हिमशिखरांच्या सहवासात – प्रस्तावना
Category:
साहित्य - ललितभारताच्या वायव्येकडे पसरलेल्या हिंदुकुश आणि काराकोरम या पर्वतरांगांपासून पार अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंत पसरलेल्या हिमालय या पर्वताचे जगभरच्या लोकांना अपार कौतुक आणि आकर्षण आहे. या आकर्षणापोटी गेली हजारी वर्षे जगभरचे अनेक प्रवासी या पर्वतांत प्रवासासाठी येतात. हिमालयात भटकंती करायला येणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने चार पाच वर्ग पडतात. काही लोकांना हिमालयाचा अभ्यास करायचा असतो, हिमालयाची भौगोलिक जन्मकथा अतिशय रंजक आहे.