजते !
© उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
सोमवार २२ एप्रिल २०२४ दु.१.१७ वा.

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती.

पोपटांच्या आकलनशक्तीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात पोपट आणि माणसाच्या मेंदूतील अनेक साम्यस्थळं स्पष्ट झाली होती. यांनुसार माणसाप्रमाणेच पोपटाच्या मेंदूचा आकारही, शरीराच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो. तसंच दोघांच्या मेंदूच्या पुढच्या भागात मज्जापेशींची संख्या मोठी असते. इतकंच नव्हे तर, दोघांच्या जनुकीय आराखड्यातल्या, मेंदूच्या विकासाशी संबंधित भागांतही मोठं साम्य दिसून आलं आहे. माणसाला जशी उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य मिळालं आहे, तसंच पोपटाच्या बाबतीतही उत्तम आकलनशक्ती आणि दीर्घायुष्य यांचा मिलाफ घडून आला आहे.


प्रकाशन दिनांक :- 28/09/2003
देशाला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकाचा कालावधी उलटून गेला. स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी तिसरी पिढी जन्माला आली. शेकडो वर्षांच्या संघर्षाचे एक पर्व संपले, परंतु त्याचा अर्थ संघर्ष संपला असा करता येणार नाही.
आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळहातावर पण केस येतील अशा जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची वारेमाप विक्री झाली पण लवकरच त्याची हवा गेली. केसांसाठी मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. अॅडव्होकेट रत्नपारखींची “शेपटा” ही कविता वाचली की लक्षात येईल की एस.एस.सी.ला बसलेल्या एकाचं आयुष्य शुभदा जोशीच्या (काल्पनिक नाव) केसांमुळे कसं उध्वस्थ झालं. तिच्या काळाभोर केसांचा शेपटा बघत अख्खा पेपर बिचार्याने कोरा ठेवला.
| “एस एस सीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेशपेपर पहिला, घंटा पहिली, क्षण उत्सुकतेचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा
मानेला ती देऊनि झटका नकळत सवईने, लिहू लागली पेपरमधली पानावर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार, तिचा तत्क्षणी येऊनि पडला माझ्या बाकावर तीन ताशी एकचित्त मी तिच्या शेपटात, एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटचीती घंटा झाली आलो भानावरी, कळले आता अपुले जीणे गावी खेड्यावरी शेतीवरती मोटेवरतो माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका केसानी त्या गळा कापला अलगदजी माझा, परि बैलांचा पिळुनि शेपटा जगतो हा राजा” . . . . . . . . कवी - अॅडव्होकेट रत्नपारखी |
बायकांना टक्कल का पडत नाही?
शंभरात तीस टक्के पुरुषांना टक्कल पडलेले दिसते. पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. केस गळतात अशी तक्रार बायका करतात खर्या पण केस जसे गळतात तसे नवीनही येतात. म्हणून पूर्णपणे कॅरम बोर्ड झालेल्या स्त्रिया सहसा दिसत नाहीत. पित्त वाढल्यामुळे केस पातळ होणे, तांबूस रंगाचे होणे, अकाली टक्कल पडणे ही लक्षणे होतात. पित्त हे रक्तामध्ये निवास करते. मासिक पाळीच्या माध्यमाने दर महिन्यात थोडे रक्त शरिरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील पित्त दोष चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्याची निसर्गाची ही किमया स्त्रियांमध्ये आपोआप घडत राहते. ह्या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हॉर्मोन असते. हे हॉर्मोन उष्ण जातीचे असल्यामुळे शरीरात पित्त वाढवण्याचे कार्य करते. ह्या टेस्टोस्टिरॉन चे प्रमाण वाढले तर केस अधिकच गळतात. टेस्टोस्टिरॉन अधिक असल्यामुळे पुरुषांमध्ये कामशक्ती वाढते. म्हणूनच असे बघण्यात येते की टक्कल पडलेले पुरुष तुलनेने कामशक्ती मध्ये जरा अधिक सक्षम असतात. स्त्रियांमध्ये पण हे हॉर्मोन असते पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असते.
केसांचे विकार
केस गळणे, कोंडा होणे अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करुया. डोक्यावरचे जवळपास १० टक्के केस हे सुप्तावस्थेत असतात. ह्याला “रेस्टिंग फेज” असे म्हणतात ह्या रेस्टिंग फेजची जागा सतत बदलत असते. साधारण सहा महिने हे केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. ह्या काळात त्या केसांना पोषण मिळत नाही आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे थोड्याशा ताणामुळे ते केस गळून पडतात. मात्र इतर ९० टक्के भागात पोषण सुरु असते म्हणून हे केस वाढतातही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे.
दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच्या खालची त्वचा (Scalp) ह्या भागाचा आजार आहे. फंगस नामक जिवाणूंमुळे हा त्वचेचा आजार होतो. अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. मिलेनिन नावाचे एक काळे रंजक द्रव्य केसाला काळा रंग देते. वय वाढत गेल्यावर हे मिलेनिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.
केसांच्या समस्या – प्रमुख कारणे
वर बघितल्याप्रमाणे ‘केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे’ हे केसांचे तीन प्रमुख विकार आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला किंवा अपघातामुळे फ्रॅक्चर वगैरे झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते. शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध म्हणजे तेल. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण आजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.
केशस्वास्थ्याचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील हाडा-मासापासून तर नख-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील धातूंमध्ये त्याचे परिणाम आजाराच्या स्वरुपात दिसू लागतात. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच. आहारात काही घटक कमी-अधिक होत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते. केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मीठ म्हणजे केसांचा एक नंबरचा शत्रू. ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ मिठापेक्षा थोडे अळणी अन्न घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड ह्यांसारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळावेतच. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते.
केसांच्या सुयोग्य पोषणासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व कॅल्शियमची नितांत आवश्यकता आहे. दूध, मांसाहार, द्विदल धान्य, सोयाबीन अशा पदार्थांमध्ये सकस प्रथिने असतात. तीळ, पालेभाज्या, केळी, संत्री, बदाम, कोबी, फ्लॉवर सारख्या अनेक गोष्टींमध्ये प्रचुर प्रमाणात कॅल्शियम असते. संपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्यांनी ह्यांचे सेवन आहारात नियमितपणे केले पाहिजे.
अनुवांशिकता हे केसांच्या विकारांचे एक प्रमुख कारण आहे. केस हा पित्रुज भाव असल्याने वडिलांच्या गुणसूत्रानुसार ह्याचे स्वास्थ्य असते. अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस ज्या विशिष्ट वयात गळू लागले त्याच वयात मुलांमध्येही केस गळती सुरु होऊ शकते.
मानसिक ताण, चिंता, क्रोध हे केसांच्या समस्यांचे महत्वाचे कारण आहे. अशा मानसिक असंतुलनामुळे कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन ह्यांची वाढ होऊन केसांना धोका संभवतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही वनस्पतींच्या सेवनाने ह्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते.
प्रदूषण हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनेशन करण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीत क्लोरिनचे प्रमाण अधिक झाले व केस धुण्यासाठी असे पाणी वापरले तर केस गळती झपाट्याने होऊ लागते. ह्यावर सोपा उपाय म्हणजे स्नानासाठी वापरावयाचे पाणी २ – ३ तास बादलीत काढून ठेवावे. ह्याने त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते व केसांना होणारी इजा टाळता येते. प्रदूषित हवा, त्यातील कमी झालेले प्राणवायूचे प्रमाण व वाढलेले इतर घातक वायु हे असंतुलन रोखणे जवळजवळ अशक्यच आहे. निसर्ग संगोपन, वृक्षारोपण व संवर्धन हे ध्येय प्रत्येकानेच पाळणे नितांत गरजेचे आहे.
केसांची निगा – समज / गैरसमज
केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शांपू आणि तेल ह्याशिवाय काही उपचार असू शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार. ह्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय योग्य आहे हेच कळेनासं होतं.
“कोणता शांपू चांगला?” अशी विचारणा बरेच लोक करतात. मुळात शांपूचा उपयोग काय हे लक्षात घेतले पाहिजे. शांपू हा फक्त केस धुण्यासाठी वापरला जाणारा फेसाळणारा साबणासारखा (इमल्सिफायर) पदार्थ आहे. केसांवरील तेलकट अंश ह्यात विरघळतो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त काही सेकंद असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरी त्या ठिकाणच्या त्वचेवर राहिले पाहिजे. शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही.
हर्बल शांपू प्रकाराचे प्रस्थ सध्या फार वाढलेले दिसते. ह्या हर्बल शांपूमध्ये वनस्पतींच्या अर्काचा फक्त थोडासाच अंश असतो, बाकी सर्व रसायनेच असतात. रासायनिक घटक असल्यामुळे ते वाईट असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात वास्तविक काहीच नसते. केसांना मुलायम (हेअर सॉफ्टनिंग) करणारे, चकाकी (ग्लॉस) देणारे शांपूही आजकाल मिळतात. ह्या शांपुंमध्ये मुख्यतः रासायनिक स्निग्ध पदार्थ असतात, जे केसांना मुलायम करतात, गुंतागुंत होऊ देत नाहीत व चकाकी देतात. तरीदेखील हा कृत्रिमपणा केसांच्या स्वास्थ्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा आहे. शांपूचा दर्जा ठरतो त्याच्या pH वरून. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे.
केसांसाठी तेल आवश्यक आहे खरे, पण ते केवळ केसांना वर वर लावून उपयोगी नाही, तर ते मुळाशी शोषले जाणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत होतो. आयुर्वेदाच्या तत्वानुसार नाक हे शिरोभागाचे द्वार आहे. त्यातील यंत्रणा व श्लेष्मल स्तरांमधून द्रव्याचे शोषण होते.
पुढचा महत्वाचा भाग आहे औषध पोटातून घेण्याचा. पोटात घेतलेल्या औषधी द्रव्यातील कार्यकारी घटक रक्ताद्वारे केसांच्या मुळांमार्फत केश संरक्षण व वर्धन करून अस्थि धातु पोषणाचेही कार्य करतात. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. आयुर्वेदात काही विशिष्ट वनस्पती व औषधी द्रव्ये ह्यासाठी वर्णित आहेत. ह्यांच्या सेवनाने अगदी ५ - ६ दिवसांतच फरक दिसू लागतो असे अनुभव प्राप्त झाले. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. ही औषधे ३ महिने सातत्याने घेतल्यावर १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा चालू करावीत. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.
केशप्रभा – केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रभावी गोळ्या
गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.
केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी शारीरिक, मानसिक, आहार, विहार व औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून अक्षय उद्योग समूहाने ‘केशप्रभा’ नावाचे एक अभिनव उत्पादन वटी स्वरुपात सादर केले आहे. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता देण्याचा प्रयत्नही केला आहे. केसांच्या स्वास्थ्यासाठी केशप्रभा गोळ्यांमधील प्रत्येक औषधी कशी कार्य करते ते आता पाहूया.
प्रत्येक विलेपित गोळीतील घटक द्रव्य व प्रमाण
कृष्णसारिवा, माका प्रत्येकी ८० मिलिग्रॅम, ब्राह्मी, गुडुची प्रत्येकी ७० मिलिग्रॅम, गोखरू, शतावरी, वटजटा प्रत्येकी ६० मिलिग्रॅम, सुवर्णमाक्षिक भस्म, मौक्तिक पिष्टी प्रत्येकी ३० मिलिग्रॅम; भावना वटजटा क्वाथ.
कृष्णसारिवा : शारीरिक पेशींच्या जडणघडण प्रक्रियेत काही विषारी घटक सतत उत्पन्न होत असतात. त्यांना काबूत ठेवण्यासाठी शरीर आपणहून प्रयत्नशील असते. तरीदेखील सदोष आहार, उग्र रासायनिक घटकांचा संपर्क, चुकीची जीवनशैली अशा कारणांमुळे चयापचयातून अतिरिक्त विषारी घटक निर्माण होतात. ह्यांना पेशीविघातक (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. ह्या फ्री रॅडिकल्समुळे केसांच्या स्वास्थ्यावर घातक परिणाम होतात, केस झपाट्याने गळू लागतात, पांढरे होतात. कृष्णसारिवा वनस्पतीमध्ये फिनाइलप्रोपेनॉइड नामक पेशीरक्षक घटक असतो. हा घटक फ्री रॅडिकल्सना उत्तमप्रकारे काबूत ठेवून केस गळणे थांबवतो.
माका : केसांसाठी निर्मित उत्पादनात ही वनस्पती आवर्जून असतेच. माक्याचे केशवर्धक गुण विविध संशोधातून सिद्ध झाले आहेत. ह्याचा उपयोग बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे होतो. दोन्ही प्रकारात ह्यातील घटक रक्तात शोषले जाऊन केशवर्धनाचे अपेक्षित कार्य करतात.
गुडुची : केसांच्या स्वास्थ्यासाठी गुडुची विविध प्रकारे उपयुक्त ठरते. रसायन असल्यामुळे शरीराच्या सर्वच धातूंना बळ देते. यकृताचे कार्य उत्तम राखण्यामुळे बाकीच्या अन्तःस्रावी ग्रंथींवर नियंत्रण राखून हॉर्मोन्सचे संतुलन उत्तम राहते. हॉर्मोन्सचा संबंध केसांच्या स्वास्थ्यासाठी सर्वमान्य आहेच. सीबम हा त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ आहे. केसांचे पोषणही त्वचेच्या माध्यमातूनच होत असल्याने गुडुचीचे गुण केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतात. गुडुची ही अस्थि पोषणासाठी एक उत्तम वनस्पती आहे. अस्थिधातूचा केसांशी असलेला संबंध लक्षात घेता गुडुचीचा उपयोग अस्थिपोषणासाठी व परिणामी केसांच्या स्वास्थ्यासाठी सिद्ध होतो. फंगसच्या नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने केसातील कोंड्यासाठी देखील ह्याचा विशेष उपयोग होतो.
गोखरु : केसांच्या व त्वचेच्या काळ्या रंगासाठी कारणीभूत असणारे रंजकद्रव्य म्हणजे मेलॅनिन. गोखरु सेवनाने मेलॅनिन स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (MSH) प्रेरित होते. शिवाय त्याने मेलॅनिन निर्मिती, त्वचेमध्ये पसरण्याची क्रिया व सुप्त मिलॅनोसाईट कोशिकांवर उत्तेजक क्रिया होते. केसांच्या कृष्ण वर्णासाठी ह्याच्या सेवनाने उत्तम लाभ होतो.
शतावरी : इस्ट्रोजिन नामक हॉर्मोनचे संतुलन बिघडले तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. मासिक रजःस्राव नियमित होणे हे इस्ट्रोजिनचे संतुलन योग्य असल्याचे निदर्शक आहे. ज्या स्त्रियांमध्ये रजःस्राव अनियमित असतो त्यांना केसांचे विकार अधिक संभवतात. शतावरीमध्ये फायटो इस्ट्रोजिन्स असल्याने रजःस्रावाचे संतुलन राखले जाते व केस गळणे आटोक्यात राहते. पुरुषांमध्ये अल्प प्रमाणात असलेले इस्ट्रोजिनचे प्रमाण वाढले तर टेस्टोस्टेरॉन घटू शकते. शतावरीमुळे इस्ट्रोजिन्सचे संतुलन चोख राहते व पुरुष असो वा स्त्रिया, दोघांच्याही केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते.
वटजटा : वडाच्या पारंब्यांचा उपयोग केसाच्या वाढीसाठी होतो. प्राप्त निष्कर्षानुसार केसांची जाडी ३१ % वाढते, १५ % नवीन केसांची निर्मिती होते तर संख्या सुमारे ४६ % वाढते.
सुवर्णमाक्षिक भस्म : रस – रक्त – मांस – मेद – अस्थि – मज्जा व शुक्र असे सात धातु शरीराच्या धारणासाठी निसर्गाने निर्माण केले आहेत. सुयोग्य पोषण मिळाले तर सर्व धातु, उपधातु आणि मल सुदृढ राहतात. रक्त धातुमधील लोहाचे प्रमाण उत्तम राखण्याचे कार्य सुवर्णमाक्षिक भस्मामुळे होते. अर्थात पुढे त्यापासून निर्माण होणारे धातु-उपधातु सुस्थितीत राहून केस झडण्याची शक्यता कमी होते.
मौक्तिक पिष्टी : अस्थि धातूचे परिपूर्ण पोषण करणारे सागराच्या कुशीतून निर्माण होणारे हे द्रव्य आहे. मौक्तिक म्हणजे मोती. ह्यामध्ये ८२ ते ८६ % एवढ्या मोठ्या मात्रेत कॅल्शियम आढळते. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी १० % कॅल्शियम हे रक्त संवाहनात असते तर ९० % अस्थिधातुमध्ये असते. म्हणून अस्थि पोषणासाठी कॅल्शियमची गरज सर्वात अधिक असते. निसर्गनिर्मित मोत्यांमध्ये असलेले कॅल्शियम उत्तम दर्जाचे असून मानवी शरीरात सहज शोषले जाते. अस्थींच्या पोषणाने अर्थातच केसांचे स्वास्थ्य उत्तम राहून हाडांनाही बळकटी मिळते.
ब्राह्मी : मानसिक ताण, चिंता, भय अशा कारणांमुळे केसांचे विकार संभवतात. ह्या गोष्टींमुळे कॉर्टिकोस्टिरॉन आणि नॉरअॅड्रिनलीन नावाची हॉर्मोन्स वाढून केसांची गळती सुरु होते. ब्राह्मी सेवनाने कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन नियंत्रणात राहून केसांची गळती रोकण्यास हातभार लागतो. केस गळण्याच्या कारणांमध्ये थायरॉइड मधील T4 जातीच्या स्रावांची कमतरता हेदेखील महत्वाचे कारण आहे. ब्राह्मी सेवनाने ह्या T4 स्रावांची हळुवार वाढ होते व केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्राव जरुरीपेक्षा अधिक वाढत नाहीत, फक्त योग्य मात्रेत वाढ होईपर्यंतच ह्याची क्रिया घडते.
केशप्रभा सेवन करण्याची पद्धत
२ – २ गोळ्या दिवसातून दोन वेळा, सकाळी रिकाम्यापोटी व रात्री झोपतांना.
वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
फोन - +917208777773
Email: drjalukar@akshaypharma.com
या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात.

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची.

आपले आडनाव कसेही असले तरी आपण ते जन्मभर मोठ्या अभिमानाने आपल्या नावासमोर लावतो. आपला समाज पुरूषसत्ताक आहे म्हणून मुलाच्या किवा मुलीच्या नावासमोर वडिलांचे किवा पतीचे नांव आणि वडिलांचे किवा पतीचेच आडनाव लावण्याची प्रथा आहे.

मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.
सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.

क्रिस्टिन लॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला हा शोध नासाच्या ‘टेस’ या कृत्रिम उपग्रहावरील, ताऱ्यांची तेजस्वीता मोजणाऱ्या प्रकाशमापकाच्या मदतीनं लावला. टेस हा उपग्रह विविध ताऱ्यांच्या बिंबांवरील, त्यांच्या ग्रहांनी केलेल्या अधिक्रमणांचा शोध घेतो. किमान एक लाख किलोमीटर, तर कमाल पावणेचार लाख किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा टेस हा उपग्रह पृथ्वीभोवतालची आपली प्रदक्षिणा सुमारे पावणेचौदा दिवसांत पूर्ण करतो. या उपग्रहाद्वारे केल्या गेलेल्या निरीक्षणांत जीजे ३६७ या ताऱ्याची तेजस्वीता किंचितशी बदलत असल्याचं आढळून आलं.
Copyright © 2025 | Marathisrushti