वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
‘जुलै’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या शिस्तबद्ध व सुनियंत्रित असल्याचे मानले जाते. चालू ‘जुलै’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर.
आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे.

लाल शैवालांच्या अस्तित्वामुळे बर्फाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वीस टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचं आढळलं आहे. प्रकाश अधिक प्रमाणात शोषला जात असल्यामुळे, लाल रंगाचं बर्फ तापमानवाढीस कारणीभूत ठरतं आहे.

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो.

ह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.

‘ही शर्यत रे अपुली’, ससा आणि कासवाच्या शर्यतीवरील गीतातली ही ओळ आहे. शिक्षण, व्यवसाय, क्रीडा वगैरे क्षेत्रात स्पर्धा, शर्यत असते. लढाया जिंकत जिंकत अंतिमतः युद्धात बाजी मारणे हे युद्धाचे उद्दिष्ट असते. शर्यतीत प्रतिस्पर्ध्यावर मात करावी लागते. हिटलरला युरोप जिंकून साम्राज्य वाढवायचे होते. हिटलरचे प्रतिस्पर्धीं त्याला थोपवायचा प्रयत्न करीत होते. या मित्र पक्षांचा गट बनला होता. युद्धात न उतरलेला एक देश मित्रपक्षांचा सोबती होता.
जर्मनीत 1920 मधे नाझी पक्षाचा उदय होत होता. आर्य हे श्रेष्ठ आहेत, त्यांचेच वर्चस्व असायला हवे, अशी हिटलरची समजूत होती. ज्यूंचा नाश करण्याच्या नाझी पक्षाच्या निर्धारामुळे, जर्मनीतूनच काय इतर युरोपीय देशातूनही ज्यू परागंदा होऊ लागले. नामवंत ज्यू शास्त्रज्ञ, कलावंत, व्यावसायिक यांना असुरक्षित वाटू लागले. अमेरिका, पॅलेस्टाईन, ग्रेट ब्रिटन, मध्य व दक्षिण अमेरिका या देशात ते आश्रयास जाऊ लागले. हिटलर सत्तेत येताच राज्यातील सर्व आस्थापनांमधून ज्यूंची हकालपट्टी केली गेली. हिटलरने 1938 पर्यंत जर्मनीवरच लक्ष केंद्रित केलं होतं. दुसरे महायुद्ध 1939 मधे सुरू होण्यापूर्वी अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेत पोचले होते. वर्नर हायसेनबर्ग सारखे काही शास्त्रज्ञ देशप्रेमापोटी जर्मनीत राहिले.

जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण ह्यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. ह्या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. अशा फिल्म पाहिल्याने शरीरात बदल होतात आणि तात्काळ लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. थोडक्यात, अशा क्लिप्स म्हणजे बलात्काऱ्यांची शाळा आहे.
लैंगिक शिक्षणाचा अभाव:
मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते.

श्वास रोखून बराच काळ पाण्याखाली खोलवर राहणाऱ्याच्या शारीरिक क्रियांत नक्की किती प्रमाणात बदल होतो! कारण मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा फारच कमी झाला तर, बेशुद्धावस्थेची आणि इतर गुंतागुतीची शक्यता असते.
Copyright © 2025 | Marathisrushti