वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ex - आय.व्ही.पी. हा स्पेशल एक्स-रे मूत्रपिंडाचा त्रास असणार्या बर्याच रुग्णांस माहीत आहे. या एक्स-रेमुळे मूत्रपिंडे कार्य करतात की नाही हे समजते.
आता मात्र एक मार्ग जो पूर्वी होताच फक्त आपल्याला माहिती नव्हता – “रंगचिकित्सा”.. !! “रंगोपचार”… म्हणजे काय? तर रंगांपासून आपल्यावर आपण उपचार करून घेतो. आपण आस्तिक असो वा नास्तिक, कुठल्याही वयोगटाचे अन् आर्थिक उत्पन्न गटाचे. आपण कुणीही असा. आपली प्रकृती कुठल्याही प्रकारची असो… रंगोपचारांना प्रतिसाद हा मिळतोच मिळतो – उपचारकर्त्यांकडून…!!

तीव्र भूकंप ही प्रचंड हाहाकार उडवणारी नैसर्गिक घटना आहे. तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. भूकंपाच्या काही तास अगोदरच जर या भूकंपाचं भाकीत करता आलं, तर लोकांना योग्य ती सूचना देऊन, ही जीवितहानी कमी करणं शक्य होईल. परंतु भूकंपाचं भाकीत करता येईल, अशी खात्रीशीर भूकंपपूर्व ‘लक्षणं’ संशोधकांना सापडलेली नाहीत. त्यामुळे भूकंपाच्या पुरेसा वेळ अगोदर, भूकंपाचं भाकीत वर्तवणं अजून तरी शक्य झालेलं नाही.

साखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.


परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.
या सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय.

आषाढी आली. वारकरी पंढरपूरला निघाले. पण हा पंढरीचा चोर फक्त पंढरीत राहत नाही, सगळीकडे फिरत असतो. बस त्याला पकडणारी नजर हवी. आजपर्यंत ह्या पंढरीच्या चोराला कोणी, कसे पकडले सांगत आहेत निरेन आपटे.

नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती.

शुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला आहे. हा पुरावा, अलीकडेच शुक्रावर ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेल्याचं दर्शवतो.
आज तुम्हाला मी अशा एका कवीबद्धल सांगणार आहे की ज्याचं टोपण नावच दुर्दैवाने त्याचं विधिलिखित बनून गेलं !
२८ आॅक्टोबर १९३० रोजी वाराणसी येथील ओदार या छोट्याशा खेड्यात पं.शिवनाथ पांडे यांना एक मुलगा झाला — लालजी पांडे.स्वत: बँकेत असल्याने बी.काॅम होऊन मुलानेहि बँकेत नोकरी करावी हा वडिलांचा आग्रह व मुळातंच कवीचा पिंड त्यामुळे कवी व्हावं हि लालजीची इच्छा ! अखेर वडिलांशी भांडून लिख लिख के मर जाएँगे! ( पण अपयशी होऊन पुन्हा बनारसमधे पाऊल ठेवणार नाहि! ) असं निक्षून सांगत लालजी १०० ₹ ची नोट घेऊन मुंबईला आले.
Copyright © 2025 | Marathisrushti